प्रश्नकर्ता: परंतु दादा, राग होतो, त्यातून अनुराग होतो नंतर त्यातून आसक्ती होत असते. आणि
दादाश्री : असे आहे की, राग हे 'कॉजेस' (कारणे) आहेत, आणि अनुराग व आसक्ती हा इफेक्ट (परिणाम) आहे.
इफेक्ट बंद करायचा नाही, कॉजेस बंद करायचे. कारण ही आसक्ती
कशी आहे? एक ताई मला म्हणते, 'आपण मला ज्ञान दिले आणि माझ्या मुलालाही ज्ञान दिले आहे. तरी सुद्धा मला त्याच्यावर इतका राग (मोह) आहे की ज्ञान दिले तरी सुद्धा राग जात नाही, तेव्हा मी म्हणालो' 'ताई तो राग नाही, ती आसक्ती आहे. ' तेव्हा ती म्हणाली, 'परंतु तशी आसक्ती राहायला नको ना ?' ही आसक्ती 'तुम्हाला, ' 'शुद्धात्माला' नाही.