shabd-logo

भूदान

28 June 2023

6 पाहिले 6


शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोबांनी रस्त्यात असणाऱ्या तुरुंगातील कम्युनिस्ट पुढाऱ्यांना भेटण्याची परवानगी मिळविली. दोन तास त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती विनोबांनी कम्युनिस्ट पुढाऱ्यांना समजावले की, "आपली समतेची मागणी सर्वांना मान्य असली तरी कोणताही समाज आजपर्यंत तो दावा पूर्ण करू शकलेला नाही, आणि तो केव्हा पूर्ण होईल याचा भरवसाही नाही, पण यासाठी आपला जो हिंसेचा मार्ग आहे तो आपण थांबवावा. 

"१८ एप्रिलला विनोबा पोचमपल्ली या गावी पोहोचले. हे गाव कम्युनिस्ट चळवळीचे केंद्र समजले जाई. गावात गेल्याबरोबर गावातील ४० दलितांनी त्यांना प्रार्थना केली की, "जर आम्हाला थोडीसी जमीन मिळाली तर आमचा उदरनिर्वाह चालू शकेल." काही काळ विनोबा अस्वस्थ झाले. त्यांच्या दुःखाचे निवारण कसे होईल? शासनाकडून जमीन मिळवून द्यावी, असाही विचार क्षणभर त्यांच्या मनात आला. पण दुसऱ्याच क्षणी त्यांना त्यांच्यासमोर असणाऱ्या श्रोत्यांनाच आवाहन केले की या श्रोत्यात कोण असा व्यक्ती आहे जो या दलिताची गरज पूर्ण करू शकेल? असा प्रश्न विनोबांनी करताच एक तरुण उभा -राहिला आणि हात जोडून विनोबांना म्हणाला, "मी शंभर एकर देण्यास तयार आहे." त्या तरुणाचे नाव होते रामचंद्र रेड्डी. सांयकाळाच्या सभेत विनोबांनी सद्गतीत होत पहिल्या भूदानाची घोषणा केली. या घटनेविषयी विनोबा सांगत, "मी जमीन मागितली आणि मला जमीन मिळाली यात मला ईश्वरी संकेत आढळून आला. त्या दिवशी मी झोपू शकलो नाही, पण ईश्वराकडून मला संकेत मिळाला, अहिंसा मूलक श्रद्धा असेल तर तुला संधी मिळाली आहे तू मागत जा तुला जमीन मिळेल, माझ्या लक्षात आले की देवाचे काम अपूर्ण नसते तो बाळाच्या पोटात भूक तर आईजवळ दूध देतो, जो मला दान मागण्याची प्रेरणा देतो तो इतराना मला दान देण्याची प्रेरणा देईल. "

विनोबा पुढे म्हणतात, "हवा, पाणी, प्रकाशाची निर्मिती ज्याप्रमाणे देवाने केली आणि त्यावर जसा सर्वाचाच अधिकार आहे, त्याचप्रमाणे ही जमीनही देवानेच निर्माण केलेली आहे, ती आपणा सर्वांची माता आहे. आपण तिचे मालक होऊ शकत नाही, म्हणून भूमिसमस्या सोडवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, ही एक जागतिक समस्या आहे. भूदान यज्ञ भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे.'पुन्हा एकदा विनोबा प्रकाश झोतात आले. पं. नेहरूंनी लोकसभेत विनोबांचा गौरव करताना म्हटले, "एका किरकोळ प्रवृत्तीच्या माणसाने तेलंगणात अहिंसेच्या जोरावर शांती आणि व्यवस्था निर्माण केली जे पोलिसांनाही शक्य झाले नसते. "न्यूयॉर्क टाईम्सचा विशेष प्रतिनिधी राबर्ट ट्रम्बल यांनी विनोबांचा उल्लेख 'प्रेमाने लुटणारा' आणि 'जमीन वाटप करणारा देव' असा केला तर प्रसिद्ध टाईम मासिकाने 'गांधीचा सच्चा चेला' म्हणून विनोबांचा गौरव केला. राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी "जीवनाच्या स्वप्नातील समाज निर्मितीची सुरुवात" असे म्हटले होते. डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रीय प्रतीक' म्हणून विनोबाच्या भूदान चळवळीची महती सांगितली.

तेलंगणाच्या दोन महिन्याच्या पदयात्रेत १२ हजार एकराचे दान मिळाले. तुम्ही पाच भाऊ असाल तर मी सहावा, मी दरिद्री नारायणाचा प्रतिनिधी गरीबांच्या वतीने न्याय्य हक्क मागतो आहे, दान म्हणजे भिक्षा नव्हे, दान म्हणजे सम विभाजन देशावर संकट आले की यज्ञ करण्याची भारताची परंपरा आहे. आजच्या संकटातून मुक्त होण्यासाठी भूदान यज्ञात जमीन अर्पण करा. लोकांना हे विचार पटत आणि ते जमीनीचे दान करीत. कम्युनिस्टांच्यावतीने शहरात पळून गेलेल्या जमिनदारांना ते सांगत, भूमिहीन तुमचेच भाऊ आहेत त्यांना जमीन देऊन त्यांची दुःखे दूर करणे तुमचे काम आहे, तुम्ही त्यांना प्रेमाने आपलेसे करा, तुम्हाला भीतीने शहरात जावे लागणार नाही." कम्युनिस्टांना ते म्हणत, "असे रात्री बेरात्री येऊन काय लुटता माझ्यासारखे दिवसाढवळ्या प्रेमाने लुटायला शिका." सरकारच्या सैनिकांना सांगत, 'कम्युनिस्ट काही वाघ नाही. बंदुकीने वाघाची शिकार करता येते, पण कम्युनिस्ट तर चिंतन शूर आहे, त्यांच्याजवळ एक विचार आहे. विचाराचा मुकाबला विचारानेच होऊ शकतो, गरिबांना सांगत, कत्तलीने कधी कुणाचे भले झालं का? अहिंसेने आपला न्याय हक्क मिळवा. तेलंगाणाहून पवनाराला परत जाताना विनोबांनी वरोरा येथील आनंदवनात बाबा आमटेंची भेट घेतली. "कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला म्हणून 'आनंदवन' हे नाव सार्थ आहे." असे मत आनंदवनाबाबत व्यक्त केले. २५ जून १९५१ रोजी विनोबा सेवाग्राममध्ये दाखल झाले. १२ सप्टेंबर १९५१ रोजी विनोबा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात विचारविनिमयासाठी दिल्लीला रवाना झाले. या पदयात्रेतही विनोबांना पहिल्या सात दिवसात एकशे दहा मैलाच्या पदयात्रेत दोन हजार एकर जमीन मिळाली. २ ऑक्टोबर रोजी विनोबा सागर (मध्यप्रदेश) येथे पोहचले. तेथील एका व्याख्यानात त्यांनी सांगितले की, "देशात एकूण एक कोटी भूमिहीन आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबात पाच जण गृहीत धरले तर पाच कोटी जनतेसाठी तितकेच एकर जमीन आवश्यक आहे." पुढे उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे जाताना त्यांनी उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या भावनेला हात घातला. उत्तर प्रदेशच्या हृदयावर तुलसी रामायणाचीच सत्ता चालते हे ओळखून तुलसीदासाच्या 'सबै भूमि गोपालकी' ह्या वचनाची आठवण त्यांनी जनतेला करून दिली. भूमी समस्या सोडविण्याचे तीनच मार्ग आहेत असे विनोबा सांगत, कत्तल, कायदा, करुणा, कत्तलीचा मदतीने रशिया व चीन या देशांनी जमीनीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. अद्यापतरी त्यांना यश मिळाले नाही. प्रतिहिंसा मात्र त्यातून सुरु होते. कायद्याच्या मदतीने हा प्रश्न सोडवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतील म्हणून करुणेच्या मार्गाने जमीनीचे व प्रेमाचे वाटप होऊ शकेल. परिणामी उत्तर प्रदेशाच्या वास्तव्यात त्यांना एकूण एकोणीस हजार एकर जमीन भूदानात मिळाली.

पहिली पंचवार्षिक योजनाः १३ नोव्हेंबर १९५१ रोजी विनोबा दिल्लीला पोहोचले. दिल्लीत त्यांचा मुक्काम राजघाटावर होता. योजना आयोगाच्या सभासदाशी त्यांनी सतत तीन दिवस चर्चा केली. पण ती चर्चा निष्फळ ठरली. कारण विनोबांच्या मते पंचवार्षिक योजनेत खालील पाच गोष्टींना प्राधान्य असले पाहिजे.

१) प्रत्येकास काम देण्याची हमी, त्यांचा उदरनिर्वाह व काम या दोन्ही देणारी व्यवस्था नियोजनातून निर्माण व्हावी.

 २) अशी व्यवस्था अस्तित्वात येईपर्यंत ग्रामोद्योगाचे अस्तित्व मान्य करून त्याला प्रोत्साहन मिळाले.

३) अन्नधान्याची आयात थांबवून त्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी शेती सुधारणा व्हावी. शेती सुधारणा म्हणजे शेतीचे एकत्रीकरण किंवा शेतीचे राष्ट्रीयीकरण नव्हे. जमीनीच्या लहान लहान तुकड्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही हे सिद्ध करून द्यावे लागेल. 

४) गोवंश हत्याबंदी अमलात आली पाहिजे.

५) मूलभूत (बुनियादी) शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्यात आला पाहिजे. ज्या काही अपेक्षासह विनोबा दिल्लीला आले होते त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून विनोबांनी पुन्हा आपले लक्ष भूदानाकडे वळविले.

२४ नोव्हेंबर १९५१ रोजी विनोबांनी दिल्ली सोडली व २ डिसेंबर रोजी देवबंद येथे पोहचले. तेथील उलेमानी विनोबांचे कुराणाचे आणि अरबी भाषेचे ज्ञान पाहून तोंडात बोटे घातली. अशातच पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधुम सुरू झाली. या काळात विनोबांनी एकाच ठिकाणी थांबावे अशी सूचना त्यांना करण्यात आली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला. मुरादाबाद बालिया मार्गे विनोबा १२ एप्रिल १९५२ रोजी वाराणसीला पोहचले. वाराणसीपासून १४ मैल अंतरावरील सेवापुरी येथे त्यांनी मुक्काम केला. सेवापुरी येथे गांधी आश्रम आणि गांधी स्मारक निधी उत्तर प्रदेशाची शाखा असून त्याच्यातर्फे १३ एप्रिल ते १६ एप्रिल या काळात चौथ्या सर्वोदय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

येथे त्यांनी सर्व सर्वोदयी कार्यकर्त्यांना भूदान कार्यक्रमाबाबत आवाहन केले की, 'आपल्या सर्वांना विनंती आहे की, मी आरंभलेल्या प्रजासूय यज्ञात तुमच्यापैकी प्रत्येकाना आपला वाटा उचलून हे सिद्ध करून दाखवावे की अहिंसात्मक मार्गाने समाजात परिवर्तन घडून आणता येते. परिवर्तनाचा हाच मार्ग योग्य आहे याची तीन कारणे आहेत.

१) हा मार्ग भारतीय परंपरानुरूप आहे. 

२) यात धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाची बीजे आहेत.

 ३) जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी या मार्गाची मदत होऊ शकते.

लोहियाची टीका: भूदानाची लोकप्रियता वाढत असतानाच देशातील काही स्तरावर भूदानाला विरोधही होत होता. विनोबा उत्तर भारतात पदयात्रेवर असतानाच शेतकरी कामगार पक्षाचे नेते उद्धवराव पाटील यांनी भूदानावर व्यावहारिक पातळीवरून टीका केली तेव्हा मात्र विनोबांनी त्याची दखल घ्यावी लागली. लोहियाचे मत होते, "भूदानाचा कार्यक्रम फार चांगला आहे. पण फार चांगला असला तरी अव्यवहार्य असून तो ३०० वर्षात पूर्ण होईल." यावर विनोबांचे उत्तर फारच मार्मिक आहे. ते म्हणतात, "बाबा सुद्धा करतो. पाच कोटी एकर जमीन मिळवायची आहे. समजा दरसाल एक लाख एकर जमीन मिळाली तर हा कार्यक्रम ५०० वर्षात पूर्ण होईल. आता लोहियाचे म्हणणे आहे, "हा कार्यक्रम ३०० वर्षात पूर्ण होईल तेव्हा हे जाहीरच झाले की त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत या कामात मिळेल. म्हणून वेळ कमी लागणार आहे.' सेवापुरी येथील अधिवेशन संपवून विनोबा लखनौला पोहोचले. तो दिवस होता बुद्धपौर्णिमेचा. बुद्धाचा संदर्भ लक्षात घेऊन विनोबांनी म्हटले, "बुद्ध भगवानाचे धम्म चक्र परिवर्तन' हे परिवर्तनाचे काम मी पुढे चालवीत आहे.

ग्रामदानाची सुरुवातः २३ मे १९५२ रोजी विनोबांनी हमीरपुर जिल्ह्यातील इटौलिया गावात प्रवेश केला. भूदान चळवळीतील क्रांतीकारक असा हा दिवस. इटौलियापासून मंगरोठ हे गाव दोन मैलावर. गावातील १०१ एकर जमीन गावकऱ्यांनी भूदानात दिली. तेथील जमीनदार दिवाण शत्रुघ्न सिंहानी सायंकाळच्या सभेत आपली सर्व जमीन दानात देण्याची घोषणा केली. त्यातून ग्रामदान आस्तित्वात आले. मंगरोठ हे देशातील पहिले ग्रामदानी गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. विनोबाला याचा खूप आनंद झाला. सर्वोदय सिद्धांताप्रमाणे ग्रामरचना अस्तित्वात आणण्यासाठी विनोबांनी बाबा राघवदास आणि इतर कार्यकर्त्यांची नेमणूक केली.

मंगरोठ गावातील एकूण १०७ कुटुंबापैकी फक्त ६५ कुटुंबाकडेच जमीन होती. ग्रामदान घोषणेनंतर गावातील जमीनीची मालकी सर्व गावाकडे आली. सर्वांनी एकत्र काम करून सहकारी भांडाराची सुरुवात करण्यात आली. गावातील दारुचे दुकान बंद करण्यात आले. ग्रामोद्योगामार्फत चप्पल इत्यादी उत्पादन सुरू करण्यात आले. ग्रामीण विकासासाठी स्वतंत्र कोषाची निर्मिती करण्यातआली. दिवाण शत्रुघ्नसिंहाच्या मार्गदर्शनाखाली मंगरोठ या गावाने थोड्याच दिवसात नेत्रदिपक अशी प्रगती केली. गावच्या पूर्ण समस्या सुटल्या नसल्यातरी अहिंसेच्या मार्गाने गावात सामाजिक आर्थिक क्रांती घडवून आणता येते हे सिद्ध झाले. याचा परिणाम असा झाला की थोड्याच काळात एक लाख साठ हजार ग्रामदाने घडून आली.

९ सप्टेंबर १९५२ ला ज्येष्ठ गांधीवादी किशोरीलाल मश्रूवाला यांचा मृत्यू झाला. महात्मा गांधी नंतर 'हरिजन'ची संपूर्ण जबाबदारी किशोरीलालवर होती. 'हरिजन'च्या माध्यमातून भूदान ग्रामदानाला भरपूर प्रसिद्धी होती. 'हरिजन'च्या माध्यमातून भूदान- ग्रामदानाला भरपूर प्रसिद्धी मिळत होती. ११ सप्टेंबर १९५२ ला विनोबांचा अठ्ठावण्णावा वाढदिवस होता. या दिवशी विनोबांनी जाहीर केले की देशात अहिंसेच्या माध्यमातून जो पर्यंत जमीनीच्या समस्या सुटत नाही तोपर्यंत परंधाम आश्रम पवनारला परत येणार नाही. आणि ते भूदानयात्रेला निघाले. १४ डिसेंबर १९५२ रोजी विनोबानी कर्मनाशा नदीवरील पूल ओलांडून बिहार राज्यात प्रवेश केला. १४ डिसेंबर १९५२ ते ३१ डिसेंबर १९५२ या काळात विनोबा संपूर्ण बिहार राज्यात फिरले. "बिहार हा प्रदेश जेथून गौतम बुद्धाने जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला म्हणून मीही असा निश्चय केला की देशात आर्थिक, सामाजिक क्रांतीचे साधन म्हणून भूदान प्रयोगासाठी प्रयोगशाळा म्हणून बिहार राज्याचा वापर करावा." असे विनोबांनी जाहीर केले.

संपत्तीदान: २४ ऑक्टोबर १९५२ या दिवशी विनोबांनी संपत्तीदानाची घोषणा केली. त्यांचे मत होते की, ज्यांच्याजवळ जमीन नाही त्यांना या क्रांतीत सहभागी होण्यासाठी त्यांचा उत्पन्नाचा सहावा भाग मागावा व ज्यांची इच्छा असेल त्यांनी तितका भाग घ्यावा. एका आठवड्यानंतर विनोबांनी गया जिल्ह्यात प्रवेश केला. टाटानगर मुक्कामी विनोबांना एकाएकी ताप आला. तो मलेरिया असल्याचे निदान झाले. तरीपण तेथून चालत चालत विनोबा चांडोल येथे पोहोचले. त्यांची प्रकृती अधिक नाजूक झाली. तरीही त्यांनी औषध घेण्यास नकार दिला. पं. नेहरू, राजेंद्रप्रसाद, बिहारचे मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिन्हा यांच्या आग्रहाखातर त्यांनी एक गोळी घेतली, आणि त्यांना लगेच आराम पडला पण अशक्तपणामुळे चांडोल येथे तीन महिने त्यांना थांबावे लागले. त्यामुळे सर्वोदय समाजाचे पाचवे संमेलन चांडोल येथेच घेण्याचे ठरले. ७, ८, व ९ मार्च १९५३ दरम्यान हे अधिवेशन झाले. या अधिवेशनाला राजेंद्र प्रसाद, दिवाकर, काकासाहेब कालेलकर, जयप्रकास नारायण, जे. सी. कुमारष्णा, शंकरराव देव, धीरेंद्र मुजुमदार इ. हजर होते. "जनतेत स्वावलंबन शक्ती निर्माण करण्यासाठी स्वावलंबन शक्तीत वाढ करावी" असेठरले. या अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जयप्रकाश नारायणांनी उर्वरीत आयुष्य भूदानासाठी देण्याचे जाहीर केले.

श्रमदान १२ मार्च १९५३ पासून विनोबा पुन्हा बिहार यात्रेला निघाले. भूदान, ग्रामदानाला आता विनोबांनी श्रमदानाची जोड दिली. दररोज १५ मिनिटे माती खणून विनोबांनी श्रमदानाची सुरुवात केली. दररोज एकेक मिनिटांची वाढ करून दररोज एक तास श्रमदान करण्यास विनोबांनी सुरुवात केली. या कार्यक्रमात गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी होत. १९ सप्टेंबर १९५३ रोजी संथाल परगण्यात वैद्यनाथाश्रमाचे तीर्थस्थळ असून या मंदिराच्या महताने विनोबांना मंदिर भेटीचे निमंत्रण दिले. विनोबाचे विनंती मान्य करीत म्हटले, माझ्याबरोबर दलितही असतील. दुसऱ्या दिवशी विनोबा मंदिरात पोहोचले. तेव्हा 'धर्म की जय हो', 'अधर्मका नाश हो' अशा घोषणा देत काही जणांनी त्यांच्यावर अचानक लाठीहल्ला केला. विनोबासह काहीजण गंभीर जखमी झाले. दर्शन न घेताच विनोबा परतले. विनोबांच्या कानावर जोरदार फटका बसला. त्यांचा तो कान कायमचा अधू झाला. तरीपण कुणालाही शिक्षा करायची नाही असे विनोबांनी जाहीर केले. अज्ञानातून हे कृत्य घडले असे त्यांनी जाहीर केले. पुढे ते म्हणतात, "ज्याच्या चरणाचा दास मी म्हणवतो, त्या गांधीप्रमाणेच मलाही या मंदिरात मार खावा लागला याला मी माझे भाग्य समजतो." तेथून विनोबा पूर्णिया सरसहा मुजफरपूरला भेटी देत. १० जानेवारी १९५४ रोजी पाटण्याला पोहचले. येथे त्यांना पाच लाख जमीन भूदानात मिळाली.

जीवनदान : १८ ते २० एप्रिल १९५४ दरम्यान बोधगया येथे सहावे सर्वोदय संमेलन घेण्यात आले. विनोबाच्या विनंतीला मान देऊन पं. नेहरू आपले नित्याचे कार्यक्रम बाजूला ठेवून बोधगया येथे पोहोचले. विमानतळावर श्रीमन्नारायण आणि उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. दोन दिवस बोधगया येथे राहून नेहरू परतले. या संमलेनाचे वैशिष्ठ म्हणजे सेवापुरी येथील सर्वोदय संमेलनात २५ लाख एकर जमीन भूदानात मिळविण्याचे लक्ष या संमेलनापूर्वी ओलांडलेहोते. या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी भूदान कार्यासाठी 'जीवनदान' ही घोषणा होय. या घोषणेमुळे प्रेरीत होऊन विनोबांनी आपले उर्वरित आयुष्य भूदान मूलक ग्रामोद्योग प्रधान अहिंसक क्रांतीसाठी प्रदान केल्याची घोषणा केली. संमेलनाध्यक्ष आशादेवी यांनी विनोबा आणि जयप्रकाशाच्या लिखीत घोषणा वाचून दाखवल्या. संपूर्ण संमेलनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि कार्यकर्त्यांनीच अधिवेशनात भूदानासाठी जीवनदानाची घोषणा केली.

या प्रसंगाची आठवण म्हणून बोधगया येथे एका आश्रमाची स्थापना करण्याचा निर्णय झाला. या आश्रमातून हिंदू धर्मातील औपनिषदीक तत्त्वज्ञान, बुद्धविचार, यांच्या समन्वयात्मक अभ्यास करण्याची, संशोधन करण्याची व्यवस्था असावी असे ठरले. महत्त्वाचे म्हणेज बोधगया येथील शंकरमठाच्या प्रमुखांनी या आश्रमासाठी पाच एकर जागा देण्याचेही कबूल केले. गौतमबुद्धाच्या महाबोधी वृक्षाजवळ ही जागा आहे. 'समन्वय आश्रम' असे नामकरण या नव्या आश्रमाचे करण्यात आले. आता बोधगया येथील समन्वय आश्रम हा एक नावाजलेला आश्रम म्हणून परिवारात ओळखला जातो. तेथे गांधीविचाराने सर्व साहित्य आणि सर्व साधने अभ्यासकाला उपलब्ध करून दिले जाते. 

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा