लोकांचे धन गटारीतच जात आहे ना. चांगल्या मार्गाने तर एखाद्या पुण्यवानाचेच जाते ना धन गटारीत जाते का ? प्रश्नकर्ता जातच आहे ना सगळे ?
दादाश्री : या मुंबईच्या गटारीत तर पुष्कळ धन, ढीगभर धन चालले
गेले आहे. नुसत्या मोहाचे, मोहाचा बाजारच आहे ना ! झपाट्याने धन निघून जाते. धनच खोटे आहे ना, धन पण खरे नाही. खरे धन असले तर ते चांगल्या मार्गाने खर्च होते.
सध्या संपूर्ण जगाचे धन गटारीत जात आहे. या गटारीचे पाईप रुंद केले आहे. ते कशासाठी, तर धन जाण्यासाठी जागा पाहिजे ना? कमावलेले सर्व धन खाऊन-पिऊन गटारीत वाहून जाते. एक पैसाही खऱ्या मार्गावर जात नाही, आणि जे पैसे खर्च करतात, कॉलेजमध्ये दान दिले, अमके दिले ते सर्व इगोइजम (अहंकार) आहे. इगोइजमशिवाय पैसा दिला जाईल तर तो खरा म्हटला जातो. बाकी हे तर अहंकाराला पोषण मिळत राहते; कीर्ती मिळत राहते. आरामात पण कीर्ती मिळाल्यानंतर त्याचे फळ मिळते. मग ती कीर्ती जेव्हा उलटते तेव्हा काय होते ? अपकीर्ती होते. तेव्हा उपाधीच उपाधी होते. त्याऐवजी कीर्तीची अपेक्षाच ठेवू नये. कीर्तीची अपेक्षा ठेवली तर अपकीर्ती येईल ना? ज्याला कीर्तीची अपेक्षाच नाही त्याला अपकीर्ती येईलच कशी?