26 June 2023
0 अनुयायी
Vinoba rendered Bhagavad-Geeta in Marathi at Mahilashram, Wardha. (7th October 1930 to 6th Feb 1931) He named it as Geetai (Mother Gita). It was in 1915 or thereabout, in Baroda a scholar was giving talks on Gita which Vinoba's mother listened but could not follow. Hence she asked Vinoba to translate Bhagwat Gita. Vinoba says. It was mother's faith in me which prompted me to render Bhagwat Gita in Marathi. The 1st edition of Gital was published on 14th July 1932, when Vinoba was in Dhule jail गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता । पडता रडतां घेई उचलून कडेवरी ॥ ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी केलेले महर्षी व्यासांच्या श्रीमद्भगवद्गीतेचे समश्लोकी मराठी भाषांतर 'गीताई' हे त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे कार्य. 'गीताई' च्या लेखनास प्रारंभ होण्याच्या घटनेचा अमृत महोत्सव आज सुरु होत आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील ही महत्त्वाची घटना असल्याने आज तिचे स्मरण करणे आवश्यक ठरते. गीतेवर अनेक भाष्ये लिहिली गेली. मराठीत सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेवरानी 'ज्ञानेवरी' लिहून संस्कृतमधील गीतेचे निरूपण सामान्य जनांसाठी खुले करून दिले. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य' लिहिले ही गीतेवरील बौद्धिक चर्चा होती. विनोबांना गीता जशीच्या तशी सामान्यांर्पत पोहोचवायची होती. म्हणून गीताई' जन्माला आली ज्ञान समाजाच्या केवळ एका घटकापुरते सीमित न राहता ते सर्वांपर्यंत पोहोचावे, हे महाराष्ट्राच्या सतपरंपरेचे सूत्र विनोबांनी आचरणात आणले. म्हणून तेसुद्धा अर्वाचीन संतच ठरतात.D