विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी तुमच्यासारख्या संताचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. या पत्राप्रमाणे विनोबांनी मेजर जनरल यदुनाथसिंह यांना अलाहाबाद येथील नैनी सेंट्रल जेलमध्ये तहसीलदार सिंह यांची भेट घेण्यासाठी पाठवले. मेजर जनरल यदुनाथसिंह यांना अलाहाबाद येथील नैनी सेंट्रल जेलमध्ये मानसिंह दलाच्या इतर डाकूंचीही भेट घेतली. मेजर जनरल यदुनाथसिहांनी विनोबाला सुचविले की, काश्मीरमधून परतताना विनोबांनी चंबळ खोऱ्यातील डाकूंची भेट घेतल्यास त्यापैकी काही आत्मसमर्पणास तयार होतील. विनोबांनी हा प्रस्ताव लगेच स्वीकारला. अहिंसात्मक मार्गाने जर डाकू सर्वसामान्य जीवन जगण्यास तयार होत असतील तर प्रयोग करण्यास काय हरकत आहे असा विचार विनोबांनी केला. त्यासाठी डॉ. कैलासनाथ काटजू यांनी त्वरीत विनोबांना चंबळ खोऱ्याच्या भेटीचे निमंत्रण ही पाठवले.
पंजाबमार्गे विनोबा मे १९६० च्या पहिल्या आठवड्यात उत्तरप्रदेशात आग्रा येथे दाखल झाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्याशी ही डाकू समस्या संबंधीत होती. केंद्रीय गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत आणि त्यांचे साथीदार बी. एन. दातार यांनी आग्याला येऊन विनोबांची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री संपूर्णनंदानीही यात सहभागी होण्यास मान्यता दिली. विनोबांनी डाकूंना त्यांची पारंपारिक पद्धती सोडून आत्मसमर्पण करणे कसे योग्य आहे हे समजून सांगण्याचे ठरवले. म्हणून तिन्ही राज्याचा पोलीस प्रमुखानाही डाकूशी चर्चेची दरम्यान त्या भागात. कायदा आणि शांतता राखून सर्वोदयी प्रक्रिया सुरू करून मदत करण्याची विनंती विनोबांनी केली. ७ मे १९६० रोजी डाकूचे आत्मसमर्पण आणि शांती प्रक्रिया निर्माण करण्याच्या दृष्टीने विनोबानी मेजर जनरल यदुनाथसिंह यांच्यासह चंबळ खोऱ्यातील डाकूच्या वस्तीमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशातील भिंड मुरैना राजस्थानमधील • धौलपूर जिल्ह्याचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातील आग्रा व इटावा जिल्ह्यातील काही गावात ही डाकूची वस्ती होती. स्वातंत्र्य पूर्वकाळापासून डाकूच्या समस्येची सोडवूक न झाल्यामुळे सर्वांचे विनोबांच्या या कृतीकडे लक्ष लागून राहिलेहोते.
विनोबांनी आपल्या कार्याची सुरुवात प्रार्थनेने केली. प्रार्थनेनंतर विनोबांनी डाकूशी संवाद साधताना सांगितले, "परमेश्वरच फक्त या डाकूंना ओळखतो, कारण ते कोण आहे, कसे आहे ही सगळी सत्य माहिती परमेश्वराला माहिती आहे. काही व्यक्ती डाकू या नावाने विनाकारण बदनाम आहेत. काही व्यक्ती समाजात डाकू म्हणून अन्याय करतात पण त्यापेक्षाही अधिक भयानक अन्याय व अत्याचार समाजात काही लोक करतात. परमेश्वराचा एक सेवक म्हणून मी आपणासमोर उभा आहे. आपली सेवा करण्याचा आदेश मला त्यानेच दिला आहे. "
चंबळ खोऱ्यात एकूण पंचवीस हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. विनोबांनी पोलीस अधिकाऱ्यांना समजावले की, 'कोणतीही व्यक्ती जन्मतः डाकू नसते. समाजातील शोषण, क्रूरता आणि हृदयहीनतेतून डाकू निर्माण होतात. डाकूमध्येही धार्मिक वृत्ती असते. त्यांच्या कामाचे क्षेत्र बदलले तर ते मोठ्यातले मोठे काम सहज करू शकतील. ही समस्या पोलीस सोडवू शकत नाही. पोलीस एकत्र आले की डाकूही एकत्र येतील त्यातून द्वेष, शत्रूत्व, तिरस्कारात भर पडेल हे सर्व आणि वंशपरंपरागत चालेल."
मध्यप्रदेशचे राज्यपाल एच. व्ही. पाटसकर, मुख्यमंत्री कैलासनाथ काटजू यांनीही विनोबांची भेट घेतली. त्यांना शांतता निर्मितीसाठी हवे ते सहकार्य देण्याचीतयारी दाखविली. एके दिवशी कुविख्यात डाकू लच्छी ज्याच्यावर पाच हजाराचे बक्षिस होते विनोबा समोर येऊन उभा राहिला व आपला परिचय देत म्हणाला, "मी मुंबईत होतो. आपण चंबळ खोऱ्यात डाकू लोकांना आत्मसमर्पणाबाबत व पश्चातापाबाबत सांगत आहात असे मी वर्तमानपत्रात वाचले, मलाही मनोमन आपली भेट घ्यावी, चूकीची माफी मागावी. चूकीच्या मार्गाचा त्याग करून चांगले जीवन जगावे या हेतूने मी माझ्या कुटुंबासह आपल्या स्वाधीन होत आहे." क्षणभर विनोबांना काहीच सुचेना. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला प्रभावीत होत विनोबा उद्गारले, "मला तर साक्षात देवाचे दर्शन झाल्यासारखे झाले आहे. ही व्यक्ती मुंबईहून आत्मसमर्पणासाठी येथे आली आहे, हे ईश्वराच्या प्रेरणेनेच झाले आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी अंगुलीमाल नावाचा डाकू बुद्धाच्या स्पर्शाने साधु बनला होता. लोक म्हणतात कलीयुगात हे अशक्य आहे, ईश्वराचा चमत्कार बघा, कलीयुगातही आत्मसमर्पण करणारे डाकू आहेत हे सिद्ध झाले आहे.
१९ मे रोजी प्रार्थनेनंतर ११ डाकूचा प्रमुख डाकू लुक्काने विनोबाला आपली शस्त्रे अर्पण केली. प्रार्थना सभेतील सर्व लोक आश्चर्याने दंग झाले. मेजर जनरल यदुनाथसिंहाने सर्वांना एका रांगेत उभे करून प्रत्येकाची नावे घेतली तेव्हा सर्व सभेने तोंडात बोटे घातली कारण एकापेक्षा एक कुख्यात टाकू प्रत्यक्ष दिसत होते, त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी आपल्या प्रवचनात विनोबा म्हणाले,
"या ठिकाणी डाकूची समस्या आहेअसे म्हणतात, पण या समस्येच्या मूळ कल्पनांचा कुणी विचार करीत नाही. गरीबी, व्यक्तीगत वैमनस्य आणि पोलिस हे या समस्येतील प्रमुख मूळ आहे. या समस्येचे राजकारण हेही एक कारण विनोबांनी व्यक्त केले. पक्षीय राजकारण आणि निवडणुका ही कारणे संपवली की. डाकूची समस्या आपोआपच मिटेल." या प्रवचनानंतर आणखी तिघांनी आत्मसमर्पण केले.
२२ मे १९६० जेलमध्ये जाण्यापूर्वी या डाकूंना पदयात्रेतील स्त्रियांनी राखी बांधली, ओवाळले आणि भावपूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला. जाताना जेव्हा त्यांनी विनोबांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा त्यांना आशिर्वाद देत विनोबा म्हणाले,
"ईश्वराची भक्ती करा आणि मनात सदैव पवित्र भावना राखा. विनोबांनी या सर्व डाकूची आत्मसमर्पण आणि पश्चातापाची भावना मेजर जनरल यदुनाथसिंहांमार्फत पं. नेहरू पर्यंत पोहोचवली. दुसरे दिवशी विनोबांनी भिंडच्या कारागृहात सायंकाळी प्रार्थना केली. त्यात २०० आत्मसमर्पित डाकूनीही भाग घेतला. प्रार्थनेनंतर विनोबा म्हणाले, "मी वेगवेगळ्या जेलमध्ये पाच वर्षे काढली. कैद्यांसमोर गीतेवर प्रवचने दिली, जे काम आम्हाला दिले जाई ते निष्ठेने केले. कारण मेहनतीशिवाय कोणतेच काम चांगले नसते. समाजावर ओझे म्हणून जगण्यापेक्षा समाजाला देत जगणेचांगले, जेल म्हणजे आश्रम समजून त्याला स्वच्छ ठेवा. "
प्रेम, करुणा यांच्या माध्यमातून डाकूंच्या हृदयपरिवर्तनाचा प्रयोग बघून पोलीस अधिकारी प्रभावित झाले. काही पोलीस अधिकाऱ्यांनी विनोबांना विनंती केली की त्यांनी पोलीसांना मार्गदर्शन करावे. विनोबा म्हणाले, "हे जे काम होत आहे ते कुणा एकाचे काम नसून ते ईश्वराचे काम आहे. त्याचे सर्व श्रेय ईश्वराला आहे. आपण सर्व त्याच्या हातातले बाहले आहोत. डाऊंनी स्वतः निर्णय घेऊन विनाशत आत्मसमर्पण केले. कायद्याने त्यांना शिक्षा होईल याची जाणीवही त्यांना देण्यात आली होती. फक्त माझ्यामुळे त्यांचा छळ होणार नाही. ते सर्वजण स्तुतीस पात्र स्पर्शाने साधु बनला होता. लोक म्हणतात कलीयुगात हे अशक्य आहे, ईश्वराचा चमत्कार बघा, कलीयुगातही आत्मसमर्पण करणारे डाकू आहेत हे सिद्ध झाले आहे.
१९ मे रोजी प्रार्थनेनंतर ११ डाकूचा प्रमुख डाकू लुक्काने विनोबाला आपली शस्त्रे अर्पण केली. प्रार्थना सभेतील सर्व लोक आश्चर्याने दंग झाले. मेजर जनरल यदुनाथसिंहाने सर्वांना एका रांगेत उभे करून प्रत्येकाची नावे घेतली तेव्हा सर्व सभेने तोंडात बोटे घातली कारण एकापेक्षा एक कुख्यात टाकू प्रत्यक्ष दिसत होते, त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी आपल्या प्रवचनात विनोबा म्हणाले,
"या ठिकाणी डाकूची समस्या आहेअसे म्हणतात, पण या समस्येच्या मूळ कल्पनांचा कुणी विचार करीत नाही. गरीबी, व्यक्तीगत वैमनस्य आणि पोलिस हे या समस्येतील प्रमुख मूळ आहे. या समस्येचे राजकारण हेही एक कारण विनोबांनी व्यक्त केले. पक्षीय राजकारण आणि निवडणुका ही कारणे संपवली की. डाकूची समस्या आपोआपच मिटेल." या प्रवचनानंतर आणखी तिघांनी आत्मसमर्पण केले.
२२ मे १९६० जेलमध्ये जाण्यापूर्वी या डाकूंना पदयात्रेतील स्त्रियांनी राखी बांधली, ओवाळले आणि भावपूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला. जाताना जेव्हा त्यांनी विनोबांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा त्यांना आशिर्वाद देत विनोबा म्हणाले,
"ईश्वराची भक्ती करा आणि मनात सदैव पवित्र भावना राखा. विनोबांनी या सर्व डाकूची आत्मसमर्पण आणि पश्चातापाची भावना मेजर जनरल यदुनाथसिंहांमार्फत पं. नेहरू पर्यंत पोहोचवली. दुसरे दिवशी विनोबांनी भिंडच्या कारागृहात सायंकाळी प्रार्थना केली. त्यात २०० आत्मसमर्पित डाकूनीही भाग घेतला. प्रार्थनेनंतर विनोबा म्हणाले, "मी वेगवेगळ्या जेलमध्ये पाच वर्षे काढली. कैद्यांसमोर गीतेवर प्रवचने दिली, जे काम आम्हाला दिले जाई ते निष्ठेने केले. कारण मेहनतीशिवाय कोणतेच काम चांगले नसते. समाजावर ओझे म्हणून जगण्यापेक्षा समाजाला देत जगणेचांगले, जेल म्हणजे आश्रम समजून त्याला स्वच्छ ठेवा. "प्रेम, करुणा यांच्या माध्यमातून डाकूंच्या हृदयपरिवर्तनाचा प्रयोग बघून पोलीस अधिकारी प्रभावित झाले. काही पोलीस अधिकाऱ्यांनी विनोबांना विनंती केली की त्यांनी पोलीसांना मार्गदर्शन करावे. विनोबा म्हणाले, "हे जे काम होत आहे ते कुणा एकाचे काम नसून ते ईश्वराचे काम आहे. त्याचे सर्व श्रेय ईश्वराला आहे. आपण सर्व त्याच्या हातातले बाहले आहोत. डाऊंनी स्वतः निर्णय घेऊन विनाशत आत्मसमर्पण केले. कायद्याने त्यांना शिक्षा होईल याची जाणीवही त्यांना देण्यात आली होती. फक्त माझ्यामुळे त्यांचा छळ होणार नाही. ते सर्वजण स्तुतीस पात्र आहेत, त्यांच्या प्रती आपलीही भूमिका संमजसपणाची आणि मानवतेची असावी, यामुळे मोठी समस्या आपोआप लहान होईल.'
"विनोबांच्या पदयात्रेमुळे पोलीसांच्या मनोधैर्यांचे खच्चीकरण झाले आहे" असे उद्गार मध्यप्रदेशचे इन्स्पेक्टर जनरल के. एफ. रुस्तुमजी यांनी काढल्यामुळे थोडी खळबळ माजावी. रुस्तुमजीचा गैरसमज झाला होता की या डाकूना शिक्षेत सवलती दिल्या जातील. याबाबत विनोबानी म्हटले की ईश्वर प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे भासतो. डाकूना कोणतेच आश्वासन दिले नाही. शिक्षा करणे हे न्यायालयाचे काम आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या डाकूना जेलमध्ये पाठवणे काही सर्वोदयी कार्यकर्त्यांना आवडले नाही. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आत्मसमर्पण केले. त्यांच्या शिक्षेचा फेरविचार व्हायला हवा होता असे विनोबांच्या अनेक शिष्यांना वाटत होते. समजावण्याच्या सुरात विनोबा म्हणाले, "काहीच्या मते आत्मसमर्पण करणाऱ्या डाकूना मीच कैदेत पाठवले आणि मी हे काही बरोबर केले नाही. या बाबतीत मी हे स्पष्ट करू इच्छितो की यापेक्षा वेगळा पर्यायच नव्हता. कारण बेकायदेशीर असे मी काहीच करू इच्छित नाही. आत्मसमर्पण करणाऱ्यासाठी मी फक्त एवढेच करू शकतो की त्यांना न्याय मिळावा त्यांना योग्य कायदेशीर मदत मिळावी आणि शक्यच झालेतर आपल्या कुटुंबियासोबत सुखी समाधानाने आयुष्य घालवावं. मुख्य म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्या डाकूनाही क्षमेची भीक नको आहे. त्यांनी आत्मसमर्पण केलेले नाही. त्यांनाही मी आवाहन करतो की, त्यांच्याच हितासाठी त्यांनी पश्चाताप करीत आपले जुने आयुष्य सोडून नव्या मार्गांचा शोध घ्यावा. परिणामी या डाकूनी आपला गुन्हा भिड येथील न्यायालयात कबूल करीत सतत सत्याचाच स्वीकार करण्याचे वचन दिले. त्यामुळे विनोबांना खूप आनंद झाला ते म्हणाले, "मी डाकूंना वाईट मार्गाचा त्याग करून सत्याच्या मार्गाचा स्वीकार करीत गुन्हा कबूल करावा. त्याप्रमाणे ते वागले हा इतिहासातील मोठा चमत्कार आहे.'
७ जून १९६० ला विनोबांची शांतीयात्रा ग्वाल्हेरला समाप्त झाली. डाकूंच्या आत्मसमर्पणासाठी विनोबा २५ गावातून फिरले. मानसिंह- सपन यांच्या टोळीतील २० डाकूचे आत्मसमर्पण त्यांनी (घडवून आणले ह्या सर्वांवर २०,००० चे इनाम होते.)
चंबळ, भिंड परिसरातील बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी विनोबांनी 'चवळ घाटी शांतता समिती' स्थापन केली. ज्या डाकूवर खटले होते त्यांना मदत करण्याचेही काम ही समिती करीत होती. तसेच या डाकूच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी चंबळ खोऱ्यात काही जमिन खरेदी, ग्रामोद्योग, गृहउद्योगाचे
प्रशिक्षण डाकूंच्या समस्या इत्यादी सोडवण्याचा प्रयत्नही चंबळघाटी शांतता समिती करीत होती.
ऑगस्ट १९६० मेजर जनरल यदुनाथ सिंहाच्या अकाली निधनामुळे डाकूच्या पुनर्वसनाच्या कामात अडथळे निर्माण झाले, तरीपण डाकूची समस्या पोलीसी पद्धतीऐवजी रचनात्मक पद्धतीमुळे लवकर सुटेल यावर विनोबांनी विश्वास व्यक्त केला.
उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी विश्वबँकेने जेव्हा मदत देण्याचे मान्य केले. यामुळे या भागाच्या समस्या लवकर सुटतील असे विनोबांनी म्हटले होते. इंदोर सर्वोदयनगर : राजस्थानची पदयात्रा आटोपून विनोबा २४ जुलै १९६०
ला इंदोरला पोहोचले. इंदोरच्या सर्वोदय वानप्रस्थ मंडळाचे उद्घाटन करताना विनोबा म्हणाले, "इंदोर हे सर्वोदय नगर व्हावे यासाठी प्रत्येक गल्लीची सफाई आणि सर्वोदय पात्र यासारखे रचनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे. " १५ ऑगस्ट १९६० रोजी स्थानिक सर्वोदयी कार्यकर्त्यांनी दुसरे नवे केंद्र सुरू केले. त्याने नामकरण विनोबांनी 'विसर्जन आश्रम' असे केले. सर्वसभासदांनी आपल्या जुन्या मूल्याचे विसर्जन करून नव्या मूल्याचे सर्जन करावे. तरच विसर्जन आश्रम सार्थक ठरेल. शांतीसेना, नगर सफाई, आपसातील भांडणे आपसात मिटवणे आणि नगरपालिकेतून राजकीय पक्षाचे उच्चाटन असा चार कलमीकार्यक्रम आखून देण्यात आला.
सिनेमा टॉकीजसमोर आणि शहरात अश्लील पोस्टर लावू नयेत, लावली असतील तर ती त्वरीत काढून टाकावी, कोणी काढीत नसल्यास सत्याग्रह करावा, नगरपालिकेच्या लोकांना त्यांनी सुचवले की, आपल्या शहरातील घाणेरड्या गोष्टी हलवा. महिलाश्रमाच्या बैठकीत विनोबा म्हणाले, "आमच्या मायबहिणीची अश्लील चित्रे जागोजागी वाईट रितीने लावलेली आहेत. देशाच्या शील रक्षणाची जबाबदारी आता भगिनी वर्गानेच स्वीकारावी." अश्लील पोस्टर विरोधी इंदोरमधील आंदोलन हळूहळू संपूर्ण देशभर पसरले. परिणामी काही ठिकाणी आंदोलना पूर्वीच अश्लील पोस्टर हलविले गेले.
आसाम भाषिक दंगल : ३० सप्टेंबर १९६० रोजी विनोबांना पं. नेहरूचे पत्र मिळाले. आसामात भाषिक दंगली सुरू झाल्या आहेत म्हणून शांती स्थापण्यासाठी विनोबांनी तिकडे जावे. त्याप्रमाणे विनोबांनी पायीच आसामल जाण्याचा निश्चय केला. २५ डिसेंबर १९६० ला विनोबा वाराणसी मार्गे पं. बंगालमधून ५ मार्च १९६० ला आसामात ग्वालपाडा या ठिकाणी पोहोचले. आपल्या पहिल्याच भाषणात विनोबांनी जनतेला आपल्या प्रदेशाचे स्वरूप समजून घेण्याचे आवाहन केले. आसामी बंगाली बरोबरच अनेक बोली भाषा असणारा हा प्रदेश असून भारतातील अनेक भाषिक लोक या भागात वास्तव्यास आहेत. त्यात व्यापारी व कामगार आहेत. त्या प्रत्येकाची आपापली भाषा आहे. यात हिंदू मुस्लीम आणि ख्रिश्चन आहेत. म्हणून परस्पर विश्वास निर्माण करून प्रेम वृद्धींगत करावे. ग्वालपाड्यात विनोबांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. उपद्रवग्रस्ताना दिलासा मिळाला. स्त्रिया व मुलांचे सांत्वन केले. "गावातील लोक सरळ असतात, शहरातील राजकारणी त्यांच्या मनात विष पेरतात. अशा समस्याला पोलीस किंवा सैन्य सोडवू शकत नाही, यासाठी प्रत्येकाने आपल्यातील नैतिक शक्ती आणि अध्यात्मिक मूल्यांचा विकास केला की आपोआपच प्रेम आणि एकता निर्माण होऊन शांतता प्रस्थापित होईल.
८. एप्रिल रोजी सकाळी विनोबा गोहाटीला पोहचले. गोहाटी येथे त्यांचे अतिभव्य असे स्वागत झाले. स्वागताला उत्तर देताना विनोबांनी, "तुम्ही तुमच्या समस्या कायद्याच्या ऐवजी करुणा धारण करून सोडविण्याचा प्रयत्न करावा. मी आसामात भाषणे करण्यासाठी आलो नसून आपल्या ज्या काही समस्या आहेत आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या ऐकण्यासाठी आलो आहे. माझी इच्छा आहे. की या लहानशा प्रदेशातून देशासाठी प्रेमाचा संदेश मिळावा." १२ मे रोजी विनोबांनी लखीमपूर जिल्ह्यात पदयात्रा सुरू केली. विनोबा येण्याच्या पूर्वी काही ग्रामदानाची घोषणा झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामदान व्हावे म्हणून या ठिकाणी वर्षभर मुक्काम करण्याचे विनोबांनी ठरवले. मुख्यमंत्री बी. पी. चालीहा आणि विधानसभेच्या सर्व सभासदांनी विनोबांना आश्वासन दिले की पक्षापक्षातील भेद दूर ठेवून त्यांच्या कार्याला मदत करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या समोर मनोगत व्यक्त करताना विनोबा म्हणाले, "येथील भाषीक उपद्रवासंबंधी ऐकून मात्र अत्यंत वाईट वाटले, अशा प्रकारची हिंसा संकुचिता वाढवते. विज्ञान युगात अशा संकुचित समस्या असू शकतात हे पाहून आश्चर्य वाटते. आपण सर्व तरुण आहात आपण भूतकाळाचे गुलाम बनण्याऐवजी उज्ज्वल भविष्याचे अग्रदूत बनावे. आपण जय जगतच्या भाषेत विचार करायला शिकले पाहिजे. "साहित्यिकाच्या मेळाव्यात साहित्यिकांशी चर्चा करताना विनोबा म्हणाले, "सत्य, संयम आणि समतेतून एका विशिष्ट प्रकारच्या साहित्याची निर्मिती होते. त्यातून लेखक जनतेच्या हृदयात प्रवेश करू शकतो. हे फक्त अहिंसेच्या मार्गानेच शक्य आहे. अहिंसा खऱ्या कलेची जननी आहे. साम्यवादात करुणा आहे परंतु सर्वांना हृदयाशी कवटाळणारी सत्याची भावना त्यात नाही. म्हणूनच सर्वोदय हीच सर्वोच्च शक्ती आहे; कारण एकता आणि सेवेचा विचार त्यात आहे.'आसामच्या वास्तव्यात विनोबा सोबत अमलप्रभादास होत्या. त्यांच्या आणि हजर महिलाच्या सहकार्याने जवळ जवळ १००० गावाचे ग्रामदान होऊ शकते. तेव्हा आपल्या कामासाठी पुरुषाचा सहभाग मिळत नाही. याबद्दल विनोबांनी खेद प्रकट केला. याचवेळी लखीमपूर जिल्ह्यातील एका सभेत भारत सरकारसमोर संकट उभे राहणार नसेल तर मी नागालँडमध्ये माझ्या कार्याची सुरुवात करीन." असे जाहीर केले. याबाबत विनोबांनी पं. नेहरूंशी चर्चा केली. पं. नेहरूंच्या मते विनोबांना नागाप्रदेशात भूमिगत नागा बंडखोराकडून उपद्रव होण्याची शक्यता असल्याने विनोबांनी नागालँडात जाऊ नये. त्याऐवजी विनोबांनी पूर्व पाकिस्तानात जावे त्यासाठी योग्य तो पत्रव्यवहार करणयाचे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला पाकिस्तान सरकार अनुकूल नव्हते. पण भारत सरकारने पाकिस्तानचे अध्यक्ष अय्युबखानाला विनंती केल्याने विनोबांना पूर्व पाकिस्तानात प्रवेशास संमती देण्यात आली. पूर्व पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी विनोबांनी उत्तर लखीमपूर येथे एक नवा आश्रम स्थापन करून त्याला 'मैत्री आश्रम' असे नाव दिले. विनोबा सोबत असणाऱ्या श्रीमती कुसुम देशपांडे यांना मैत्री आश्रमाची जबाबदारी सोपवून विनोबा पुढील पदयात्रेस रवाना झाले.
पूर्व पाकिस्तानातः ५ सप्टेंबर १९६२ ला विनोबांनी पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला. विनोबा सर्वप्रथम सोनारहाट या गावी पोहोचले. विनोबांच्या आगमनाची बातमी पसरल्याबरोबर विनोबा थांबले होते. त्या ठिकाणी गर्दीच गर्दी झाली. विनोबा त्यांच्यासमोर हिंदीत बोलले त्यांचा बंगला अनुवाद आशादेवी यांनी केला. पूर्व पाकिस्तान मधील आपल्या पहिल्याच भाषणात विनोबा म्हणाले, “पाकिस्तानान मला फिरण्याची संमती पाकिस्तान सरकारने दिली मी त्यांचा आभारी आहे. पाकिस्तानी जनतेप्रती असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठीच मी येथे आलो आहे... मला येथे भारत आणि पाकिस्तान यात काहीच फरक वाटत नाही. तीच जमीन, तीच हवा, तीच प्रेमयुक्त लोकांची मने. भारत व पाकिस्तानात एकच असल्यासारखे वाटते. तसे तर मला सर्व जग एक वाटते. म्हणून मी जगजगत ही घोषणा देतो." सोनारहाटहून विनोबा भरुगमारी या गावात पोहोचले. भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. येथील सायंकाळच्या सभेत विनोबांनी मत व्यक्त केले की, "मागील अकरा वर्षापासून भारताच्या गावागावातून मी पायी फिरत आहे, पायी फिरण्याचा एक फायदा प्रत्येक गावातील जनतेशी संपर्क येतो. मी गरीबाचा सेवक आहे. जेथे जेथे मी जातो तेथे तेथील गरीबांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न मी करतो. भूदानात मिळालेल्या ४० लाख एकर जमीनीतून १० लाख एकर जमीनीचे वाटप भूमीहीनाना करण्यात आले. मी येथे रिकाम्या हाताने आलोआणि रिकाम्या हातानेच जाऊ इच्छितो. पण येथेही गरीब मजूरासाठी काही जमीन मिळाल्यास मला आनंद होईल. कारण सर्व धर्मात भाकरी वाटून खाण्याचे समर्थन केले आहे. इस्लाममध्येही हीच शिकवण आहे. म्हणून मी आपणास विनंती करतो की येथेही मला थोडी जमीन भूदानात द्यावी." क्षणभर सभेत स्तब्धता पसरली. एका म्हाताऱ्या मुस्लीम गृहस्थाने आपल्या चार एकर जमीनीतील एक बीघा जमीन देण्याची इच्छा व्यक्त केली. दानपत्र करताना मात्र त्याने एक बीघा ऐवजी एक एकर असे लिहून दिले. पूर्व पाकिस्तानच्या भूमीवरील हे पहिले भूदान होते. त्या गृहस्थाचे नाव होते अब्दुल खलिफ मुन्शी. अब्दुल खलिफ मुन्शी हा पूर्व पाकिस्तानमधला रामचंद्र रेड्डी झाला. विनोबांच्या पूर्व पाकिस्तानच्या प्रवासात १७५ बीघे जमीन ती तेथे हिंदु मुस्लिमात वाटू देण्यात आली. भूदानात मिळाली ११ सप्टेंबर १९६२ हा विनोबांचा ६०वा वाढदिवस. या निमित्त पूर्व पाकिस्तानच्या गव्हर्नरने त्यांचे तारेने अभिनंदन केले. तेथे गीता, कुराण पाठ, रविंद्रनाथ टागोरांची गीते, मराठी भजनाचा कार्यक्रम झाला. शेवटी विनोबांनी भूदान आंदोलनाची माहिती श्रोत्यांना दिली. १४ सप्टेंबर १९६२ रंगपूर या गावी विनोबांनी पाकिस्तानी साहित्यिकांची भेट घेऊन मूलभूत (बुनियादी) लोकशाही संबंधात काही शंका विचारल्या. तेव्हा विनोबा म्हणाले, "जर युनियन कौन्सिलानी प्रेम करुणा यांच्या आधारावर ग्रामीण पुननिर्मितीचे काम सुरू केले की खरी लोकशाही निर्माण होण्यास मदत होईल. संकटाच्या वेळी लोकशाही खुद्द स्वतःलाच गमावून बसते. पण अहिंसेशिवाय खरी लोकशाही निर्माणच होऊ शकत नाही. हिंसेवर आधारित लोकशाहीत कोणतेच विधायक कार्य होत नाही." साम्यवादाविषयी प्रश्न विचारला असता विनोबा म्हणाले, "साम्यवादाची शक्ती करुणा आहे मात्र मार्ग हिंसेचा आहे. साम्यवाद फक्त 'नाहीरे' वर्गाचेच दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो...'
अहिंसक क्रांती कशी घडवता येईल या प्रश्नाच्या उत्तरात विनोबा म्हणाले, "अहिंसक सामाजिक क्रांतीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. पद जितके लहान तितकी सत्ता अधिक, जस जसे पद मोठे (वरीष्ठ) होत जाईल तस तसा अधिकार कमी होत गेला की यातून सहकारी समाजव्यवस्था उदयाला येईल आणि सर्वात शेवटी त्यातून व्यक्ती विकासास पूर्ण संधी मिळेल. अंततः समाजहीत म्हणजे स्वहीत हा दृष्टीकोन निर्माण होईल. " या सर्व व्यवस्थेत भूदानाचे स्थान काय? असा प्रश्न विचारला असता विनोबांनी उत्तर दिले की, अहिंसक समाज रचना हे जसे अंतिम ध्येय आहे तसेच त्याचा आधार ग्रामदान असेल. ग्रामदानातून अहिंसक सामाजिक क्रांती आस्तित्वात येईल.
पूर्व पाकिस्तानात विनोबा आणि त्यांच्या विचाराला बरीच लोकप्रियता मिळाली. "बहुत बडा फकीर भारतसे आया है।" किंवा "म. गांधींका अनोखा चेला' अशी त्यांची ओळख झाली. एका पत्रकाराने विनोबांना अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला, "पूर्व पाकिस्तानात जमीन कमी आहे. पूर्व पाकिस्तानला काही जमीन देण्यासाठी आपण भारत सरकारला राजी करू शकाल का?" विनोबांनी न अडखळता उत्तर दिले, “भारताचीही हीच समस्या आहे. जमीन वाटप ही प्रत्येक देशाची समस्या आहे. प्रेम आणि सहकार्यानेच हा प्रश्न सुटू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र येऊन शेवटी सर्व राष्ट्राचे मिळून एक संघराज्य करावे आणि सर्वांत शेवटी सर्व राष्ट्रांचे मिळून एक लोकसंघराज्य निर्माण करावे म्हणजे सर्व प्रश्नाचा हळूहळू विलय होईल. "
रंगपूर, दिनाजपूर मार्गे विनोबा पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर येऊन पोहोचले. दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांची त्यांना अभिवादन केले. जगजगत म्हणत विनोबांनी पूर्व पाकिस्तानचा निरोप घेतला आणि भारतात पुनर्प्रवेश केला.
प. बंगालमध्ये : पूर्व पाकिस्तानातून विनोबांनी भारतात प. बंगालच्या दिनाजपूर या गावी प्रवेश केला. त्यांनी जाहीर केले की, “जितके दिवस येथे माझी गरज असेल तितके दिवस मी या ठिकाणी मुक्काम करीन." यापूर्वी विनोबा प. बंगालमध्ये आले होते. मात्र यावेळी प. बंगालच्या सर्वच जिल्ह्यातून त्याची पदयात्रा केली व ग्रामदानाचे कार्य अधिक बळकट कसे करता येईल याची आखणी केली. प. बंगालचा संदर्भ घेऊन जेव्हा साम्यवादाविषयी आपली मते काय? असा विनोबांना प्रश्न केला असता आणखी एक नवा अर्थ विनोबांनी सांगितला. साम्यवादाचा मूळ उद्देश चांगला आहे, परंतु तो उद्देश अमलात आणण्याच्या मार्गामुळे जगाचे विभाजन दोन गटात होण्याची शक्यता मात्र निर्माण होणार आहे. साम्यवाद हा सिन्थीसीस नसून अँटीथिसीस आहे. सिन्थीसीसमुळे प्रेम आणि करुणा या माध्यमातून व्यक्ती आणि समाज दोहोत बदल करता येतो. अँटीथिसीसमुळे शक्य नाही.'
प. बंगालच्या पदयात्रेतील महत्त्वाची घटना म्हणजे 'प्लासी'या गावाचे ग्रामदान. या निमित्ताने विनोबाने सांगितले, "प्लासी हे तेच ऐतिहासिक गाव आहे जेथे लॉर्ड क्लाईव्हने नबाब सिराजुद्दौलाचा १७५७ साली पराभव करून ब्रिटिश साम्राजाचा पाया घातला होता. दोनशे वर्षानंतर याच प्लासी गावाने सर्व संमती आणि पारस्परिक सहकार्यावर आधारित एका कुटुंबासारखे राहण्याचा निश्चय केला.
"चीनी आक्रमणः ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. चीनच्या या कृतीचा विनोबांना धक्का पोहोचला. आपल्या २४ ऑक्टोबरच्या भाषणात विनोबांनी चीनच्या या हल्ल्याचा निषेध केला, भारताने नेहमीच चीनशी प्रेमाचे संबंध ठेवले असताना विनाकारण चीनने ही आगळीक केली आहे. ३००० मैल लांब सीमेचे संरक्षण ही अत्यंत अवघड बाब असल्यामुळे जनतेच्या सहकार्य आणि एकात्मतेतूनच मात्र हे सहज शक्य आहे. डोळ्यात तेल घालून आम्ही सावध राहू तेव्हाच हे शक्य आहे." पुढे विनोबा म्हणाले, "चीनी आक्रमणाचा उद्देश फक्त आमच्या देशाची काही हजार चौरस मैल प्रदेश, हडपणे हा नसून हे दोन विचारधारेतील युद्ध आहे. चीन भारतावर साम्यवादी विचार लादू इच्छित आहे. जर हे आक्रमण असेल तर आपण ही सर्वोदयी विचार घेऊन त्याचा सामना केला पाहिजे....".
कटीहार येथील सभेतही चीनी आक्रमणासंबंधी आपले मत व्यक्त केले. "चीनी आक्रमणामुळे देशातील जनतेत जी जागरुकता निर्माण झाली आहे अशी पूर्वी कधीही जाणवली नाही. यातूनच देशाची शक्ती आणि हार्दिक एकात्मतेची ओळख होते. या एकात्मतेचा उपयोग समाजातील 'आहेरे' आणि 'नाहीरे' वर्गात एकात्मता निर्माण करण्यासाठी व्हावा. चीनशी सामना फक्त सैन्याच्या जोरावर होऊ शकत नाही हा सामना सामाजिक आणि धार्मिक स्तरावर ही करावा लागणार आहे.'
दुसऱ्या एका भाषणात विनोबा म्हणतात, "चीनचे हे आक्रमण म्हणजे विस्तारवादाचे स्पष्ट उदाहरण होय. हा साम्यवाद नाही. आपल्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी चीन साम्यवादाचा आधार घेत असला तरी विस्तारवादाचे अंतिम स्वरूप सर्वनाशच असतो. पंचशीलला मान्यता देऊनही चीनची ही कृती निंदनीय •असून आक्रमकाची आहे. म्हणून जगाच्या हितासाठी चीनने परत जावे कारण शस्त्राने संघर्ष नष्ट होत नाही संघर्ष वाढतो. म्हणून मी कोणत्याही प्रकारच्या संघर्षांच्या विरुद्ध आहे. भारताने तर युद्धाचा विचारही मनात आपला नव्हता. भारताने नेहमीच शांततापूर्ण विचारविनिमयाची भूमिका केलेली आहे. चीनचे आक्रमण साम्यवादाच्या दृष्टीनेही अनुचित असून जयजगत यावर विश्वास ठेवणाऱ्या विश्व नागरिक या नात्याने मी चीनला पुन्हा विनंती करीन की त्यांनी परत जावे. "
याच काळात विनोबांनी भारतीय जनतेने एकता आणि खंबीरपणाने प्रसंगाला सामोरे जावे असे आवाहन केले." आक्रमणातच एकत्र येण्याची वाट न पाहता सर्वांनी एकत्र येऊन एक समान कार्यक्रम तयार करावा ज्यामुळे आपण आपल्या पूर्ण शक्तीचे प्रदर्शन करू शकू." यासाठी शांतीसैनिकांनी देशभर फिरून जनतेत एकता सहकार्य आणि सामाजिक खंबीरपणा वाढवण्यासाठी प्रचार करावा. भारतावर हे युद्ध लादले गेले असले तरी भारताने द्वेषाची अथवा शत्रुत्वाची भावना बाळगू नये. भारताने आपली पारंपारिक शांतता आणि मैत्रीचे धोरण न सोडता उभे राहावे असा सल्लाही विनोबांनी भारतीय नेत्यांना दिला.
चीनी आक्रमणाचा सामना करण्यासाठी शांतीसैनिकांनी सीमेवर जावे का? असा प्रश्न केला असता विनोबा उतरले, "असे करणे मूर्खपणाचे ठरेल. कारण आक्रमण करणारे माणसे नसून ते यंत्रवत आहेत. व्यक्तीचे कोणतेही लक्षण त्याच्यात नाही. मालकाने आदेश दिला आणि नोकराने- शिपायाने त्याच्या आदेशाचे पालन केले. शांतीसैनिक, सर्वोदय कार्यकर्ते जर सीमेवर गेले तर त्यामुळे सरकार अडचणीत येईल अशावेळी शांतीसेनेने आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांनी आपली शक्ती अंतर्गत शांतता निर्माण करण्यात खर्च करावी. देशपातळीवर यश आल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. "
अण्वस्त्र बंदी संबंधात राजगोपालाचारी, यु. एन. ढेबर यांनी केनेडी आणि क्रुश्चेव्ह यांची भेट घेतली. या संबंधी मत देताना विनोबाने स्पष्ट केले की वारंवार भेटी घेऊन विचाराचे आदान प्रदान केल्याने एकमेकांची भूमिका कळण्यास मदत होते. परंतु जोपर्यंत आपली नैतिक शक्ती प्रबळ होत नाही तोपर्यंत अशा भेटींना काही अर्थ नसतो. आम्ही देशांतर्गत नैतिक शक्तीचा विकास करू शकलो नाही म्हणून आम्हाला आमच्या संरक्षणासाठी सैन्याची गरज भासते. आम्ही जर आमच्या नैतिक शक्तीचा विकास करून सैन्याऐवजी शांतीसैन्य स्थापन करू शकलो तर आपोआपच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला पाठिंबा मिळेल.
डिसेंबर १९६२ मध्ये कलकत्ता पत्रकार परिषदेत विनोबांनी शस्त्राचा सामना शस्त्रानी करण्याचा विचार खोडून काढीत म्हटले, "चीनचे आवाहन जितके शस्त्राचे आहेतितकेच वैचारिकही आहे. चीनचा साम्यवाद आणि भारताचा लोकशाही समाजवाद असा हा वैचारिक संघर्ष आहे. मूळ प्रश्न आहे या दोन विचारांपैकी कोणता विचार गरीबाचे प्रश्न सोडवू शकेल.