आता जितका भेद मिटतो, तितके शुद्ध प्रेम उत्पन्न होते. शुद्ध प्रेम उत्पन्न होण्यासाठी आपल्यातून काय निघून जायला हवे? एखादी वस्तू निघेल तेव्हा ती दुसरी वस्तू येईल. व्हॅक्युम (शुन्यावकाश) राहू शकत नाही. म्हणजे यातून जेव्हा भेद जातो तेव्हा शुद्ध प्रेम उत्पन्न होते. अर्थात जितका भेद जातो तितके शुद्ध प्रेम उत्पन्न होते. संपूर्ण भेद मिटेल तेव्हा संपूर्ण शुद्ध प्रेम उत्पन्न होते. हीच रीत आहे.
तुम्हाला हा पॉइंट ऑफ क्यू (दृष्टीकोन) समजला ? हा वेगळ्या
प्रकारचा आहे आणि प्रेममूर्ती व्हायचे आहे. सगळे एकच वाटतील, वेगळेपण वाटतच नाही. म्हणतील 'हे आमचे आणि हे तुमचे. पण या , जगातून जाते वेळी 'आमचे तुमचे' असते का? तर या रोगामुळेच वेगळेपण वाटते, हा रोग निघून गेला, तर प्रेममूर्ती होतो.
प्रेम म्हणजे हे सर्व 'मीच आहे' 'मीच' दिसत आहे. नाही तर
'तू' म्हणावे लागेल. 'मी' नाही दिसला, तर 'तू' दिसणार. दोघांपैकी एक
तर दिसलेच ना? व्यवहारात 'मी', 'तू' असे बोलावे पण दिसला पाहिजे 'मी'च ना! प्रेम स्वरूप म्हणजे काय ? तर सर्व अभेदभावाने पाहणे. अभेदभावाने वागणे, अभेदभावाने चालणे, अभेदभावच मानणे. हे वेगळे आहेत अशा प्रकारच्या सर्व मान्यता काढून टाकाव्या. याचेच नाव प्रेमस्वरूप एकच परिवार आहे असेच वाटते.