HDFC Bank: महिन्याभरात काढले दिवाळे, आता आली फायद्याची अपडेट; शेअर्स तेजीत येणार, फायदा घ्यावा?
HDFC Bank Share Price : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये काही विशिष्ट कारणामुळे विक्रीचा दबाव दिसत आहे का? तुम्ही सध्याच्या पातळीवर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे आहे का, हे देखील जाणून घ्या. देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेच्या स्टॉकमध्ये पडझड झाली, पण आता अशा काही बातम्या समोर आल्या ज्यामुळे शेअरमध्ये परत तेजी पाहायला मिळू शकते.
मुंबई : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळायला मिळाली आहे. एचडीएफसीचे शेअर सातत्याने घसरत असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीच्या शेअरमध्ये गेल्या काही सत्रांमध्ये लक्षणीय घसरण झाली आणि खासगी बँकेचे मार्केट कॅपही १०.९० लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. पण एचडीएफसीच्या शेअर्समध्ये ही घसरण अशीच झालेली नाही.
मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीला HDFC बँकेतील ९.९९% हिस्सा खरेदी करण्यासाठी आरबीआयचा हिरवा कंदील मिळाला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एलआयसीला पेड-अप शेअर कॅपिटल किंवा HDFC बँक लिमिटेडच्या मतदान अधिकारांमध्ये हिस्सा घेण्यास मान्यता दिली आहे. एलआयसीने आरबीआयकडे सादर केलेल्या अर्जाच्या संदर्भात मंजुरी देण्यात आली.