GPT Store : स्वतः चॅटबॉट बनवा, विका अन् पैसे कमवा! ओपनएआयचं 'जीपीटी स्टोअर' सुरू
OpenAI : सध्या या जीपीटी स्टोअरवर काही चॅटबॉट्स उपलब्ध आहेत. लवकरच इतर कंपन्यांचे चॅटबॉट्स देखील इथे उपलब्ध होतील असं कंपनीने म्हटलं आहे.
सध्या या जीपीटी स्टोअरवर काही चॅटबॉट्स उपलब्ध आहेत. लवकरच इतर कंपन्यांचे चॅटबॉट्स देखील इथे उपलब्ध होतील असं कंपनीने म्हटलं आहे. यामध्ये लाईफस्टाईल, रायटिंग, रिसर्च अशा विविध प्रकारच्या कॅटेगरी दिल्या आहेत. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही उपलब्ध चॅटबॉट किंवा एआय टूल्स पाहू शकता.
असा बनवा चॅटबॉट
विशेष म्हणजे, चॅटबॉट बनवण्यासाठी देखील तुम्ही चॅटजीपीचीच्याच एका सेवेची मदत घेऊ शकता. GPT बिल्डर या टूलच्या मदतीने, कोडिंग येत नसलं तरीही तुम्ही स्वतःचा चॅटबॉट बनवू शकता. अशाच प्रकारे तुम्ही इतर प्रकारचे एआय टूल्स किंवा जीपीटी देखील बनवू शकता. (OpenAI GPT Builder Tool)
प्लॅन विकत घेण्याची गरज
आपला चॅटबॉट किंवा टूल जीपीटी स्टोअरवर लाँच करण्यासाठी यूजरकडे चॅटजीपीटी टीम किंवा चॅटजीपीटी प्लस यांपैकी एक प्लॅन असणं गरजेचं आहे. यानंतर आपलं ओपन एआय अकाउंट व्हेरिफाय करून घ्यावं लागणार आहे. सोबतच, आपण तयार केलेला चॅटबॉट देखील तुम्हाला ओपन एआयच्या नव्या रिव्ह्यू सिस्टीमकडून तपासून घ्यावा लागणार आहे. (ChatGPT Plans)