२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना नेहरूंची भूमिका पटली आणि ते शांत राहिले व म्हणाले, जर चीनशी असणारा आपला झगडा राष्ट्रीय सन्मान आणि प्रतिष्ठा सांभाळून सुटला तर त्याच मार्गाने पाकिस्तान आणि काश्मीरचा झगडा सोडण्यात यश मिळू शकेल.
४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी १९६३ या तीन दिवसात भारतातील सर्व खादी कार्यकर्त्यांचा मेळावा नवद्वीप येथे होता. विनोबांनी आपेल चिंतन त्यांच्या समोर मांडीत म्हटले की, "आतापर्यंत खादी सरकारभिमुख होती, ती आता ग्रामभिमुख करावयाची आहे. प्रत्येक माणसाला काही वार खादी मोफत विणून द्यावी. खादीच्या वीणकामात केलेली मदत गावकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरेल. त्याबरोबर डिफेन्स मेझर म्हणून गावाला कापडाबद्दल स्वावलंबी होता येईल. अशा प्रकारच्या खादी प्रचारावर तुम्ही युद्ध पातळीवरून कामाला लागा. राबर्ट ब्राउनींगच्या कवितेप्रमाणे । have everbeen a fighter so one fitght more. The last and the best.. खादीसाठी अखेरचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर खादी राणी बनेल अथवा संपुष्टात येईल.
१८ एप्रिल १९९३ रोजी भूदान यात्रेला एक तप होणार होते. त्या दिवशी विनोबा गंगासागरच्या पदयात्रेला निघाले. गंगासागर हे एक महत्त्वाचे तिर्थस्थळ, तेथे गंगानदी अरबी सागराला मिळते. गंगासागर हे तीसरे टोक कन्याकुमारी एक टोक, हिमालय दुसरे टोक गाठले. त्यांनी ग्रामस्वराज्याचा त्रिवार जय केला. सुलभ ग्रामदान- २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर रायपूर येथे विनोबा सर्वोदय संमेलनात हजर राहिले. या संमेलनात विनोबांनी त्रिवीध कार्यक्रमाची घोषणा केली.
१) जोवर ग्रामदानाची संख्या वाढणार नाही तोपर्यंत नव्या युगाची पात्रता येणार नाही. २) शांतीसेना व्यापक झाल्याशिवाय अहिंसक शक्तीचा विकास होणार नाही.
३) खादीचा प्रसार गावागावातून झाला पाहिजे. याच संमेलनात विनोबांनी सुलभ ग्रामदानाची कल्पना मांडली. विनोबा म्हणतात, "सौम्य सौम्यतर- सौम्यतम ही अहिंसक क्रांतीची दिशा आहे. ह्या दिशेने पुढे जाताना दात्यांनी जमीन वाटप करावे हे पुढचे पाऊल पडले व प. बंगालात सुलभं ग्रामैदान हे त्याहून पुढचे पाऊल पडले. विनोबा म्हणतात, "ग्रामदानाचा विचार समाज मेरणेला पूर्णपणे अनुकूल असा आहे पण स्वार्थ प्रेरणेला तो तितकासा अनुकूल नाही. या दोन्हीचा मेळ घालण्याच्या विचारातून सुलभ ग्रामदानाची कल्पना ध्यानात आली.
" सुलभ ग्रामदानात खालील गोष्टीचा समावेश होतो-
१) ग्रामदानात खेड्यातील निदान ८० टक्क्यां पेक्षा अधिक लोकांनी आपल्या जमीनीची मालकी सोडावी.
२) ग्रामदानात गावची कमीत कमी ५१ टक्के जमीन यावी.
३) प्रत्येकाने आपल्या जमीनीचा २० वा हिस्सा गावच्या भूमीहीनासाठी द्यावा.
४) उरलेली जमीन पूर्वीप्रमाणेच मालकाजवळ राहील व तो ती जमीन कसेल.
५) लहान गाव असल्यास गावच्या सर्व प्रौढांची मिळून एक ग्रामसभा बनेल. मोठे गाव असल्यास प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती ग्रामसभेची सभासद राहिल. गावचा सर्व कारभार ग्रामसभा पाहिल.
६) प्रत्येक व्यक्ती दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा १ टक्के हिस्सा ग्रामकोष निर्माण
• करण्याकरिता म्हणून ग्रामसभेला देत राहिल. ग्रामसभा यातून बेकारांना काम देण्याकरीता, उद्योग सुरू करण्याकरीता, अनाथ अपंगाच्या व्यवस्थेसाठी शिक्षण, आरोग्य इत्यादी कामेकेली जातील. याच यात्रेत कलकत्यात विनोबांनी 'कुराणसार' ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले. कलकत्यात विनोबांनी चीनी लोकांची वस्ती असलेल्या 'चायना टाऊन' या भागाला भेट दिली. ... या देशात तुम्हाला प्रेम आत्मियताच मिळेल असे भारतीय जनतेतर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो. परस्पर स्नेहभाव वाढविण्यासाठी परस्पराची भाषा शिकणे आवश्यक आहे." असे मार्गदर्शनपर दोन शब्द विनोबांनी सांगितले. शांतीनिकेतन मधील एका शिक्षकाच्या मदतीने चीनी भाषेचा अभ्यास केला होता.
ते म्हणतात, "चीनी व जपानी या चित्रलिपी फार कठीण असल्यामुळे त्यांना नवी सोपी व शास्त्रीय लिपी असावी. भारताच्या सर्व भाषांनी देवनागरी लिपीचा स्वीकार
केला तर पुढे मागे चीन जपानही देवनागरी लिपीचा स्वीकार करतील अशी मात्र आशा आहे.
पुन्हा पवनार : रामपूर संमेलन आटोपून विनोबा ६ एप्रिलला सेवाग्रामला पोहोचले. तेथून ते १० एप्रिलला म्हणजे १३ वर्षानंतर पवनारला पोहोचले. या १३ वर्षाच्या काळात विनोबांनी ८० हजार मैल पायी प्रवास केला, लाखो एकर जमीनीचे भूदान मिळविले, काही हजार ग्रामदाने जाहीर केली. या बरोबरच अनेक ग्रंथाचे संकलनही केले. पवनारला १० दिवस मुक्काम करून २१ एप्रिल १९६४ रोजी विनोबा वर्धा जिल्ह्याच्या पदयात्रेला निघाले. या पदयात्रेत असतानाच त्यांना २७ मे १९६४ रोजी पं. नेहरूंच्या निधनाची बातमी समजली. 'पं. नेहरू महान नेते होते ते अखेरचे नेते आता नेतृत्वाचे युग संपले आहे, गणसेवकाचे युग आले. सर्वांनी मिळून काम करण्याचे, सर्वांनी मिळून निर्णय घेण्याचे युग आले आहे' याच पदयात्रेत असताना त्यांना लॅबरथाईन व्हींगो (कानाची शीर निकामी होणे) मुळे चक्कर आली. त्यांमुळे ते पवनारला परत आले. ब्रह्म विद्यामंदिरात त्यांनी विश्रांती घ्यायचे ठरविले. वैद्यनाथ धामच्या मंदिरात झालेल्या मारहाणीमुळे त्यांना कानाजवळ आणि मान व पाठीवर मार लागला होता. त्यातूनच हा आजार बळावला होता. सर्व प्रकारच्या औषधोपचार पद्धतीचा (पॅथीचा) उपयोग करूनही रोग कायमच राहिला. शेवटी विनोबा गमतीने म्हणाले, "मी एकच पॅथी सर्वोत्तम मानतो. नॅचरोपॅथी, अॅलोपॅथी ह्या सर्वात श्रेष्ठ आहे सिम्पथी. "
पवनार येथे विनोबांनी ब्रह्मविद्या मंदिरात नोव्हेंबर १९६४ ते जुलै ६४ या काळात विश्रांती घेतली. या कालखंडास विनोबांनी 'अकर्मयोग' असे संबोधले. वेदांतसुधा, अनुशासनम्, विनयांजली, गुरुबोधसार आदी ग्रंथाचे संकलनही या काळात झाले. विनोबा म्हणत मी माझ्या आयुष्यात तीनच संस्था सुरू केल्या १) बडोद्याचे विद्यार्थी मंडळ २) नाळवाडीचे ग्रामसेवा मंडळ ३) पवनारचे ब्रह्म विद्यामंदिर. या तिन्हीना विनोबा महत्त्व देत. यालाच ते आपले जीवितकार्यही मानीत.
पं. नेहरूनंतर शास्त्री पंतप्रधान झाले. विनोबांना भेटण्यासाठी शास्त्रीजी नागपूरहून जामनी या गावी पोहोचले. एका लहानशा झोपडीत विनोबा आणि शास्त्री यांची चर्चा झाली. ऑगस्ट १९६४ मध्ये विनोबा विषमज्वराने आजारी पडले. आजारामुळे आलेल्या अशक्तपणामुळे त्यांना पायी चालण्याचा त्रास होऊ लागला तेव्हा पायी चालण्याचा आग्रह सोडून मोटार वापरण्यास त्यांनी संमती दिली. ६ डिसेंबर १९६४ रोजी जमनालाल बजाजांनी स्थापन केलेल्या शिक्षण मंडळाची सुवर्ण जयंतीसाठी राष्ट्रपती राधाकृष्णन वर्ध्यास आले असता त्यांनीही पवनारला येऊन विनोबांची भेट घेतली. त्यावेळी विनोबा राधाकृष्णनाला म्हणाले, "आजकाल माझे मौन आणि अश्रवण आहे अधिक भाषणापुढे प्राथमिक रुपात मौन आणि अश्रवण 'रपट पडे की हरगंगात' आहे. द. भारत हिंदी विरोध : फेब्रुवारी १९६५ ला दक्षिण भारतात हिंदी विरोधी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. हे आंदोलन म्हणजे केंद्र सरकारच्या हिंदीसंबंधी धोरणाच्या विरोधी रोष होता. १२ फेब्रुवारीपासून विनोबांनी उपोषण सुरू केले. दक्षिण भारतावर हिंदी लादणे वा उत्तर भारतावर इंग्रजी लादणे या दोन्ही गोष्टी विनोबांना मान्य नव्हत्या. विनोबांच्या मते दक्षिण भारतीयांनी राष्ट्रभाषेच्या स्वरूपात हिंदी शिकावी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी उत्तर भारतीयांना कोणत्याही एका दक्षिण भारतीय भाषेचा अभ्यास करावा.
तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा वर्ध्यास आले असता त्यांनी विनोबांना आश्वासन दिले की, “भारत सरकार दक्षिण भारतीयांच्या इच्छेविरुद्ध तेथे हिंदीचा आग्रह धरणार नाही." दक्षिण भारतीय नेत्यांनीही विनोबांनी कळविले की, हिंदी विरोधी आंदोलनामुळे आम्हालाही दुःख झाले असून राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचणारे कोणतेही कृत्य यापुढे केले जाणार नाही. त्यानंतर पाचव्या दिवशी विनोबांनी आपले उपोषण मागे घेतले.
प्रदेशदान: मे १९६५ मध्ये गोपुरी वर्धा येथे सर्व सेवा संघाच्या अधिवेशनात 'संपूर्ण बिहारात ग्रामदान घडवून आणण्यासाठी वादळी आंदोलन उभे करा' असा ठराव घेण्यात आला. बिहारच्या कार्यकर्त्यांनी या दृष्टीने सुरुवात केली. त्यांना मदत करण्यासाठी १९ मे १९६५ रोजी विनोबा बिहारला जायला निघाले. यावेळी त्यांचा प्रवास मोटारने होता. या आंदोलनाच्या वेळी जमशेदपूर येथे विनोबा आजारी पडले. तीन महिने त्यांनी जमशेदपूर येथेच मुक्काम केला. प्रकृतीस आराम पडताच विनोबा दरभंग्याकडे रवाना झाले. १९६६ च्या शेवटपर्यंत दरभंग्यातील बहुतेक गावाचे ग्रामदान झाले होते. बिहारात ग्रामदानाचे लक्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच बिहारात 'प्रदेशदान'ची कल्पना पुढे आली. राज्याचे दान कडून आल्यास ग्रामदानी संकल्पना अधिक मजबूत होऊन इतरासाठी तरी मार्गदर्शक ठरेल. अशी चर्चा होऊ लागली. २ ऑक्टो. १९६९ मध्ये म. गांधीच्या जन्मशताब्दी पर्यंत प्रदेशदान घडावे अशीही इच्छा विनोबांनी व्यक्त केली.
७ जून १९६६ रोजी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात राणीपतरा आश्रमात विनोबांनी सूक्ष्म कर्मयोगाची घोषणा केली. ५० वर्षांपूर्वी याच दिवशी विनोबा कोचरब आश्रम गांधीजीकडे पोहचले होते. विनोबा म्हणतात, "तेव्हापासूनची ५० वर्षे गांधीजींच्या • आश्रमात राहून त्यांच्या जीवनाचा त्यांच्या जीवनदर्शनाचा अंगीकार करीत. मी कार्य करीत होतो. आतापर्यंत केलेले कार्य गांधींना अर्पण करून मी मुक्त होण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे मी फक्त असेल, देशाला फक्त इतकेच कळेल की मी कोणत्या प्रदेशात पदयात्रेवर आहे. राज्याला फक्त की मी कोणत्या प्रदेशात पदयात्रेवर आहे. राज्याला फक्त याची माहिती राहील की मी राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे. आणि जिल्ह्यातील संबंधीताना फक्त काहीदिवस आधी कळविले जाईल की मी जिल्ह्यातील कोणत्या गावी केव्हा येणार आहे. यापुढे लेखन, पत्रव्यवहार इ. कर्म थांबवून सहकाऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करणेही थांबवणार आहे." सहकाऱ्यांनी आता सर्व निर्णय सर्व संमतीने घ्यावयाचे आहे. सहकाऱ्यांनी आता माझ्यावर मार्गदर्शनासाठी अवलंबून राहू नये."
पुढे विनोबा म्हणतात, "जरी मी सूक्ष्मात प्रवेश केला असला तरी दम, दान, दया याचा जो कार्य कर्मआहे त्याच्याशी हृदयाने जोडलेला राहीन. तूफान 'चाललेलेच होते. यापुढेही मी सहकाऱ्याशी आंतरिक अनुसंधान राखीन. भारतीय सर्व कार्यकर्त्यांचे मनात मी ध्यान करून त्यांचे नाव घेईन, त्यांची आठवण करीन, त्याच्या कार्याची दखल घेईन. यालाच आंतरिक अनुसंधान म्हणतात. यात फार मोठी शक्ती असते, त्यासाठी स्वतःला विसरून जावे लागते."
पुढील चार वर्षे विनोबा संपूर्ण बिहारात वादळी पदयात्रा करीत होते. दरभंगा येथील काम सर्वोदयी कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहावे यासाठीप्रयत्न चालू होता. दौऱ्यातच २२ सप्टेंबर १९६७ रोजी 'ख्रिस्त धर्मसार' हे पुस्तक लिहून पुन्हा सामान्य माणसाच्या मनात असणाऱ्या ख्रिस्ती धर्माविषयीचे गैरसमज दूर करण्यास मदत केली.
संगीती : ७ व ८ डिसेंबर १९६७ ला पुसा रोड येथे विद्वतजनाची परिषद बोलावण्यात आली. प्राचीन काळी बिहारमध्ये अशा सभा बोलावल्या जात. त्यांना 'संगीती' असे म्हणत. या संगीतीत विनोबांनी जाहीर केले की, . कार्यक्रमाने " शिक्षणात अहिंसक क्रांती घडून येईल. आचार्याच्या हातात संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याची शक्ती असायला हवी. न्यायाधिशाला सरकारकडून पगार मिळतो तरी न्यायविभाग सरकारच्या हाताखाली नाही. त्याच प्रमाणे शिक्षकाला जरी पगार जास्त असला तरी शिक्षकाला स्वतंत्र अस्तित्व असलेच पाहिजे. म्हणून शिक्षकाने सत्तेच्या राजकारणामागे न जाता स्वतःच्या शक्तीचा विकास करावा. कलुषीत राजकारणापासून मुक्त होऊन विश्वव्यापक अशा मानवतेच्या राजकारणाचा व लोकनीतीचा पुरस्कार करावा." अशाच वेळी शिक्षक देशाचे नेतृत्व करू शकतील.
या दृष्टीनेच ८ मार्च १९६८ रोजी विक्रमशीलेच्या जवळ भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव मुक्कामी 'आचार्यकुल' स्थापनेची घोषणा करण्यात आली. 'संगीती'च्या • वेळी असलेल्या विचाराचे फळ म्हणजे 'आचार्य कुल' होय. कारण संगीतीच्या वेळी बिहारचे शिक्षणमंत्री कर्पूरी ठाकूर यांनीच "बिहारच्या समस्या सोडवण्यासाठी.. जमले तर आपण वेळ द्याल का?" असा प्रश्न विनोबांना केला होता. त्यातूनच विनोबांचे आचार्य कुलाचा विचार पुढे आला. या शिक्षण तज्ज्ञाच्या परिषदेत विनोबा म्हणाले, “आजचे शिक्षण ही एक मोठी समस्या बनली आहे. याचे कारण शिक्षण राज्याच्या हातात गेले आहे. त्यामुळे जो अधिकार आपण शंकराचार्य, तुलसीदास यांना दिला नाही तो अधिकार एका शिक्षण संचालकाला मिळाला. तो फक्त पाठ्यपुस्तके तयार करील व राज्यभर चालवील. त्याचा अभ्यास न करणाऱ्यास नापास केले जाईल. तुलसीदासाने रामायण वाचायला सांगितले नाही.
लोक स्वेच्छेने रामायण वाचतात. पुस्तकाचे वाचन इच्छेने झाले पाहिजे तसे पाठ्यपुस्तकाचे होत नाही म्हणून शिक्षण शासनमुक्त हवे. " याच परिषदेत धर्म आणि राजकारणाऐवजी अध्यात्म व विज्ञान आले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनोबा म्हणतात, "ह्या आचार्यकुल परिषदेत काही ईश्वरी संकेत आढळतात ते म्हणजे परिवर्तन घडवून आणता येईल." यातून अहिंसक शेवटी आचार्य कुलाच्या स्थापने मागचा हेतू सांगत विनोबांनी म्हटले की, "आचार्य कुल ही संस्था कर्तव्यजागृती आणि प्रयत्नशीलता या गुणाच्या वाढीसाठी निर्माण होत आहे, यामुळे शिक्षकांचा गमावलेला दर्जा पूर्ववत त्यांना प्राप्त होईल. महाभारतातील धर्मराजाप्रमाणेच शिक्षकाचा धर्मरथ जमीनीपासून वर हवेतच चालला पाहिजे.. यासाठी निश्चयात्मक बुद्धीवर जोर दिला पाहिजे.
११ सप्टेंबर १९६८चा वाढदिवस विनोबांनी 'अभंगवते' लिहून साजरा केला. ५ ते ७ ऑक्टोबर १९६८ बोधगयेच्या संत संमेलनाच्यावेळी विनोबांनी आपला 'ऋग्वेदसार' हा ग्रंथ पूर्ण केला. ते म्हणतात, "५० वर्षे मी वेदाचा अभ्यास केला. साडेचार हजार मंत्रे तोंडपाठ केली त्यातील १३१९ मंत्र म्हणजेच 'ऋग्वेदसार' होय. ऋग्वेदातील १/८ मंत्र निवडून त्याची 'अष्टादशी' हा ग्रंथ जुलै ६९ साली प्रसिद्ध केला.
विनोबा-सरहदगांधी भेट: २० ते २५ ऑक्टोबर १९६९ गांधी जन्मशताब्दी वर्षाचे निमीत्य साधून राजगृह येथे सर्वोदय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात खान अब्दुल गफार खान बादशाहखान किंवा सरहद्द गांधी गुजराथमधील सांप्रदायीक संघर्षामुळे येऊ शकले नव्हते परंतु नोव्हेंबर १९६९ मध्ये गफारखानानी सेवाग्रामला भेट देण्याचे जाहीर करताच विनोबांनी सेवाग्रामला जाऊन त्यांचे स्वागत करण्याचे ठरवले. ऑक्टोबरच्या शेवटी विनोबा पवनारात पोहचले आणि मुख्य म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत विनोबा पवनारातच राहिले.
४ नोव्हेंबर १९६९ बादशाहखान व विनोबांची चिरस्मरणीय भेट घडून आली. २७ वर्षानंतर दोघांची भेट होत होती. सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी दोघांची देशातील हिंसेवर चर्चा झाली. यावेळी जयप्रकाश नारायण हेही हजर होते. याच वेळी विनोबांनी ए. बी. सी. महासंघाची (Confederation) संकल्पना स्पष्ट केली. अफगाणिस्तान, ब्रह्मदेश आणि सिलोन (ABC) या त्रिकोणात जितके देश येतील त्या सर्व देशाचा एक महासंघ बनवून त्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट या सर्वांचा समावेश करावा. ज्यामुळे या प्रदेशातील समस्या सुटण्यास मदत होईल. दलाई लामाच्या भेटीच्या वेळी ए. बी. सी. त्रिकोण निर्मितीची जबाबदारी दलाईलामावर टाकावी व दलाई लामानी त्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले होते.
हिंदी भाषेची सेवा केल्याबद्दल म. गांधी पुरस्कार व सामाजिक सेवेचा रॅमन मॅगसिसे पुरस्कार विनोबांना जाहीर झाले. पायी चालणारा, दानात जमीन मिळवून जनतेला वाटणाऱ्या संताबद्दल परदेशात बरेच कुतुहल निर्माण झाले होते. ब्रिटनचे शांततावादी कार्यकर्ते डेव्हीड ग्रुम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनोबां बरोबर पदयात्रेत सामील होऊन प्रत्यक्ष कार्याची पद्धत पाहिली. "तुमचा जय जगत हा एक शब्द पुरे" असे ग्रुम यांनी विनोबांना सांगितले.