NITTT परीक्षा 10, 11, 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग (National initiative for technical teachers training-NITTT) परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. NITTT परीक्षा 10, 11, 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nittt.ac.in वर जाऊन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात.
तीन तासांच्या कालावधीसाठी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत आहे. प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील, ज्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी असेल. एनआयटीटीटी परीक्षा ऑनलाइन रिमोट प्रोक्टोर्ड पद्धतीने घेतली जाईल. उमेदवारांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. उमेदवार त्यांच्या लॅपटॉप आणि वैयक्तिक संगणकावर त्यांच्या स्वतःच्या घरातून परीक्षा देऊ शकतात, असे NTA कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
NITTT परीक्षेसाठी NTA च्या वेबसाइटवर 30 जानेवारी 2024 रोजी हॉल तिकीट प्रसिद्ध केली जातील. परीक्षेपूर्वी 07 फेब्रुवारी 2024 रोजी मॉक टेस्ट घेतली जाईल. वेबिनारमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मॉक टेस्टला बसण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर हॉल तिकीट आणि ईमेलद्वारे विशिष्ट माहिती दिली जाणार आहे.