टांझानियातील भारतीय उच्चायुक्त आणि टांझानियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि कला मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
टांझानियातील भारतीय उच्चायुक्त आणि टांझानियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि कला मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
'इंडिया-टांझानिया फ्रेंडशिप रन' उपक्रमांतर्गत भारत आणि टांझानिया यांच्यात काल १२० किलोमीटरची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. टांझानियामध्ये दार ए सलाम शहर आणि ऐतिहासिक बगामोयो शहर दरम्यान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय अभिनेते आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांनी भारतीय आणि टांझानियाच्या समुदायातील 4,000 हून अधिक लोकांसह या शर्यतीत भाग घेतला.
टांझानियातील भारतीय उच्चायुक्त आणि टांझानियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि कला मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.टांझानियाचे विधी आणि घटनात्मक कार्य मंत्री पिंडी चाना यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला आणि दोन्ही देशांना एकत्र आणण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
'फिट इंडिया मूव्हमेंट'च्या भावनेचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे भारताचे आयुक्त बिनया एस. प्रधान यांनी सांगितले.