बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी नागपंचमीच्या दिवशी सध्याच्या जळगाव जिल्ह्यातील खानदेश भागातील आसोदे येथे महाजन कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई आणि वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. तिला घमा, गण आणि घाना असे तीन भाऊ आणि अहिल्या, सीता आणि तुळसा या तीन बहिणी होत्या. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १८९३ मध्ये जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर विधवापणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक परिस्थितीमुळे त्यांनी अत्यंत खडतर जीवन व्यतीत केले. त्यांना काशी नावाची एक मुलगी व मधुसूदन व सोपानदेव (१९०७-१९८२) ही दोन मुले झाली, असा त्यांचा जीवन पारिचय पुढील लेखात त्यांच्या कविता बघु..