जेवढे पैसे..तेवढीच मिळणार वीज; मार्चपासून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसविणार
सोलापूर : नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीजवापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्रीफेजच्या एकूण ६८ लाख ३९ हजार ७५२ वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशेब आणखी अचूक ठेवण्यासाठी १ लाख २८ हजार ६२३ वितरण रोहित्रे व वीजग्राहकांच्या घरी टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर पश्चिम महाराष्ट्रात बसविण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.
सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीजमीटरच्या प्रणालीमध्ये ६८ लाख ४० हजार ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीजबिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे अशी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ‘वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल आणि बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येईल’ अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीजमीटरच्या प्रणालीमध्ये ६८ लाख ४० हजार ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीजबिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीजबिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे अशी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ‘वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल आणि बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येईल’ अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.
वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल. त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे.
Subscribe to Notifications
टॅग्स :Solapurसोलापूर
शहर
मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा
सेक्शन
मनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य
About UsAdvertise with UsPrivacy PolicyContact UsFeedbackSitemapTerms of UseStatutory provisions on reporting ( sexual offences )Code of ethics for digital news websites
FOLLOW US :
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
शहरं
Epaper
ताज्या