लक्ष्मीच्या सदुपयोगाचा अगदी खरा मार्ग कोणता आहे आता ? तेव्हा म्हणे, 'बाहेर दान देणे तो ? कॉलेजमध्ये पैसे द्यावे तो ?' तेव्हा म्हणे, नाही! आपल्या या महात्म्यांना नाश्टा दया. त्यांना संतोष देणे. तो सर्वात उत्तम मार्ग. असे महात्मा जगात कुठेही मिळणार नाहीत. तेथे सत्युगच दिसतो आणि ते सर्व आले तर कशा प्रकारे तुमचे भले होवो, हीच त्यांची भावना दिवसभर असते.
पैसे नसतील ना, तर त्यांच्याकडे राहा, जेवा, ते सर्व आपलेच आहे. समोरासमोर पारस्पारिक आहे, ज्यांच्याकडे सरप्लस आहे त्यांनी खर्च करावे. आणि अधिक जास्त असेल तर मनुष्य मात्राला सुखी करा, ते चांगले आहे. आणि त्याच्याही पुढे, समस्त जीवांच्या सुखासाठी खर्च करा.
बाकी शाळेत दयाल, कॉलेजात द्याल त्याने प्रसिद्धी होईल, पण खरे हे आहे. हे महात्मा एकदम खरे आहेत, याची गॅरेंटी देतो, भले कसेही असोत. पैसे कमी असले तरी त्यांची दानत साफ आहे आणि भावनाही फार सुंदर आहे. प्रकृती तर वेगवेगळी असतेच. हे महात्मा तर जिवंत- जागृत देव आहेत. त्यांच्या आत आत्मा प्रकट झालेला आहे. एक क्षण सुद्धा आत्म्याला विसरत नाहीत. तेथे आत्मा प्रकट झाला आहे, तेथे देव आहे.
प्रश्नकर्ता: लोकांना जेऊ खाऊ घातले तर ते फलीभूत होत नाही ?
दादाश्री : ते फलीभूत होते ना! पण ईथल्या ईथेच वाह-वाह होते, तेवढेच. याचे फळ इथल्या इथेच मिळून जाते. आणि त्याचे तेथे मिळते, वाह वाह होत नाही, ते तेथे मिळते.
प्रश्नकर्ता : अर्थात् सोबत घेऊन जावे, असेच ना ?
दादाश्री : ते सोबत घेऊन जायचे. हे जे तुम्ही दहा दिले ते तुम्ही सोबत घेऊन जाणार आणि वाह-वाह झाली म्हणजे खर्च झाले.
प्रश्नकर्ता: तर उद्यापासून सर्वांना जेवण देणे बंद करावे लागेल.
दादाश्री भोजन देणे ते तर तुमच्यासाठी अनिवार्यच आहे. अनिवार्यात तर केल्याशिवाय सुटकाच नाही.
हे तर असे आहे ना, या महात्म्यांना जेऊ घालणे, आणि बाहेरच्या लोकांना जेऊ घालणे ते वेगळे आहे. ते वाह-वाहचे कार्य आहे, इथे कोणी वाह वाह म्हणायला आले नाहीत. हे महात्मा तर! जगात असे कोणीही पुरुष भेटणार नाहीत, किंवा असे ब्राम्हण भेटणार नाहीत, की ज्यांना तुमचे काहीही घेण्याची इच्छा नसेल, कोणताही दृष्टीफेरच नाही या महात्मांना. हे महात्मा कसे आहेत, जे कोणत्याही प्रकारचा फायदा करुन घेण्यामागे नाहीत, तेव्हा असे महात्मा कुठून असतील ?! हा तर संसार सगळा स्वार्थाचा आहे, पण हे महात्मा तर करेक्ट (खरे) लोक. असे लोकच नसतात ना! या जगात तर नसणारच ना!
त्यांना अशी इच्छाच होत नाही, की हा डॉक्टर माझ्या कामाचा आहे. त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येत नाही. आणि इतर लोक तर डॉक्टर आले की लगेच विचार करतात की कधीतरी कामी येतील, तर का मेल्यांनो, फक्त औषध खाण्याकरिता ? स्वस्थ असले तरी औषध खाण्यासाठी पळता ?
हे महात्मा काय आहेत, हे माझे शब्द जर आपल्याला समजले ना, तर ते देवासारखे आहेत, पण या महात्म्यांना ते माहित नाही. यांना चहा
पाणी पाजले, खाऊ घातले, जेवण दिले, हा सर्वात मोठा यज्ञ म्हणवतो. प्रथम कक्षेचा यज्ञ. बांगड्या विकून जरी जेवण दिले ना, तरीही खूप चांगले! बांगड्या शांती देत नाहीत. महात्म्यांसोबत बसलो तर त्यांची नियत वाईट नाही. म्हणून या महात्म्यांना जितके खाऊ घालता येईल तितके घालत जा. चहा जरी पाजलात तरी फार झाले.