मी एका माणसाच्या बंगल्यात बसलो होतो, तेव्हा तेथे चक्रीवादळ आले. म्हणून दारे खडखड खडखड आपटू लागली. त्याने मला विचारले, 'हे चक्रीवादळ आले आहे, सगळी दारे बंद करु का? मी म्हणालो सगळी दारे बंद करु नकोस, आत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा उघडा ठेव आणि बाहेर निघण्याचे दरवाजे बंद करुन टाक, मग आत किती हवा येईल ? भरलेली रिकामी होईल तेव्हाच हवा आत येईल ना? नाहीतर कितीही मोठे चक्रीवादळ असले तरी आत येणार नाही.' नंतर त्याला अनुभव घडवून दिला. तेव्हा तो म्हणाला, 'आता आत शिरत नाही. '
तर या वादळाचे असे आहे. लक्ष्मीला जर तुम्ही अडवली तर येणार नाही, जेवढी असेल तेवढी भरलेलीच राहील. आणि एकीकडून जाऊ याल तर दुसरीकडून येत राहील. आणि अडवून ठेवली तर तेवढीच्या तेवढीच राहील. लक्ष्मीचे काम हे सुद्धा असेच आहे. म्हणून आता कोणत्या मार्गाने जाऊ द्यावी हे तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे की बायको मुलांच्या मौजमजेसाठी जाऊ द्यावी की कीर्तीसाठी जाऊ द्यावी, किंवा ज्ञानदानासाठी जाऊ दयावी, किंवा मग अन्नदानासाठी जाऊ दयावी ? कशासाठी जाऊ द्यावी ते तुमच्यावर अवलंबून आहे, पण जाऊ द्याल तर दुसरी येईल. जाऊ दिली नाही, तर त्याचे काय होईल? जाऊ दिली तर दुसरे नाही का येणार? हो येईल.