shabd-logo

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023

23 पाहिले 23


[५५]

अर्जुन म्हणाला

सन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |
मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥

श्री भगवान म्हणाले

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । 
फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी । 
न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान- तपे कुणी ॥ ३ ॥

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय । 
त्याग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे ॥ ४ ॥

यज्ञ-दान- तपे नित्य करणीय अवश्यक । 
न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक ॥ ५ ॥

परी ही पुण्य कर्मे हि ममत्व फळ सोडुनी । 
करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय ॥ ६ ॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळे चि तो । ॥
केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला ॥ ७

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आग राखुनी ।
त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥ ८ ॥

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया । 
ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥ ९ ॥

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो । 
सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञने छेदूनि संशय ॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे । 
म्हणूनि जो फल त्यागी तो त्यागी बोलिला असे ॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित । 
त्याग हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी ॥ १२ ॥

[५६]

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय।
परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे ॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने । 
वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १४ ||

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी ।
धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ १५ ॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला । 
संस्कार हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति ॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता । 
मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिला ॥ १७ ॥

[५७]

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज है। 
क्रिया करण कर्तृत्व कर्मागे तीन त्यांतुनी ॥ १८ ॥

ज्ञाना-कर्मात कर्त्यात त्रिगुणी तीन भेद जे।
रचिले ते कसे ऐक गुण तत्त्वज्ञ वर्णिती ॥ १९ ॥

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन ।
अभिन्न भेदलेल्यात जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते।
वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुतले वृथा ।
भावार्थ हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥

नेमिले जे न गुंतून राग-द्वेष न राखतो । 
केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥ २३ ॥

धरूनि कामना चित्ती जे अहंकार पूर्वक |
केले महा खटाटोपे कर्म ते होय राजस ॥ २४ ॥

विनाश बेंच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता । 
आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस ॥ २५ ॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित।
फळी जळो चले ना तो कर्ता सात्विक बोलिला ॥ २६ ॥

फल- कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक । 
मारिता हर्ष- शोके तो कर्ता राजस बोलिला ॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी ।
दीर्घसूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला ॥ २८ ॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे ।
गुणानुसार ते सारे सांगतो वेगवेगळे ॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय । 
जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख ॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो ।
जीजाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे । 
अर्थजी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी । 
समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती ॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी ।
बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद ।
घाली झापड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥ ३५ ॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते ॥ ३६ ॥ 
अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी

जे कडू विख आरंभी अंती अमृत तुल्य चि । 
आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक ॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अती मारक जे विख । 
भासे विषय संयोगे इंद्रिया सुख राजस ॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी । 
आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि । 
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणातुनी ॥ ४० ॥

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली । 
स्वभाव सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥। ४१ ।।

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह ।
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ॥ ४२ ॥

शीर्य धैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन ।
दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ॥ ४३ ॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता ।
करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी । 
ऐक लाभ कसा मोक्ष स्व कर्मी लक्ष लावुनी ॥। ४५ ।।

जो प्रेरी भूत मात्रास ज्याचा विस्तार विश्व है। 
स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो । ४६ ।।

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । 
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ ॥

सहज प्राप्त ते कर्म न सोढावे सदोष हि। 
दोष सर्व चि कर्मात राहे अग्नीत धूर तो ।। ४८ ।।

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह ।
तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे सन्यास साधुनी ।। ४९ ।।

सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग ।
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडयांत सांगतो ॥ ५० ॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी । 
शब्दादि स्पर्श टाळूनि राग-द्वेषास जिंकुनी ॥ ५१ ॥

चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी । 
गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी ॥ ५२ ॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ।
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥ ५३ ॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना । 
पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी ॥ ५४ ॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे । 
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥ ५५ ॥

करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी । 
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥ ५६ ॥

मज मत्पर वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥ ५७ ॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू । 
मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि ।। ५८ ।।

म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी । 
तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि ।। ५९ ।।

स्वभाव सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू । 
जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते  ॥ ६० ।।

राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर । 
मायेने चाळवी त्यांस जणू यंत्रांत घालुनी ॥ ६१ ॥

त्याते चि सर्व भावे तु जाई शरण पावसी। 
त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥ ६२ ॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज । 
ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥

सर्व गूढातले गूढ पुन्हा उतम वाक्य हे । 
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥ ६४ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज । 
प्रिय तू मिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ।। ६५ ।।

सगळे धर्म सोडूनि एका शरण ये मज | 
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू नको ॥ ६६ ॥

[६०]

न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो । 
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी ॥ ६७ ॥

सांगेल गूज हे थोर माझ्या भक्तगणांत जो। 
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित ॥ ६८ ॥

कोणी अधिक त्याहून माझे प्रिय करी चिना । 
जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥ ६९ ॥

हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा । 
मी मानी मज तो पूजी ज्ञान यज्ञ करूनिया ॥ ७० ॥

हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी । 
पावेल कर्म पूतांची तो हि निर्वेध सद्गति ॥ ७१ ॥ 


हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की । 
अज्ञान रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥ ७२ ॥

अर्जुन म्हणाला

मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली । 
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥ ७३ ॥

संजय म्हणाला

असा कृष्णार्जुनाचा हा झाला संवाद अद्भुत । 
थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो ॥ ७४ ॥

व्यास - देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे । 
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले ॥ ७५ ॥

हा कृष्णार्जुन संवाद राया अद्भुत पावन । 
आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी ॥ ७६ ॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत । 
राया विस्मित होऊनि नाचतो नाचतो चि मी ॥ ७७ ॥

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर । 
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ ७८ ॥


अध्याय अठरावा संपूर्ण

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा