1- यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे ठरेल फायद्याचे– आपल्यापैकी बरेच जणांना अनुभव आला असेल की जर आपल्या खिशामध्ये रोकड असली म्हणजेच रोख पैसे असले तर आपण खर्च करताना बिनधास्तपणे खर्च करतो म्हणजे करत असलेल्या खर्चाबाबत आपल्याला नेमका अंदाज राहत नाही.
पैसे संपल्यानंतर पुन्हा एटीएम ने पैसे काढण्यावर भर देऊन परत खर्च केले जातात. परंतु या तुलनेमध्ये जर आपण यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार म्हणजेच पैसे खर्च केले तर कमीत कमी आपण दिवसभरामध्ये किती वेळा पैसे खर्च केले याची माहिती आपल्याला मिळत असते.
2- नको त्या गोष्टींवरचा खर्च टाळा– बरेच जणांना काही सुट्टी वगैरे राहिली तर कुटुंबाच्या सोबत फिरायला जातात व बरेचदा फिरायला जात असताना एखाद्या मॉलमध्ये जाऊन किंवा बाजारपेठेमध्ये जाऊन अनेक नको त्या गोष्टी खरेदी केल्या जातात. यामध्ये लहान मुलांच्या खेळणी असो किंवा सौंदर्यप्रसाधने,
घरात लागणाऱ्या काही वस्तू आपण खरेदी करतो. बऱ्याचदा अशा वस्तू आपल्या घरात आधीच असतात व तरीदेखील आपण नवीन त्या परत खरेदी करतो. यामुळे देखील बरेच पैसा खर्च होत असतो व आपल्याला तो कळत देखील नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे.
3- एकूण उत्पन्नाचे नियोजन असे करा– तुम्ही महिन्याला तुमचे जे काही एकूण उत्पन्न आहे त्याची 25% पैसे तुम्ही एका वेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करावेत व त्यातून तुमचे जे काही गुंतवणुकीच्या हप्ते असतील ते देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
म्हणजे यामध्ये तुमचे नियमित बचत खाते ज्या बँकेत आहे त्याच बँकेत तुम्ही दुसरे अकाउंट उघडावे व त्यातून तुमची इन्शुरन्सचे हफ्ते किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचे हप्ते यासोबत इतर आरडी सारखे हप्ते देखील तुम्ही या दुसऱ्या अकाउंट मधून डेबिट होतील याची सोय करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये जे पैसे शिल्लक राहतील त्यातूनच तुम्हाला खर्च भागवायचे आहेत हे लक्ष्य तुम्ही सेट करणे गरजेचे आहे व त्यानुसार नियोजन ठेवावे.
4- तुमचा बजेटची कुटुंबाला माहिती देणे गरजेचे– तसेच आपल्या घरातील जे काही सदस्य असतात ते देखील काही वस्तू विकत घेत असतात किंवा आपल्याकडे ती मागत असतात. त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांना तुमचा महिन्याचा आर्थिक बजेट परफेक्ट माहीत असणे गरजेचे आहे.
म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळतात व त्यातून किती पैसे खर्च तुम्ही करू शकतात? ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांना विश्वासात घेऊन सांगणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्यावर जो काही घरातील काही वस्तू किंवा सदस्यांच्या मागणीसाठी खर्च करण्याचा मानसिक ताण असेल तो कमी होईल.