LPGच्या दरांमध्ये होणार बदल
अर्थमंत्री निर्मला सीतारमन ह्या बजेटच्या भाषणाला सुरुवात करतील तेव्हा त्या गॅसच्या किंमतींबाबत घोषणा करणयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऑईल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. त्यामुळे गुरुवारी १ तारखेला अर्थमंत्री गॅसदर कमी करण्याची घोषणा करु शकतात.
IMPS मनी ट्रान्सफर
१ फेब्रुवारी २०२४ पासून आयएमपीएस मनी ट्रान्सफर करताना युजर केवळ रिसिव्हरचा मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंटवरुन पैसे पाठवू शकेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार आता लाभार्थी आणि IFSC कोची गरज पडणार नाही. हा निर्णय होऊ शकतो.
NPS व्हिड्रॉल
पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलंपमेंट अथॉरिटीने जानेवारी महिन्यात परिपरत्रक काढून एनपीएसमधील पैसे काढण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे सांगितलं होती. यामध्ये ग्राहकाला पहिल्या घराच्या खरेदीसाठी काही पैसे काढता येणार आहेत. या निर्णयाची घोषणा गुरुवारी होऊ शकते.
फास्टॅग केवायसी
फास्टटॅगसाठी आता केवायसी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ज्यांचं केवायसी नसेल त्यांचं फास्टटॅग ३१ जानेवारीनंतर निष्क्रिय होणार आहे. साधारण १.२ कोटी डुप्लिकेट फास्टॅग्सवर कारवाई होणार आहे.
गृहकर्जासंदर्भात घोषणा होणार
गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क आणि व्याजदराबाबत अर्थसंकल्पामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय एफडीमधील गुंतवणुकीच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता आहे.
सॉवरेन गोल्ड बाँड
फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक सॉवरेन गोल्ड बाँडचा शेवटचा टप्पा करण्याची शक्यता आहे. SFB 2023-2024 मधील ही मालिका फेब्रुवारी महिन्यात जारी होणार आहे.