कोणताही व्यवहार करा, आणि मिळवा 30 रुपयांचा कॅशबॅक या यूपीआय अॅपमधून पैसे कमावण्याची उत्तम संधी
यूपीआय पेमेंट सुरू झाले तेव्हा गुगल पे, पेटीएम, फोनपे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरघोस कॅशबॅक देत होते. हा कॅशबॅक केव्हा कमी करून २ रुपये करण्यात आला माहीत नाही, आता तो ४ रुपये झाला आहे. ...
गेल्या चार-पाच वर्षांपासून ग्राहकांना याचा विसर पडला होता. कंपन्या रम्मी सर्कलसारख्या अॅप्सवर कॅशबॅक ऑफर देत होत्या. पण सध्या एक अॅप आहे जे गेल्या चार-पाच दिवसांपासून जवळपास प्रत्येक व्यापारी व्यवहारावर ३० रुपये कॅशबॅक देत आहे.
यासाठी भीम अॅपचा वापर करावा लागेल. भीम अॅपवर सध्या कॅशबॅक रोल आउट केला जात आहे. पाचपैकी तीन ते चार यूपीआय ट्रान्झॅक्शनवर अनेकांना ३० रुपये कॅशबॅक मिळत आहे, त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे भीम अॅप अपडेट व्हायला हवे.