सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? GR मध्ये करण्यात आलं स्पष्ट
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा सुधारीत जीआर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये 'सगेसोयरे'या शब्दावरुन चर्चा सुरू होती. अखेर या शब्दाचा समावेश देखील जीआरमध्ये करण्यात आला आहे.
ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्यागणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
सरकारने जारी केलेल्या जीआमध्ये सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. जीआर नुसार, अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगेसोयरे असतील. तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख जीआरमध्ये (GR) करण्यात आला आहे.