पूर्वीच्या काळात, त्यावेळी दानवीर असत. दानवीर तर मन-वचन- कायेची एकता असेल तरच जन्माला येतात, आणि त्यांना भगवंतांनी श्रेष्ठी म्हटले होते, त्या श्रेष्ठींना आता मद्रासमध्ये शेट्टी म्हणतात. अपभ्रंश होत- होत श्रेष्ठी चे शेट्टी झाले तेथे आणि तेच आपल्या येथे अपभ्रंश होत होत 'शेठ' झाले आहे.
एका मिलच्या सेठजीकडे मी त्यांच्या सेक्रेटरीशी बोलत होतो, मी विचारले, शेठ कधी येणार ? दुसऱ्या गावी गेले का ते? तो म्हणाला चार- पाच दिवस लागतील. नंतर मला म्हणाला, जरा माझी गोष्ट ऐका, मी म्हणालो 'हो भाऊ ' तर तो म्हणाला वरची मात्रा काढून टाकण्यासारखे आहे. मी त्याला समजावले की, 'आता तू पगार खातोस, तोपर्यंत बोलू नकोस.' बाकी मात्रा काढली तर शेष काय उरले ?
प्रश्नकर्ता: 'शठ' उरले.
दादाश्री पण तरी आपण असे बोलू नये, अशी दैना झाली आहे. कसे जगडुशा वगैरे सगळे शेठ झाले होते. ते सर्व शेठ म्हणवत होते.