Stock Market Update Today : शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्सने गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. अशात स्टर्लिंग आणि विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे शेअर्सही मल्टीबॅगरच्या लिस्टमध्ये सामील झाले असून या शेअरने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत आकर्षक परतावा दिला आहे.
मुंबई : भारतातील रिन्यूएबल (नूतनीकरणक्षम) ऊर्जा क्षेत्रातील वाढती पर्यावरणीय चिंता, सरकारी मदत आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ही एक आकर्षक संधी निर्माण करत आहे. देशांर्तगत शेअर बाजारात सध्या आणखी एक स्टॉक वेगाने मुसंडी मारत असून अवघ्या चार वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. तर गेल्या एका महिन्यात शेअरमध्ये कमालीची वाढ झाली असून ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी स्टर्लिंग आणि विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी ५% अप्पर सर्किटसह ५७७ रुपयांवर ट्रेंड करत होता.
गेल्या एका महिन्यात एनर्जी क्षेत्रातील या स्टॉकने ३१% हून अधिक परतावा दिला असून ५७७ रुपये शेअरका उच्चांक आहे, तर १९ ऑक्टोबर रोजी या कंपनीच्या शेअरने २५३ रुपयाचा नीचांक नोंदवला असून कंपनीचे मार्केट कॅप १०,४१८ कोटी रुपये आहे. तसेच स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये २८% तेजी पाहायला मिळाली असून अवघ्या सहा महिन्यांत स्टॉकने ५८.७२% परतावा दिला आहे.