कसोटीच्या वेळी तर एक मात्र धर्मच आपल्या मदतीसाठी उभा राहतो, म्हणून धर्माच्या प्रवाहात लक्ष्मीजीला जावू द्यावे. फक्त एक सुषमकाळातच (जेव्हा तीर्थंकर भगवंत हजर असतात तो काळ) लक्ष्मीचा मोह करण्या योग्य होता. त्या लक्ष्मीजी तर आल्या नाहीत, आणि या सेठ लोकांना हार्ट फेईल आणि ब्लडप्रेशर कोण करवते ? तर या काळाची लक्ष्मीच करवते.
पैशांचा स्वभाव कसा आहे ? चंचल आहे. म्हणजे येतात व एक दिवस परत निघून जातात. म्हणून पैसे लोकांच्या हितासाठी वापरावेत. जेव्हा तुमचा वाईट कमांचा उदय आला असेल, तेव्हा लोकांना जे दिले असेल तेच तुम्हाला मदत करेल. म्हणून आधीच समजून जावे. पैशांचा सदुपयोग तर केलाच पाहिजे ना ?
चारित्र्याने समंजस झाला तर समजा संपूर्ण जग जींकले. मग भले जे खायचे असेल ते खाऊ दे, पिऊ दे आणि अधिक असेल तर इतरांना खाऊ घालू दे. दुसरे करण्यासारखे काय आहे? सोबत घेऊन जाता येते का? जे धन परक्यांसाठी खर्च केले, तेवढेच धन आपले, तेवढीच तुमच्या पुढच्या जन्मासाठी जमापुंजी. म्हणून जर कोणाला पुढील जन्मासाठी जमापुंजी जमवायची असेल तर धन पराक्यांसाठी वापरावे. परका जीव, त्यात कुठलाही जीव, मग तो कावळा का असेना, तो इतकेसे जरी चाखून
गेला तरीही ते तुमची जमा रक्कम. तुम्ही आणि तुमच्या मुलांनी खाल्ले ती सर्व तुमची जमा रक्कम नव्हे. ते सर्व गटारीत गेले, पण तरीही गटारीत जाणे थांबवू शकत नाही, कारण ते तर अनिवार्य आहे. त्यात काही सुटका आहे का? पण त्याचबरोबर समजले पाहिजे की परक्यांसाठी खर्च केले नाही, ते सगळे गटारीतच जाते.
माणसाला जरी खाऊ घातले नाही पण शेवटी कावळ्याला घातले, चिमण्यांना घातले, या सर्वांना खाऊ घातले तरी देखील ते इतरांसाठी खर्च केलेले मानले जाईल. माणसाच्या ताटाची किंमत तर आता फार वाढली आहे ना ? पण चिमण्यांच्या ताटाची किंमत तर खास नाही ना ? तेव्हा तुमचे जमा पण तेवढे कमीच होईल ना?