'ही' गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा
Ayodhya Ram Mandir News: 22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन करुन भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे.