तामिळनाडूमध्ये होत असलेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओपन एआय कंपनीचा चॅटबॉट वापरण्याचा आपला अनुभव शेअर केला.
Anand Mahindra on ChatGPT : देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. विविध नवीन गोष्टींबाबत ते अगदी खुल्या मनाने आपली प्रतिक्रिया देतात. नुकतीच त्यांनी चॅटजीपीटी या एआय टूलबाबत (AI Tool) देखील आपलं मत व्यक्त केलं आहे
तामिळनाडूमध्ये होत असलेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ओपन एआय कंपनीचा चॅटबॉट (Open AI Chatbot) वापरण्याचा आपला अनुभव शेअर केला. ते म्हणाले, की "इव्हेंटच्या आधीच मी एआय चॅटबॉटला हे विचारलं की तामिळनाडूमध्ये का गुंतवणूक करावी? यावर मला नक्कीच काही चांगली उत्तरं मिळाली." एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ह्यूमन टच'चा अभाव
आपल्या भाषणामध्ये घेण्यासाठी आनंद महिंद्रांना (Anand Mahindra) चॅटजीपीटीने बरेच मुद्दे सांगितले. तामिळनाडूमध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल्ड वर्कफोर्स आहे, पोर्ट एरिया विकसित आहे, चांगलं शिक्षण दिलं जातं, सरकारचा पाठिंबा आहे अशा बऱ्याच गोष्टी चॅटजीपीटीने सांगितल्या