प्रश्नकर्ता जसे की भारतात कस्तूरभाई लालभाई ची पिढी आहे, : तर दोन-तीन-चार पिठ्यांपर्यंत पैसे चालत राहतात, त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत. पण इथे अमेरिकेत कसे आहे की पिढी असते, पण फार तर सहा आठ वर्षात सर्वकाही संपून जाते. एक तर पैसे असले तर जातात आणि नसले तर पैसे येतात सुद्धा. तर त्याचे कारण काय असेल ?
दादाश्री : असे आहे ना, तेथील जे पुण्य आहे ना, इंडियाचे पुण्य, ते इतके चिकट असते की सारखे धुतच राहिलो, तरीही जात नाही आणि पाप सुद्धा इतके चिकट असते की धुवतच राहिलो, तरी जात नाही. म्हणजे तो वैष्णव असो की जैन असो, पण त्याने पुण्य इतके मजबूत बांधलेले असते की धुवतच राहिले तरी संपत नाही. जसे की पेटलाद चे दातार सेठ, रमणलाल शेठच्या सात-सात पिढ्यांपर्यंत संपन्नता टिकून राहिली. खोऱ्याने उपसून उपसून धन देत असत लोकांना, तरीही कधी कमी पडले नाही. त्यांनी पुण्य जबरदस्त बांधले होते, एकदम सचोटीने. आणि पापही असेच सचोटीने बांधत असत, सात-सात पिढ्यापर्यंत गरिबी जात नव्हती. अत्यंत दुःख भोगत. अर्थात् एक्सेस (अति) पण होत असे आणि मिडीयम (मध्यम) पण राहत असे,
इथे अमेरिकेत तर उतू पण जाते आणि परत बसतेही. एकदा बसल्यावर पुन्हा उतूही जाते. इथे वेळच लागत नाही. आणि तिथे भारतात एकदा बसल्यावर पुन्हा उतू जाण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणूनच तेथे तर सात-सात पिढ्यांपर्यंत चालत असे. आता सगळे पुण्य कमी झाले आहे. कारण काय होते, की कस्तूर भाऊच्या येथे जन्म कोण घेणार? तेव्हा म्हणा असेच पुण्यवान, की जे त्यांच्या सारखेच असतील, तेच तेथे जन्म घेतील? मग त्यांच्या घरी कोण जन्माला येतो? तर तसाच पुण्यशाली तेथे जन्माला येतो. यात कस्तूरभाईचे पुण्य काम करत नाही. ते मग तसाच कोणी दुसरा आला असेल त्याचे पुण्य म्हणून तर ती म्हटली जाते कस्तूरभाईची पिढी आणि सध्या तर असे पुण्यशाली आहेतच कुठे? आता गेल्या पंचवीस वर्षात तर खास असे कोणी नाहीच.