आम्हाला हे सगळे जण म्हणतात की 'दादा' तुम्ही आमची खूप चिंता करता, नाही का? बरोबर आहे. पण त्यांना हे माहीत नाही की दादा चिंतेला शिवूही देत नाहीत. कारण चिंता करणारा मनुष्य काहीच करू शकत नाही. निर्वीर्य होऊन जातो. चिंता करत नसाल, तर सर्व काही करू शकता. चिंता करणारा मनुष्य तर संपूनच जातो. तेव्हा हे सर्व म्हणतात, ती गोष्ट खरी आहे. आम्ही सुपरफ्लुअस ( वरवर) सर्व काही करतो पण आत शिवू देत नाही..
प्रश्नकर्ता: खरोखर तुम्ही काहीच करत नाही? कोणी महात्मा दुःखात असेल तर तुम्ही काहीच करत नाही का ?
दादाश्री : करतो ना! परंतु ते 'सुपरफ्लुअस' आत शिवू देत नाही. बाहेरच्या भागाचे सर्वच पूर्ण करून घेतो. बाहेरच्या भागात सर्व प्रयोग पूर्ण होऊ द्यायचे. पण चिंता मात्र करायची नाही. चिंतेमुळे तर सर्व बिघडते. तुम्ही काय म्हणता? मी चिंता करावी असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
शिवू दिले तर ते काम होणारच नाही. जगात सर्वांनाच शिवत असते ना! आत शिवते म्हणून तर जगाचे काम होत नाही. आम्ही आत शिवू देत नाही म्हणून काम होते. शिवू देत नाही म्हणूनच आमचीही सेफसाईड आणि त्याची सुद्धा सेफसाईड, शिवायला द्यायचे नाही हे तुम्हाला आवडले का? तुम्ही तर शिवू दिलेले, नाही का?
प्रश्नकर्ता: खरोखर तुम्ही काहीच करत नाही? कोणी महात्मा दुःखात असेल तर तुम्ही काहीच करत नाही का?
दादाश्री करतो ना! परंतु ते 'सुपरफ्लुअस' आत शिबू देत नाही. : बाहेरच्या भागाचे सर्वच पूर्ण करून घेतो. बाहेरच्या भागात सर्व प्रयोग पूर्ण होऊ द्यायचे. पण चिंता मात्र करायची नाही. चिंतेमुळे तर सर्व बिघडते. तुम्ही काय म्हणता? मी चिंता करावी असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
शिवू दिले तर ते काम होणारच नाही. जगात सर्वांनाच शिवत असते ना! आत शिवते म्हणून तर जगाचे काम होत नाही. आम्ही आत शिवू देत नाही म्हणून काम होते. शिवू देत नाही म्हणूनच आमचीही सेफसाईड आणि त्याची सुद्धा सेफसाईड, शिवायला द्यायचे नाही हे तुम्हाला आवडले का ? तुम्ही तर शिवू दिलेले, नाही का ?
आम्ही तर हिशोब पाहून घेतला की आम्ही शिवू दिले तर इथे निर्वीर्य होईल आणि त्याचे काम होणार नाही. आणि जर शिवू दिले नाही, तर आत्मवीर्य प्रकट होईल आणि त्याचे काम होईल.
हे विज्ञान प्रेमस्वरूप आहे, प्रेमात क्रोध मान-माया लोभ वगैरे काहीही नसते. ते असेपर्यंत प्रेम नसते.