जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा (Amaravati Satara) दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाडी सुरु केली आहे. २३ जानेवारीपासून ही गाडी सुरु झाली असून भुसावळ जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गाडी क्र. ०११५५ अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी ता.२३ पासून सुरू झाली आहे.विशेष गाडी क्रमांक ०११५६ ही २८ जानेवारीस सातारा येथून साडेचारला सुटेल. अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर आहे थांबा?
अमरावतीहुन सुटल्यानंतर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या स्थानकावर थांबेल. या गाडीत सर्व १४ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असतील.
अमरावतीहुन ही गाडी दुपारी १.३० वाजेल सुटेल. त्यानंतर भुसावळ ही गाडी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटाने पोहोचेल. जळगावला ५ वाजून ३७ मिनिटाने पोहोचेल.तर पहाटे पुण्याला ती ३ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल.
आधी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस धावत होती. मात्र ही गाडी आता अमरावती-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस म्हणून सुरु आहे. नाशिक कल्याण पनवेल मार्गे न धावता आता ही गाडी अहमदनगर, दौंड मार्गे धावत आहे. दरम्यान, भुसावळ जळगावहून पुणे येथे जाण्यासाठी रेल्वेगाड्या कमी आहेत. त्यातही हुतात्मा एक्सप्रेस अमरावती येथून सुटत असलयाने गाडीमध्ये जागा मिळत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. दरम्यान, आता अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी सुरु झाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.