या सर्व 'राँग बिलिफ्स (चुकीच्या मान्यता)' आहेत. 'मी चंदुभाई
आहे.' ही राँग बिलिफ आहे. मग घरी गेल्यावर आपण त्याला विचारू 'हे कोण ?' तेव्हा म्हणेल, 'मला नाही ओळखले' मी हिचा मालक (पती). ओहोहो... मोठे आले मालक ! जणू या मालकाचा कोणी मालकच नसेल अशी गोष्ट करतो ना ? या मालकाचाही कोणीतरी मालक तर असेलच ना! मग त्या वरच्या मालकाची आपण पत्नी झालो आणि आपली पत्नी ही झाली. हे कसल्या भानगडीत पडलात ? मालक व्हायचेच कशाला ? माझे 'कम्पेनियन' (जोडीदार) आहे असेच म्हणावे, मग काय हरकत आहे ?
प्रश्नकर्ता: दादाजी ही तर आपण खूप 'मॉडर्न' भाषा वापरली.
दादाश्री : मग काय ? टसल (संघर्ष) कमी होईल ना! हो, एकाच खोलीत 'कम्पेनियन' आणि ते दोघे राहत असतील, तर त्यातली एक व्यक्ती चहा बनवेल तर दुसरी व्यक्ती चहा पिणार, मग दुसरी व्यक्ती त्याच्यासाठी दुसरे काही काम करेल. असे करत 'कम्पेनियनशीप' चालत राहील.
प्रश्नकर्ता: 'कम्पेनियन' मध्ये आसक्ती असते की नाही ?
दादाश्री : हो, त्यातही आसक्ती असते, पण ती आसक्ती यांच्यासारखी नसते. यांचे तर शब्दच फार आसक्तीवाले! शब्द गाढ आसक्तीवाले असतात. 'मालक आणि मालकीण' (पती आणि पत्नी) या शब्दातच इतकी गाढ आसक्ती आहे. आणि 'कम्पेनियन' म्हटले तर आसक्ती कमी होते.