पहिल्या प्रकारचे जे दान आहे ते आहे अन्नदान या दानासाठी तर असे म्हटले जाते की, भाऊ, एखादा मनुष्य आमच्या घरी येऊन म्हणेल की 'मला काही खायला द्या, मी उपाशी आहे.' तेव्हा म्हणावे 'बैस येथे जेवायला. मी तुला वाढतो.' हे झाले आहारदान. तेव्हा अक्कलवाले काय म्हणतील ? या तगड्या माणसाला आता खाऊ घालाल पण मग परत संध्याकाळी खायला कसे घालाल ? तेव्हा भगवंत म्हणतात तू अशी अक्कल वापरु नकोस. या व्यक्तिने त्याला खाऊ घातले तर तो आजचा दिवस तरी जगेल. मग उद्या जगण्यासाठी परत त्याला कोणी तरी दुसरे भेटेल. उद्याचा विचार आपण करायचा नाही. आपल्याला दुसऱ्या भानगडीत पडायचे नाही, की उद्या तो काय करेल ? उद्या त्याला परत मिळेल. यात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की आपण नेहमी देऊ शकू की नाही.
तुमच्याकडे आला आहे तेव्हा तुम्ही त्याला द्या. जे काही देता येईल ते दया, आज तरी तो जगला, बस! मग उद्या त्याचा दुसरा काही उदय असेल. तुम्हाला फिकीर करण्याची गरज नाही.
प्रश्नकर्ता अन्नदान श्रेष्ठ मानले जाते ?
दादाश्री : अन्नदान श्रेष्ठ मानले जाते परंतु अन्नदान किती देऊ शकता? नेहमीसाठी देत नाहीत ना लोकं. एक प्रहर खाऊ घातले तरी फार झाले. दुसऱ्या प्रहरी परत दुसरे मिळेल. पण आजचा दिवस, एक प्रहर तरी जिवंत राहिला ना? आता यातही लोक उरले सुरलेच देतात की, नवे बनवून देतात ?
प्रश्नकर्ता: उरलेलेच देतात. स्वतःचा पिच्छा सोडवतात. उरलेच आहे तर आता काय करावे ?
दादाश्री तरीही त्याचा सदुपयोग करतात, माझ्या भावा! पण जर नवीन बनवून दिले तर मी म्हणेल की ते करेक्ट आहे. वीतरागांकडे काही नियम असतील की थापा मारलेल्या चालतील ?
प्रश्नकर्ता नाही नाही असे थापा मारुन कसे चालेल?
दादाश्री : वीतरागांकडे तसे चालत नाही, इतर ठिकाणी चालेल.