मसाले जास्त काळ टिकत नाहीत? या टीप्स फॉलो करा, मसाले तुमची साथ कधीच सोडणार नाहीत
हिवाळ्यात आद्रता आणि गारठ्यामूळे मसाले खराब होण्याची भीती
Masala Save Tips : हिवाळ्यात आद्रता आणि गारठ्यामूळे मसाले खराब होण्याची भीती असते. त्यामूळे त्यांना सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण ते एकदा खराब झाले की, नंतर वापरता येत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात तूमचे लाडके मसाले सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स सांगणार आहोत.
1.मसाले फ्रिजमध्ये ठेवणे योग्य?
फ्रीजमध्ये तुम्ही जे काही ठेवता ते खराब होत नाही आणि ते तुम्ही बरेच दिवस वापरू शकता. पण मसाल्यांसोबत असे करणे योग्य नाही. मसाले फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव नष्ट होते. केवळ चोथा शिल्लक राहतो. त्यामूळे मसाले फ्रीजमध्ये ठेऊ नका.
2.बंद डब्यात ठेवा मसाले
मसाले जर ओले झाले तर ते लवकर खराब होतात. त्यामुळे मसाल्यांना ओलावा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. त्यासाठी हवा बंद डब्याचा वापर करा. आणि मसाले जर जास्त दिवस हवा बंद डब्यात ठेवत असाल तरही ते खराब होऊ शकतात.
3.काचेच्या डब्यांचा वापर करा
मसाले काय अनेक जण वापरत असतात, पण त्या ठेवण्याच्या पद्धतीही अनेकांच्या एक सारख्याच आहेत. प्लास्टीक डबा किंवा स्टीलच्या डब्यात ठेवले जातात, मात्र पावसाळ्याच्या दिवसात काचेच्या डब्यात मसाले ठेवाल तर ते अधिक काळ फ्रेश राहतील.
4. मसाले गरम करा
मसाल्यांमध्येही अनेक प्रकार असतात, खडा मसाला हाही त्यातीलच एक प्रकार त्यामुळे ते खराब होऊ नये असे वाटत असेल तर मसाल्यांना गरम करा आणि ठेवा. त्यामुळे मसाल्यांना बुरशी आणि किडही लागत नाही आणि त्याचा स्वादही चांगला राहतो.