Elon Musk Grok AI : आता भारतात देखील उपलब्ध होणार इलॉन मस्कचा 'ग्रॉक' एआय चॅटबॉट; भन्नाट आहेत फीचर्स
Musk Grok AI : आता भारतात देखील उपलब्ध होणार इलॉन मस्कचा 'ग्रॉक' एआय चॅटबॉट; भन्नाट आहेत फीचर्स
Elon Musk xAI Chatbot Grok available in India :
चॅटजीपीटी लाँच झाल्यापासून सगळीकडे एआयची चर्चा सुरू आहे. ओपन एआयनंतर कित्येक मोठमोठ्या टेक कंपन्यांनी स्वतःचे एआय टूल्स किंवा चॅटबॉट्स लाँच केले आहेत. यातच इलॉन मस्कच्या एक्स एआय या कंपनीने देखील आपला 'ग्रॉक' हा चॅटबॉट लाँच केला होता. आता हा चॅटबॉट भारतात देखील उपलब्ध झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मस्कने Grok AI चॅटबॉटचं अधिकृत लाँचिंग केलं होतं. हा चॅटबॉट चॅटजीपीटी आणि गुगल बार्डला टक्कर देत आहे. विशेष म्हणजे या चॅटबॉटची उत्तर देण्याची पद्धत अगदीच खास आहे. सध्या केवळ एक्सचं (ट्विटर) सबस्क्रिप्शन असणाऱ्या यूजर्सनाच या चॅटबॉटचा अॅक्सेस मिळणार आहे.