सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें होतें की "खादीचे आणि गादीचें बनत नाहीं. दोहोंचा लढा आहे. आणि ह्या लढ्यांत जर गादी च जिंकायची असेल तर आपण खादी सोडून देऊ."
लोक म्हणतात, "खादीची हि गादी बनूं शकते." "होय, बनूं शकते. द्राक्षाचें हि मद्य बनूं शकते." पण ते बनवू नये. आणि त्याची गणना द्राक्षांत होऊं नये हैं बरें. भावार्थ लक्षांत घ्यायला पाहिजे. आजारी, अशक्त किंवा म्हातारे यांच्यासाठी गादीची व्यवस्था करणें ही वेगळी गोष्ट. आणि शिष्ट मान- लेल्या मंडळींसाठी इतर समाजाहून भेददर्शक असें गादीचें आसन मांडणें ही वेगळी गोष्ट. ह्या दुसऱ्या प्रकारच्या गादीचा खादीशीं विरोध आहे.
ऐदी लोक आणि ढेकूण यांच्या सहवासांत जिनें रहावें, ती गादी शिष्ट लोकांसाठीं मांडण्यांत वस्तुतः त्या शिष्टांचा मान न होतां अपमान होतो. पण दुर्दैव आहे, शिष्टांस हि तो तसा वाटत नाहीं. आम्ही तर शंकरा- चार्याची हि 'गादी' बनवितों. शंकराचार्य तर बोलून गेले- 'कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ' - लंगोटी लावणारा खरा भाग्यवान्- कोणास हें पटो वा न पटो, पण आचार्यभक्तांस तरी पटो.
राष्ट्र वर येतात आणि खालीं जातात. पण ऐदीपणा, विलासीपणा किंवा चाळपणा हा कधीच वर जात नाहीं. शिवाजीमहाराज म्हणत, 'आम्हीं धर्मा- साठीं फकिरी घेतली आहे.' पेशवे पानपतच्या लढाईला हि गेले ते सहकुटुंब सहपरिवार गेले आणि कार्यसिद्धि गमावून परत आले ! गिवन म्हणतो- 'रोम चढलें कां ? साध्या राहणीनें. रोम पडलें कां ? चैनबाजीनें.'
मध्यंतरीं असहकारितेच्या जन्माच्या वेळीं राष्ट्रांतील तरुणांत आणि वृद्धांत, पुरुषांत आणि स्त्रियांत त्यागवृत्तीचा, वीरश्रीचा संचार होऊं लागला होता. सतरा सतरा आणे वार खादी-गोणपाटासारखी जाड – लोक अभिमानाने विकत होते आणि अभिमानाने विकत घेत होते. पुढे हळू हळू आम्ही खादीचें निराळे च गौरव गाऊं लागलों. खादी विकणारे अभिमानानें म्हणूं लागले, 'पहा आतां खादीची किती प्रगति झाली आहे! अगदीं अप- दु-डेट - अद्यतन पोषाख-विलासी, भपकेदार, तलम, जसा पाहिजे तसा खादीचा होऊं शकतो. आणि पुनः पूर्वीच्या मानाने किती तरी स्वस्त ! '. विकत घेणारे हि म्हणाले, 'हें गौरव उत्तरोत्तर असें च वाढो आणि मिलची पूर्ण बरोबरी खादी करो ! पण त्यांच्या लक्षांत येईना की मिलची पूर्ण बरोबरी जर खादीने करावयाची तर खादी हवी कशाला ? मिल च काय - वाईट आहे ? वैद्य स्तुति करूं लागला, 'स्वस्त औषध, पथ्य नाहीं, पाणी नाहीं.' रोगी हुरळला. पण विचारा विसरला कीं 'गुण हि नाहीं.'
गैरसमज होऊ द्यायचा नाहीं. मजुरांना पूर्ण मजूरी देऊन खादी शक्य तितकी स्वस्त करणें हें कर्तव्य नाहीं, असें नाहीं. तसे च सर्व लोकांच्या सर्व प्रकारच्या उपयोगाची सोय करणे गैर आहे असें हि नाहीं. पण गौरव काय गावें एवढा च प्रश्न आहे. बिघडलेल्या डोळ्यांसाठीं चष्म्याची सोव जरूर करावी. पण 'रूप पाहतां लोचनीं सुख झालें वो साजणी' हें भजन गाण्याची ती जागा नाहीं.
ज्ञानदेवांचे दें वचन उच्चारतां च एक प्रसंग ओघाने आठवला. एक रसिक दृष्टीचा कलाधर पंढरपूरला जाऊन आला आणि विटेवरच्या ठोंब्याचे दर्शन घेऊन आला. मला सांगू लागला, 'रूप पाहतां लोचनीं', "सांवळे सुंदर रूप मनोहर' इत्यादि स्लोगन्स म्हणजे उद्घोष हे लोक मोठमोठयाने करतात, पण मला तर 'मूरत' पाहून त्याचा कांहीं प्रत्यय आला नाहीं. ओबड धोबड आकार, नुसता दगड ! शिल्पकार आणि भक्तगण दोघे हि यदृच्छालाभानें संतुष्ट झाले असें म्हणण्याशिवाय गत्यंतर नाहीं. पंचतंत्रांतील तीन धूर्तोनी ज्याप्रमाणे बोलून बोलून बोकडाचा कुत्रा बनविला त्याप्रमाणे या लोकांनीं ओरडून ओरडून ओबड धोबड पाषाणांत -सौंदर्य निर्माण करायचे ठरविलेले दिसते. मी म्हणालो, 'होय. संसाराच्या भीमा नदींत गोते खाणाऱ्या लोकांना बाहेर काढायला ज्यानें कंबर कसली त्याचें मजबूत, चिकट, चिवट, टणक असण्यांत च सौंदर्य आहे. शेषशय्ये- वर लोळणाऱ्या किंवा पंचायतनाचे ठाप मांडून फोटोसाठी तयार झालेल्या देवतेच्या सौंदर्याचें जर तो अनुकरण करता तर त्याची 'शोभा' नसती झाली ? रामदासांनीं शिकविलें 'चातुर्य शृंगारे अंतर । वस्त्रे शृंगारे शरीर । दोहींमध्ये कोण थोर । बरें पहा ॥ म्हणून शिवाजीला कणखर - मावळे लाभले.
माझा समाजवादी मित्र म्हणेल, "तुम्ही गेलांत आपल्या वळणावर, आणि लागलांत दरिद्रनारायणाची पूजा करायला. आम्ही नाहीं दारिद्रयाचे पूजक. आम्ही आहो वैभवाचे पूजक. " मी म्हणत, "ए मित्रा! अगर्दी च पोकळडोक्या बनूं नकोस. आपण 'दारिद्रया'ला कां नारायण म्हणतों ? 'दरिद्रा'ला नारायण म्हणतों. आणि दरिद्राला नारायण म्हटले म्हणजे श्रीमंत नारायण नाहीं असा का त्याचा अर्थ ? मी ब्रह्म आहें, असें म्हटलें म्हणजे तूं ब्रह्म नाहींस असा त्याचा अर्थ होत नाहीं. तूं हि ब्रह्म आहेस. झालें तुझें समाधान ? दरिद्र हि नारायण श्रीमंत हि नारायण दरिद्रनारा- यणाची पूजा त्याचे दारिद्र्य दूर करण्यानें होते, आणि श्रीमंतनारायणाची पूजा खऱ्या श्रीमंतीचा त्याला अर्थ समजावून त्याग करायला लावल्याने होते; आणि तुझ्यासारखा मूर्खनारायण भेटला म्हणजे त्याची पूजा अशा प्रकारें फोड करून सांगण्यानें होते. नाहीं का ? "
पण हा यथार्थ विनोद आपण सोडून देऊ. समाजवादी मित्राला वैराग्य न पटले तर वैभव च सही, वैभव कशाला म्हणतात आणि तें कसे मिळवावें लागतें हे हि प्रश्न आपण सोडून देऊं. पण समाजवादी हा साम्यवादी तरी आहे ना ? चार दोन लोकांना गादी आणि बाकीच्या लोकांना रकटें नाहींतर धूळ, हें तर त्याला पटत नाहीं ? आणि खादीचा गादीशी लढा आहे हैं म्हणताना हा हि अर्थ प्रामुख्यानें माझ्या डोळयासमोर होता. सर्व लोकांना गादी मांडली असती तर तो अगदीं च वेगळा मुद्दा झाला असता. पण हैं शक्य नव्हतें. आणि शक्य नव्हतें तर ते मुळीं च इष्ट नव्हतें, हैं लक्षांत यायला पाहिजे होतें.
आमच्या काही मंडळींत सांप्रत एका बाजूनें साम्यवाद आणि दुसऱ्या बाजूनें विषम वागणूक या दोहोंचा जोर चालला आहे. दोन्ही सुखा- समाधानानें एकत्र नांदू लागली आहेत. फैजपूरच्या काँग्रेसपेक्षां हरिपूऱ्याच्या काँग्रेसमध्ये विषमतेनें प्रगति केली. अध्यक्ष, विशिष्ट पुरुष, शिष्ट पुढारी, सामान्य पुढारी, प्रतिनिधि, माननीय प्रेक्षक, आणि खेडवळ जनता ह्या सर्वोची वर्गवार सोय तिथे करण्यांत आली होती. आणि गांधींच्या तीव्र दुःखाचा तो विषय झाला, हे आतां सर्वाना अवगत आहे. पण ही वागणुकीची विषमता विशिष्ट प्रसंग च प्रगट होते असें नाहीं. आमच्या जीवनांत आणि मनांत च तिचा वास आहे. मजुरांना पूर्ण मजुरी द्यावी का, हा वाद निघू शकतो. व्यवस्थापकांना पूर्ण वेतन द्यावे का, हा वाद निघत नाहीं. ज्यांना आम्ही खेड्यात काम करायला पाठवतो, त्यांनीं ग्रामीण जीवना- नुकूल रहावें असे आम्ही म्हणतों. त्यांना खेडेगांवांत पाठविणारे आणि असे म्हणणारे जे आम्ही त्यांनी स्वतः तसे वागण्याचा प्रयत्न करणे जरूर आहे, ह्याचें तीव्र भान आणि कधीं कधीं मुळींच भान हि आम्हांला नसतें. साम्याची मंदाशी दुष्मनी असली तरी विवेकाशीं तर नाहीं च. म्हणून म्हाताऱ्यां- साठी गादी तर आपण मान्य केली च आहे, तसा खेडेगांवांत जाणारे तरुण कार्यकर्ते आणि त्यांना तिथे पाठविणारे वडील नेते हयांच्या जीवनांतला थोडाफार फरक अर्थात् विवेकाला पटणारा आहे, आणि म्हणून साम्यतत्त्वाची हि त्याबद्दल तक्रार राहणार नाहीं. पण जो फरक असतो तो थोडाबहुत नसतो. प्रायः अत्यंत ढोबळ, डोळयांत सहज भरणारा किंबहुना डोळ्यांत सलणारा असतो. या विषम वैभवाला मी गादी म्हणतो; आणि तिचा खादीशी उभा दावा आहे, असें माझें म्हणणें आहे.
परवा आमच्या येथे गोष्ट चालली होती. आश्रमची वसाहत वाढून राहिली आहे. त्यासाठी नवीन जागा घेऊन ग्रामरचनेच्या शास्त्राप्रमाणे आतां सुयोग्य आखणी करावयाची आहे. विणकर, कांतणार, सुतार इत्यादि मजूर; व्यवस्थापक मंडळी, कुटुंबीजन, दफ्तरचे कार्यकर्ते, आश्रमवासी, मेहमान इत्यादिकांसाठी कसकशा प्रकारची घरे बांधायची, असे विचारणारा मला विचारीत होता. तो स्वतः साम्यपूजक तर होता च, आणि मी साम्यवादी आहे हैं हि तो जाणत होता. मी स्वगत आणि प्रगट म्हटलें, 'मला डाळ. पचत नाहीं म्हणून मी दहीं खार्तो. आणि मजुराला दहीं रुचत असले तरी तो डाळ पचवू शकत असल्यामुळे डाळीवर भागवितो. एवढी विषमता आम्ही विवेकाच्या नांवानें जिरविली समजा. पण घरें सुद्धां आम्हांला वेगवेगळ्या प्रकारची पाहिजेत का ? मजुरासारखें घर मला कां चालू नये ? अथवा माझ्यासारखे घर त्याचें का बांधू नये ? '
वैराग्याचें नांव घ्या किंवा वैभवाचे नांव घ्या. पण वैषम्य सहन करूं नका. ह्यालाच आत्मौपम्य म्हणायचे. खरा साम्यवाद हा च. आणि तो आजच्या आज अमलांत आला पाहिजे. नुसता साम्यवाद महत्त्वाचा नाहीं. 6 'आजच्या आज साम्यवाद' महत्त्वाचा आहे. आजच्या आज साम्यवाद कसा अमलांत आणायचा ह्याच्या युक्तीला अहिंसा म्हणतात. अहिंसा म्हणते, तुझ्यापासून आरंभ कर म्हणजे आजच्या आज आरंभ होईल. अहिंसेची खूण खादी. ती च जर भेदभाव सहन करील तर तिनें आपला गळा आपण कापून घेतला असें नाहीं म्हणावे लागणार ?
'खादीचें गादीशीं बनत नाहीं' हैं वरील सर्व अर्थाचें संग्राहक सूत्र- वाक्य आहे.