Job Skills : 2024 मध्ये नोकरी शोधताय? ‘ही’ पाच कौशल्ये तुमच्याकडे असणं आवश्यक
Job Skills required in 2024
सध्या जगात कामाचे स्वरूप बदलत चालले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजंन्स (AI) आणि सतत बदलणारे तंत्रज्ञान, बदललेल्या व्यावसायिक गरजा, ग्राहकांच्या वर्तनात झालेले बदल यामुळे सध्याची कामकाजाची पद्धत ही पूर्णपणे बदललेली आहे.
या सर्व गोष्टींमुळे सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेत काम करताना अनेक कर्मचाऱ्यांवर दबाव येत आहे. परंतु, तुम्हाला घाबरून जाण्याची काही गरज नाही. या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी तरूणांना सतत विविध कौशल्ये शिकत रहावी लागतात.
नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरूणांना ही कौशल्ये माहित असणे आणि ती समजून घेणे महत्वाचे आहे. हे जर तुम्ही समजून घेतले तर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल.
कोणती आहेत ही कौशल्ये? जी तुम्हाला २०२४ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील. चला तर मग जाणून घेऊयात या कौशल्यांबद्दल.
डेटा साक्षरता आणि विश्लेषण
सध्याच्या काळात डेटा ही जगातील सर्वात मोठी वस्तू बनली आहे. सर्व प्रकारच्या दैनंदिन कामांसाठी आणि कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण सर्वजण या डेटावर अवलंबून आहोत.
अगदी लहान ते मध्यम उद्योगांपासून ते भल्यामोठ्या कॉर्पोरेशन्सपर्यंत डेटा वापरण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. या सर्व कारणांमुळेच, अनेक कंपन्या मूलभूत डेटा साक्षरता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये अवगत असलेल्या तरूणांची कामासाठी निवड करतात.
आता यासाठी तुम्हाला अगदी डेटामधील भरपूर ज्ञान असावे, असे काही नाही. मात्र, तुम्हाला कमीतकमी यातील बेसिक गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे आणि अशा तरूणांची निवड करण्यासाठी कंपन्या प्राधान्य देत आहेत.
कल्पकताकल्पकता
कोणतेही क्षेत्र असो तुम्हाला तिथे तुमची क्रिएटिव्हीटी (कल्पकता) ही दाखवावीच लागते. जर तुम्हाला सध्याच्या काळात तुमच्या नोकरीमध्ये टिकून रहायचे असेल तर कामाप्रती क्रिएटिव्ह असणे हे फार महत्वाचे आहे. अनेक कंपन्या अशाच उमेदवारांची निवड करतात, जे नवीन आयडियाज एक्सप्लोअर करण्यावर भर देतात आणि आव्हानांना तोंड देऊ शकतात.
तुमचे हे कौशल्य दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही आकर्षक पद्धतीने तुमचा सिव्ही डिझाईन करणे होय. जेणेकरून तुम्ही भूतकाळात केलेल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडेल.
तुम्ही विविध प्रकारच्या जॉब वेबसाईट्स, लिंक्डइनवर ही स्वत:च्या कामाचे वेगळेपण दाखवणारी एखादी आकर्षक ओळ लिहू शकता आणि कंपन्यांचे लक्ष वेधू शकता. याचा तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.