प्रश्नकर्ता: सगळेच लक्ष्मीच्या मागे खूप घावतात. म्हणून त्याचा 'चार्ज' (कर्म बंध) जास्त प्रमाणात होत असेल ना? त्यामुळे पुढच्या जन्मी त्याला जास्त लक्ष्मी मिळाली पाहिजे ना ?
दादाश्री आम्हाला लक्ष्मी धर्माच्या मार्गावर खर्च करायची आहे, असे जर चार्ज केलेले असेल तर जास्त लक्ष्मी मिळेल.
प्रश्नकर्ता: पण मनात असे भाव करत राहिले की मला लक्ष्मी मिळो, असे भाव केले, असे 'चार्ज' केले त्यामुळे त्याला निसर्ग लक्ष्मी नाही का देणार ?
दादाश्री : नाही, नाही, त्यामुळे लक्ष्मी मिळत नाही. लक्ष्मी मिळण्याचे जो भाव करतो ना, त्याला तर लक्ष्मी मिळायची असेल तरी मिळणार नाही, उलट त्यात अंतराय पडतील. लक्ष्मी आठवत राहिल्याने मिळत नाही. ती तर पुण्य केल्यानेच मिळते. 'चार्ज' म्हणजे पुण्याचे चार्ज केले, तर लक्ष्मी मिळते. ती सुद्धा फक्त लक्ष्मी मिळत नाही. पण पुण्य चार्ज करताना जी इच्छा असेल की, मला लक्ष्मीची खूप आवश्यकता आहे, तर त्याला लक्ष्मी मिळेल. कोणी म्हणेल मला तर फक्त धर्मच हवा आहे, तर फक्त धर्मच प्राप्त होईल, आणि पैसे नसतीलही. अर्थात् त्या पुण्याचे आपण टेन्डर भरलेले असते की मला असे पाहिजे. मग ते मिळण्यासाठी पुण्य खर्च होते. कोणी म्हणेल 'मला बंगले पाहिजे, गाड्या पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे,' तर पुण्य त्यातच खर्च होईल, धर्मात काही उरणार नाही. आणि कोणी म्हणेल 'मला धर्मच पाहिजे, मोटारी नको, मला तर एवढ्याशा दोन खोल्या असतील तरीही चालेल, पण धर्मच अधिक हवा.' तेव्हा त्याला धर्म अधिक मिळतो. आणि दूसरे सगळे कमी मिळते. म्हणजे तो पुण्याच्या स्वतःच्या इच्छेनुसर टेन्डर भरतो.