पैसा खर्च होऊन जाईल, अशी जागृती ठेऊच नये. ज्या वेळी जो खर्च होईल ते खरे. म्हणूनच पैसा खर्च करायला सांगितले, जेणे करुन लोभ सुटेल व वारंवार देऊ शकू.
उपयोग तीच जागृती आहे. आम्ही शुभ कार्य करु, दान देऊ, ते दान कसे ? तर जागृतीपूर्वकचे की लोकांचे कल्याण होवो. कीर्ती, नाम, आम्हाला प्राप्त होवो त्यासाठी नाही. म्हणून गुप्त रुपाने देत असतो. हे जागृतीपूर्वकचे म्हटले जाईल ना? यालाच उपयोग म्हणतात आणि दुसरे तर, त्यांचे नाव छापले नाही तर दुसऱ्यांदा दान देत नाहीत.
असे आहे, शुभमार्गातही जागृती केव्हा मानली जाईल ? या जन्मात व दुसऱ्या जन्मात लाभदायी ठरेल, असे शुभ असेल तेव्हा ती जागृती म्हणवते. नाहीतर, तो दान करत असेल, सेवा करत असेल पण त्याला पुढची जागृती आजिबात राहत नसते. जागृतीपूर्वक सगळ्या क्रिया केल्या तर पुढच्या जन्माचे हित होईल, नाहीतर सर्व झोपेत जाईल, हे जे दान दिले ते सगळे झोपेत गेले. जागृत अवस्थेत चार आणे जरी गेले तरी फार झाले. दान दिले व आतून इथल्या कीर्तीची इच्छा असेल, तर सगळे झोपेत गेले समजावे. पुढच्या जन्माच्या हितासाठी जे दान इथे दिले जाते तो जागृत म्हटला जातो. हिताहीतचे भान म्हणजे स्वतः चे हित कशात आहे व स्वतःचे अहित कशात आहे त्याप्रमाणे जागृती असणे ते! पुढच्या जन्माचा काही ठिकाणा नसेल आणि इथे दान देत असेल त्याला जागृत कसे म्हणावे ?