क्रिकेट आणि गेमिंग आवडणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बॅटल स्टार्स या गेममध्ये आता आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप संबंधित अपडेट देण्यात आले आहेत. यामुळे गेमिंगची मजा आणखी वाढणार आहे.
बॅटल स्टार्स ही एक 4v4 शूटर गेम आहे. यामध्ये 13 युनिक हीरोंपैकी एक तुम्ही आपला प्लेयर म्हणून निवडू शकता. या गेममध्ये असणारी कलरफुल आर्ट स्टाईल आणि गेमप्ले यामुळे अल्पावधीतच ही गेम लोकप्रिय झाली आहे.
या अपडेटनंतर गेममध्ये प्लेयर्ससाठी नवीन स्किन्स देण्यात आल्या आहेत. यात क्रिकेट वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या देशांच्या जर्सी उपलब्ध आहेत. टीम इंडियाच्या जर्सीसाठी 'टेक्नो' ही स्किन दिली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेसाठी 'झॅक', इंग्लंडसाठी 'लॉर्ड मस्क' आणि ऑस्ट्रेलियासाठी 'रेझर' अशा स्किन्स देण्यात आल्या आहेत.
यामुळे गेमर्सना क्रिकेट वर्ल्डकप आणि गेमिंग या दोन्हीची मजा अनुभवता येणार आहे. तसंच आपल्या आवडत्या क्रिकेट टीमला रिप्रेझेंट करण्याची संधीही मिळणार आहे. यासोबतच कंपनीने गेममध्ये एक नवीन रम्बल मोड देखील दिला आहे. (Gaming News)