Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन यशस्वी झाले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. या यानाने अचूक लँंडिग केले असून निश्चित जागेवरच हे यान लँड झाले आहे. चंद्रावर यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे. भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.
याआधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष जपानच्या या मून मिशनकडे होते. विशेष जपानी स्पेस एजेन्सीने या यानाच्या लँंडिग बाबत केलेला दाव खरा ठरला आहे. कारण हे यान सुनिश्चित केलेल्या जागेवरच लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने लँडिंगसाठी 600x4000 किमी जागा निवडली होती. या जागेत 100 मीटरच्या आतच या यानाने अचूक लँडिंग केले आहे. चंद्रावरील शिओली क्रेटर या जागेवर जपानचे हे यान लँड झाले.