प्रश्नकर्ता: पुण्याच्या उद्यामुळे जर आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष्मीची प्राप्ती झाली तर ?
दादाश्री तर खर्च करुन टाकावी. मुलांसाठी जास्त ठेवू नये. त्यांना शिकवावे, सवरवावे. सगळे कम्प्लीट करुन, त्यांना नोकरीला लावले, की मग ते कमवायला लागतील. म्हणून जास्त ठेवू नये. थोडेसे बँकेत, किंवा कुठे तरी ठेवायचे. दहा-वीस हजार, मग कधीतरी तो अडचणीत असला तर त्याला दयावे पण त्याला सांगू नये, की बाबा मी ठेवलेत. हो. नाहीतर अडचण नसेल तरी उभी करतील.
एका व्यक्तिने मला प्रश्न केला की, मुलांना काही देऊ नये? मी म्हणालो, 'मुलांना द्यायचे, आपल्या बापाने आपल्याला जे दिले ते सर्व द्यायचे आणि मधला जो माल आहे, तो आपला. तो मग आपण आपल्या मर्जीनुसार धर्मासाठी वापरावे.
प्रश्नकर्ता आम्हा वकिलांच्या कायद्यात सुद्धा असेच आहे की जी वाडिलोपार्जित संपत्ति आहे ती मुलांना दिली पाहिजे. आणि जी स्वउपार्जित संपत्ति आहे, त्याचे बापाला जे करायचे असल ते करो.
दादाश्री : हो, जे करायचे असेल ते करा. आपल्या हातुनच केले पाहिजे! आपला मार्ग काय म्हणतो की जो तुझा स्वत:चा माल आहे, त्याला तु वेगळा करुन खर्च कर, तर तो तुझ्यासोबत येईल. कारण बाहेरगावी जातो तेव्हा थोडी शिदोरी घेऊन जातो, मग हे सगळे नको का ?
प्रश्नकर्ता : जास्त तर केव्हा म्हणावे ? ट्रस्टी प्रमाणे राहिले तर.. दादाश्री : ट्रस्टी प्रमाणे राहणे उत्तम आहे. पण असे राहता येत नाही, सगळे असे राहू शकत नाही. ते सुद्धा पूर्णपणे ट्रस्टी प्रमाणे राहू शकत नाही. ट्रस्टी अर्थात् तर ज्ञाता दृष्टा झाले. पण ट्रस्टी प्रमाणे पूर्णपणे राहिले जात नाही. पण जर असा भाव असेल तर थोडे-फार राहू शकतो.
आणि मुलांना तर किती दयायचे असते? आपल्या वडीलांनी आपल्याला दिले असेल तेवढे, काही दिले नसेल तरी आपण काही न काही दिले पाहिजे.
मुले दारुडे बनतात का, फार वैभव असेल तर ?
प्रश्नकर्ता: हो बनतात. मुले दारुडे बनणार नाहीत तेवढे तर दिले
पाहिजे ?
दादाश्री : तेवढेच दिले पाहिजे.
प्रश्नकर्ता: जास्त वैभव दिले तर तसे होऊ शकते.
दादाश्री : हो, ते नेहमीच त्याचा मोक्ष बिघडवेल. नेहमी पद्धतशिर असलेलेच चांगले. मुलांना जास्त देणे हा गुन्हा आहे. हे तर फोरनवाले सर्व समजतात ! किती समंजस आहेत!! आणि यांना तर सात पीढयांपर्यंतचा लोभ ! माझ्या सातव्या पीढीच्या माझ्या मुलाकडे असे असावे. किती लोभी आहेत हे लोक? मुलांना आपण काम धंद्यावर चढवायचे, तितके आपले कर्तव्य आणि मुलींचे तर आम्ही लग्न करुन दिले पाहिजे. मुलींना काहीतरी दिले पाहिजे. आजकल मुलींचा वाटा द्यायला लावतात ना वाटेकरी प्रमाणे ? लग्नात खर्च होतो ना ? नंतर वरुन थोडेफार दया. तिला दागिने वगैरे दिले, ते देतातच ना! पण स्वतः चा पैसा तर स्वतःच खर्च केला पाहिजे.
प्रश्नकर्ता: मुलांना पारिवारिक व्यवसाय सोपावा आणि कर्ज दिले
पाहिजे ना?
दादाश्री : आपल्याकडे मिलियन डॉलर असो किंवा अर्धा मिलयन डॉलर असो, तरीही मुलगा ज्या घरात राहतो, ते घर मुलाला द्यावे. नंतर त्याला एक काम धंदा सुरु करुन द्यावा, त्याला आवडत असेल ते. कोणते काम त्याला आवडते, ते विचारुन मग जे काम त्याला ठीक वाटेल, ते चालू करवून द्यायचे. आणि पंचवीस तिस हजार बँकेतून मिळवून - द्यावे, लोन वर. मग तो स्वतःच लोन भरत राहील. आणि थोडे-फार आपण द्यायचे. त्याला हवी असेल त्यातली अर्धी रक्कम आपण द्यावी आणि अर्धी बँकेतून, म्हणून मग तो लोन भरत राहील. म्हणजे कोणी धक्का मारणारा हवा त्याला. ज्यामुळे तो दारु पिणार नाही. मग मुलगा म्हणेल की, 'या वर्षी माझ्याकडून लोन भरली जाणार नाही.' तेव्हा म्हणावे की, मी आणून देतो तुला पाच हजार कोणाकडून, पण लवकरच परत करायचे आहे. असे सांगून पाच हजार आणून द्यायचे. मग आपण त्या पाच हजाराची आठवण करुन दयावी, की 'लवकर परत करा, असे ते म्हणाले आहे.' अशी आठवण करुन दिली तर मुलगा म्हणेल, 'तुम्ही कटकट करु नका आता.' तेव्हा आपण समजून जावे. 'खूप चांगले आहे हे.' म्हणून मग तो पुन्हा घ्यायला येणारच नाही ना!' कटकट करता' असे म्हणाला, त्याची आपल्याला हरकत नाही, पण मग पुन्हा घ्यायला तर येणार नाही ना!
अर्थात् आपली सेफसाइड आपण ठेवावी आणि परत मुला समोर आपले वाईटही दिसत नाही. मुलगा म्हणेल, 'वडील तर चांगले आहेत!' पण माझा स्वभाव वाकडा आहे. मी उलट बोललो म्हणून. बाकी वडील तर फार चांगले आहेत. तात्पर्य पळ काढावी या जगातून.