आणि चौथे आहे अभयदान. अभयदान म्हणजे आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र त्रास होऊ नये. अशा प्रकारे वागावे. तेच अभयदान.
प्रश्नकर्ता: अभयदान जरा सविस्तर समजवा.
दादाश्री : अभयदान म्हणजे आमच्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये. त्याचे एक उदाहरण देतो. मी सिनेमा बघायला जात असे, लहान वयात, बावीस पंचविसाव्या वर्षी तर परत येतांना रात्रीचे बारा-साडेबारा वाजत असत. पायी चालत येत होतो तर बुटांचा आवाज होत असे. आम्ही बुटांना घोड्याची लोखंडी नाळ लावून घेत असत म्हणून खटखट आवाज होत असे. रात्री आवाज जास्त येत असे. रात्री कुत्री बिचारी झोपलेली असत, आरामात झोपलेली असत, ते कान टवकारुन बघत. तेव्हा आम्ही समजून जात असत की तो विचारा आमच्यामुळेदचकला. आम्ही असे कसे जन्माला आलो या मोहोल्यात की आमच्या मुळे कुत्रेही भितात. म्हणून आधिच लांबूनच बुट काढून हातात घेऊन असे गुपचूप यायचो. पण त्याला दचकू देत नसत. हा लहान वयातील आमचा प्रयोग. आपल्यामुळे तो दचकला ना ?
प्रश्नकर्ता हो त्याच्या झोपेतही विशेष पडला ना ?
दादाश्री : हो तो दचकला की मग स्वत:चा स्वभाव सोडणार नाही. कधीतरी भुंकतो सुद्धा, स्वभावाच आहे त्याचा. त्यापेक्षा त्याला झोपू दिले तर काय वाईट? त्यात मोहल्यात राहणाऱ्याला तर भुंकणार नाही.
म्हणूनच अभयदान, कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये, असा भाव आधी ठेवावा आणि नंतर तो प्रयोगात येतो. भाव केले तर प्रयोगात येतात, परंतु भावच केले नसेल तर? म्हणूनच याला मोठे दान म्हणटले आहे भगवंतानी. यात पैशांची काही गरज नाही, सर्वात उच्च दान हेच आहे. श्रीमंत असले, तरी सुद्धा असे करु शकत नाहीत, म्हणून श्रीमंतानी लक्ष्मी देऊन (दान) पूर्ण केले पाहिजे.
म्हणजे ह्या चार प्रकारच्या दानाशिवाय आणखी कुठल्या प्रकारचे दान नाही, असे भगवंत सांगतात. बाकी सर्व प्रकारच्या दानाची जी गोष्ट करतात ती सर्व कल्पना आहे. ह्या चार प्रकारचेच दान आहेत, आहारदान, औषधदान, मग ज्ञानदान आणि अभयदान. शक्यतो अभयदानाची भावना मनात करुन ठेवावी.
प्रश्नकर्ता: पण अभयदानातूनच हे तिन्ही दान निघतात ? या भावनेतून ?
दादाश्री नाही, असे आहे की अभयदान तर उच्च मनुष्य करु शकतो. ज्याच्याकडे लक्ष्मी नसेल असा साधारण मनुष्य सुद्धा हे करु शकतो. उच्च पुरुषांकडे लक्ष्मी असो वा नसो. म्हणजे लक्ष्मीशी त्यांचा व्यवहार नाही, परंतु अभयदान तर ते अवश्य करु शकतात. पूर्वी लक्ष्मीपती
(श्रीमंत) अभयदान करत असत, परंतु आता त्यांच्याकडून हे होत नाही, ते कच्चे आहेत. लक्ष्मीच कमवून आणली ना, आणि ते सुद्धा लोकांना घाबरवून, घाबरवून.
प्रश्नकर्ता भयदान केले आहे ?
दादाश्री नाही, असे म्हणू नये. असे करुनही ज्ञानदानात तर खर्च करतात ना ? तेथे वाटेल तसे करुन आलेत, पण येथे ज्ञानदानात खर्च करतात ते उत्तम आहे, असे भगवंतानी म्हटले आहे.