Gyanvapi Survey: ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पे; ASI सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर
Gyanvapi Survey : मशिदीतील ASI सर्वेक्षण अहवालातून 15 शिवलिंगे आणि विविध काळातील 93 नाणीही सापडली आहेत. दगडी मूर्तींबरोबरच विविध धातू आणि टेराकोटासह घरगुती वापराच्या २५९ वस्तू सापडल्या. एका दगडावर राम लिहिले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशीद संकुलात एकूण ५५ दगडी हिंदू देवतांची शिल्पे आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये १५ शिवलिंगे, तीन विष्णू शिल्पे, गणेशाची तीन, नंदीची दोन शिल्पे, दोन कृष्णाची तर पाच हनुमानाची शिल्पे असल्याचे ASI अहवालात नमूद केले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या टीमला ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात 55 हिंदू देवतांची शिल्प सापडले आहेत. त्याचबरोबर विविध काळातील 93 नाणीही सापडली आहेत. दगडी मूर्तींबरोबरच विविध धातू आणि टेराकोटासह घरगुती वापराच्या २५९ वस्तू देखील सापडल्या आहेत. यापैकी एका दगडावर राम लिहिलेले आहे. जीपीआर सर्वेक्षणात, मुख्य घुमटाखाली मौल्यवान पाचूच्या आकाराचा तुटलेला मौल्यवान धातू सापडला आहे. याचे मुख्य शिवलिंग म्हणून वर्णन केले जात आहे. या ठिकाणी खाणकाम व सर्वेक्षण करण्यात आले आहे.