पैसे तर संपतातही आणि घटक्याभरात भरुनही निघतात. चांगल्या कामासाठी वाट बघू नये. चांगल्या कामात खर्च करा, नाहीतर गटारीत तर गेलेच आहे लोकांचे धन मुंबईत करोडो रुपये गटरीत गेले. लोकांचे. घरात खर्च केला पण परक्यांसाठी खर्च केला नाही तो सर्व गटारीत गेला. तर आता पश्चाताप करत आहेत. मी म्हणतो की गटारीत गेले, तेव्हा म्हणतात की, 'होय, असेच झाले.' मग मुर्खा! आधीच सावध रहायला हवे होते ना? आता परत येईल तेव्हा सावध रहा. तेव्हा म्हणतील, 'हो, आता मात्र कच्चा पडणार नाही.' परत तर येणारच आहे ना. धन तर कमी जास्त होत राहील. कधी दोन वर्ष वाईट गेले, तर परत पाच-सात वर्ष चांगले येतील, असे चालतच राहते. पण चांगल्या मार्गाने खर्च केले ते तर कामी येणारच ना ? तेवढेच आपले, बाकी सगळे परके..
एवढे सारे कमावले, पण कुठे गेले? गटारीत!! धर्मासाठी दिले? तेव्हा म्हणाले ते पैसे तर मिळतच नाही, गोळा होताच नाही, तर देऊ कसे ? तेव्हा धन कोठे गेले? हे तर कोण पिकवतो आणि कोण खातो ? जो कमावतो, त्याचे धन नाही. जो खर्च करतो त्याचे धन म्हणून नवीन ओवरड्राफ्ट पाठवाल तेवढे तुमचे नाही पाठवले तर तुमचे तुम्ही बघा.