AI Krutrim : ओलाच्या सीईओंनी लाँच केलं भारताचं पहिलं एआय प्लॅटफॉर्म 'कृत्रिम'; मिळणार 22 स्थानिक भाषांचा सपोर्ट
Ola Krutrim AI : भारतात चॅटजीपीटी आणि बार्ड या दोन तगड्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला कृत्रिम तगडी टक्कर देऊ शकतं.
India's Own AI Krutrim Launched :
ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आज भारताचं पहिलं फुल-स्टॅक एआय टूल लाँच केलं. कृत्रिम असं या AI टूलचं नाव आहे. या टूलची खासियत म्हणजे, हे तब्बल 22 भारतीय भाषांना ओळखू आणि समजू शकतं. यामुळेच भारतात चॅटजीपीटी आणि बार्ड या दोन तगड्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला कृत्रिम तगडी टक्कर देऊ शकतं.
कृत्रिम हे चॅटजीपीटी किंवा इतर एआय टूल्सप्रमाणेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहे. सोबतच कविता करणे, कथा लिहिणे आणि कोडिंग करणे अशी कामंही हे एआय टूल आरामात करू शकेल.कृत्रिम हे चॅटजीपीटी किंवा इतर एआय टूल्सप्रमाणेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहे. सोबतच कविता करणे, कथा लिहिणे आणि कोडिंग करणे अशी कामंही हे एआय टूल आरामात करू शकेल.