Microsoft AI Training : भारतातील एक लाख डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट देणार एआय प्रशिक्षण! 'ऑडेसी इनिशिएटिव्ह'ची घोषणा
AI Odyssey Initiative : या माध्यमातून डेव्हलपर्सना एआय तंत्रज्ञानाचा आपल्या कामासाठी आणि बिझनेस गोल्स पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.
Microsoft to train Indian Developers : जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असणारी मायक्रोसॉफ्ट ही भारतातील एक लाख तरुणांना एआयचे प्रशिक्षण देणार आहे. सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली. एआय ऑडेसी इनिशिएटिव्हच्या (AI Odyssey Initiative) माध्यमातून कंपनी एआय तंत्रज्ञान आणि टूल्सची माहिती डेव्हलपर्सना देईल.
"या प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेव्हलपर्सना एआयबाबत माहिती देण्यात येईल. सोबतच एआय तंत्रज्ञानाचा आपल्या कामासाठी आणि बिझनेस गोल्स पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो याबाबतही प्रशिक्षण देण्यात येईल." असं कंपनीने स्पष्ट केलं. बिझनेस स्टँडर्डने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Microsoft AI Odyssey)
हे एक महिन्याचं प्रशिक्षण सर्वांसाठी खुलं असणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींना कोणत्याही प्रकारचा पूर्व अनुभव असणं गरजेचं नाही. डेव्हलपर्सना केवळ एआय ऑडेसी पोर्टलवर (AIOdyssey portal) जाऊन यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर लर्निंग मॉड्यूल आणि अभ्यासाचे साहित्य याचा अॅक्सेस सर्व प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.