Artificial Intelligence : ‘एआय’चा ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम; आंतररराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकीत
आगामी , काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) चाळीस टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ताज्या विश्लेषणात म्हटले आहे.
AI stealing Jobs : आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) चाळीस टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ताज्या विश्लेषणात म्हटले आहे. ‘एआय’मुळे जगभरात विषमतेचे चित्र अधिक विदारक होणार असल्याचे ‘आयएमएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्याकडून सांगण्यात आले. (IMF on Jobs)
‘जगभरातील नियोजनकर्त्यांनी या ट्रेंडचा गांभीर्याने विचार करूनच पुढची पावले टाकावीत तसेच या तंत्रज्ञानामुळे सामाजिक तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी, ‘एआय’च्या प्रसाराचे जसे फायदे आहेत तेवढीच जोखीमही त्यामुळे निर्माण होऊ शकते,’ असे जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे. ‘प्रगत देशांमध्ये ‘एआय’चा तब्बल ६० टक्के नोकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे.