प्रश्नकर्ता: सरप्लस कशाला म्हणतात ?
दादाश्री : सरप्लस तर आज तुम्ही द्याल आणि उद्या तुम्हाला चिंता होईल अशी परिस्थिती असेल त्यास सरप्लस म्हणत नाही. आता पुढच्या सहा महिन्यापर्यंत मला काही अडचण होणार नाही, असे स्वत: ला वाटले तरच काम करावे, अन्यथा करु नये.
तसे तर हे काम जर तुम्ही कराल तर तुम्हाला अडचण येणारच नाही. हे काम तर आपल्या आपणच पूर्ण होते. हे तर देवाचे काम आहे. हे काम जो कोणी करतो त्याचे तशेच्या तशे बरोबर होऊन जाते. पण तरीही मी तुम्हाला चेतावणी दिली पाहिजे. समजल्याशिवाय, विचारकेल्याशिवाय करा असे मी कशाला सांगू ? डोळे मिटून यात उडी मारा, असे करायला मी का म्हणून सांगू ? मी तर तुमच्या हितासाठी चेतावणी देतो की, 'मागच्या जन्मी तुम्ही दिले होते म्हणून आज तुम्हाला मिळत आहे, आणि आज दवाल तर ते परत मिळेल. हे तर तुमचेच ओवरड्राफ्ट आहे. यात मला काही घेणे-देणे नाही. मी तर तुम्हाला चांगल्या जागी देण्यास लावतो, एवढेच.' मागच्या जन्मी जे दिले होते ते ह्या जन्मात घेत आहोत. सगळ्यांनाच काय अक्कल नाही? तेव्हा म्हणे, 'अक्लीने नाही दिले, वरुनच आहे! तुम्ही बँकेत ओवरड्राफ्ट क्रेडीट केले असेल तर तुमच्या हातात चेक येईल.' अर्थात् बुद्धि चांगली असेल ना तर पुन्हा जोइन्ट होऊन जाते सर्व.