प्रश्नकर्ता: तर खरे प्रेम म्हणजे कधी कमी-जास्त होत नाही ? दादाश्री खरे प्रेम कधीही कमी-जास्त होत नाही. हे तर प्रेम जडले असेल, पण जर कधी त्याला शिव्या दिल्या तर त्याच्याशी भांडण होते आणि हार-तुरे घातले तर तो परत आपल्याला चिकटतो.
प्रश्नकर्ता: व्यवहारात तर कमी-जास्त होतच असते.
दादाश्री : या लोकांचे प्रेम तर दिवसभर कमी-जास्त होतच राहते ना! मुला-मुलींवर, सर्वावर कमी-जास्त होतच राहते ना! नातेवाईक, सर्व ठिकाणी कमी-जास्त होतच राहते अरे, स्वतःवर सुद्धा कमी-जास्त होत राहते! घटक्यात आरशात पाहिले की म्हणेल, आता मी सुंदर दिसत 4 आहे.' आणि घटक्यात म्हणेल की 'नाही, बरोबर नाही.' म्हणजे स्वत:वरचे प्रेम देखील कमी-जास्त होते. हे सर्व जबाबदारी न समजल्यामुळेच होत असते ना ! केवढी मोठी जबाबदारी !
प्रश्नकर्ता मग हे लोक म्हणतात ना, प्रेम शिका, प्रेम शिका.
दादाश्री : पण हे प्रेमच नाही ना! या सर्व लौकिक गोष्टी आहेत, याला प्रेम म्हणणारच कोण ? लोकांचे प्रेम की जे कमी-जास्त होत असते ती सर्व आसक्ती, निव्वळ आसक्तीच आहे. जगात आसक्तीच आहे. जगाने प्रेम कधी पाहिलेच नाही. आमचे प्रेम शुद्ध प्रेम आहे, म्हणून लोकांवर परिणाम होतो. लोकांना फायदा होतो, अन्यथा फायदा होणारच नाही ना!
जेव्हा केव्हा 'ज्ञानी पुरुष' किंवा भगवंत असतील, तेव्हा प्रेम बघायला मिळते. प्रेम कमी-जास्त होत नाही, ते अनासक्त असते. ज्ञानींचे असे प्रेम तोच परमात्मा आहे. खरे प्रेम तोच परमात्मा आहे. दुसरी कोणतीही वस्तू परमात्मा नाहीच. खरे प्रेम, तिथे परमात्मापद प्रकट होते !