प्रश्नकर्ता: पण समजा एखाद्या मनुष्याच्या पुण्य कर्माने त्याच्याकडे लाखो रुपये जमले, तर ते त्याने गरिबात वाटवे की स्वतःच उपयोग करावा ?
दादाश्री : नाही, घरच्या लोकांना दुःख होणार नाही अशा प्रकारे ते पैसे खर्च केले पाहिजे. घरच्या लोकांना विचारावे की, भाऊ, तुम्हाला अडचण तर नाही ना ? तेव्हा ते म्हणतील, नाही, काही अडचण नाही. तर ती लीमीट त्याची, पैसे खर्च करण्याची. म्हणून मग आपण त्यानुसार खर्च करावे.
प्रश्नकर्ता: सन्मार्गावर तर खर्च करायचा ना?
दादाश्री : मग, बाकी सगळे सन्मार्गावरच खर्च केले पाहिजे. घरात खर्च होतील, ते सारे गटारीतच जातील. आणि इतर ठिकाणी जे खर्च झाले ते तुमच्यासाठीच सेफसाइड झाली. हो, इथुन सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. पण असे दुसऱ्या प्रकारे सेफसाइड करु शकतो.
प्रश्नकर्ता: पण तसे तर ते सोबत घेऊन गेल्यासारखेच म्हटले जाइल ना !
दादाश्री : हो, सोबताच घेऊन जाण्यासारखे झाले, आपल्या सेफसाइडवाले. म्हणजे कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना सुख मिळेल, त्यासाठीच खर्च केले पाहिजे ही सगळी तुमची सेफसाइड आहे.
प्रश्नकर्ता: लक्ष्मीचा सदुपयोग कशाला म्हणतात ?
दादाश्री : लोकांच्या उपयोगासाठी किंवा मग देवासाठी खर्च केले त्यास सदुपयोग म्हटला जातो.