यज्जातीयो यादृशो यत्स्वभावः
पादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि ।
तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावः
झिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥
-श्रीकुरथल्वार
हा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा :
भगवताच्या चरणाच्या सावलीचा ज्यानें आश्रय केला त्याला भगवान् सुदरराज वात्सल्यभावानें मिठी मारतो. भक्त ज्या जातीचा, जशा स्वभावाचा, आणि जसा असेल, देव त्याच्यासाठी त्या जातीचा, तशा स्वभावाचा आणि तसा बनत असतो.
मदुरेजवळील सुप्रसिद्ध 'अळगार' मंदिरात भगवान् विष्णूची मूर्ति फार प्राचीन काळीं स्थापिलेली आहे. त्या मूर्तीला सुंदरराज हे नाव आहे. हिंदी-प्रचार सभेच्या पदवीदान समारंभासाठी मद्रासला गेलो असता मदुरा येथील मीनाक्षीदेवीच्या दर्शनाला जाऊन आलो. त्या वेळी तेथून ८ मैलावर डोंगरातील सुंदर स्थानात वसलेल्या ह्या सुंदरराजाचे दर्शन प्रभु-कृपेने मला लाभले होते. कारण, मीनाक्षीप्रमाणे मुदरराजाचे हें मंदिर हि हरिजनाना
मोकळे परण्यात आले आहे मूर्ति नायाप्रमाणे च सुंदर असून पंढरपूरच्या पारगामी आठवण यरून देणारी आहे. घटीयर हात नाहीत, बावी थाट तोच आहे. कोरीव काम, भव्य गोपूर इत्यादि दक्षिणेकडील विशेषता आहे. ती अर्थात् पाडुरंगाला राभलेली नाहीं. बाकी भक्तवत्सलता तीच आहे. पाइरगाप्रमाणे च गुदरराज द्दि तिनडे 'चित-चोर' ह्या सशेनें प्रसिद्ध आहे. पाइरगाची प्रसिद्धि हि मुदरराजाच्या भक्त-मडळीत आहे. त्यापैकी एकानें पाइरंगाचे वर्णन जसे पेले आहे :
मा यात पान्थाः पथि भीमरथ्यां
दिगम्बरः कोऽपि तमाल-नीलः ।
विन्यस्त-हस्तोऽपि नितम्ब विम्ये
धूर्तः समाकर्षति चित्त वित्तम् ॥
"वाटसरानो, भीमानदीच्या रस्त्यावर जाऊ नका. तिथे सावळ्या रंगाचा एक दिगनर राहतो कमरेवर हात ठेवून उभा दिसतो, पण असा धूर्त आहे की लोकाचे चित्तरूप चित्त हरून घेतो. "
पाइरग आणि सुंदरराज दोन्ही मिळून देव एकच आहे देवाचा स्वभाव देवाने वध च सोडला नाहीं. कनवाळू, कृपाळू, भक्तवत्सल, जात- गोत न पाहणारा, नामदेवाच्या भाषेत "सर्वोलागीं द्यावें समान दर्शन " अशा वृत्तीचा मुदरराजाच्या मंदिरात हरिजन प्रवेश झाल्यामुळे नामदेवाची आणि कुरथत्वारची भावना त्याच्या बाबतीत तृप्त झाली, असें म्हणता येईल. पाडुरगाचे असे केव्हा होईल । तेथें मनुष्यमानाला प्रवेश केव्हा लाभेल ? नामदेवाच्या काळी तर नामदेवाला च सुद्द त्याच्या लूटमारीच्या धद्यास्तव आरभी पढरपूरच्या देवळात प्रवेश मिळाला नव्हता. तेव्हा-
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा ।
पतित-पावन न होसि म्हणुनी जातो माघारा ॥
असा नामदेवाला सत्याग्रह करावा लागला होता. त्याच्या पुरता तो सत्याग्रह त्या वेळी यशस्वी झाला पण आता एकूण हरिजनातर्फे सर्व भक्त मंडळींनीं नामदेवाप्रमाणे सत्याग्रह करण्याची जरूर आहे. सत्यामद्द हरिजनानीं देवळात घुसण्याचा नव्हे तो दुराग्रह होईल पण जोपर्यंत हरिजनाना प्रवेश नाहीं तोपर्यंत मंडळींनी तेथें न जाण्याचा.
हा सत्याग्रह माझा तर सतत चालू आहे. माझी पाडुरगाविपर्यांची भक्ति माझें हृदय जाणते. माझी मूर्तीच्या दर्शनावर श्रद्धा आहे. ज्ञानदेवा- दिवाच्या विचार-संगतत माझा आतापर्यंतचा जन्म गेला आहे. पण अजून भी इच्छा असून हि पारगावें स्वनेत्रानीं दर्शन कर शक्लों नाहीं. जोपर्यंत हरिजनाना तुझ्या या राउळात प्रवेश नाहीं, तोंपर्यंत मी हि माझ्या जागीं बरा " असे मी पाडुरंगाला म्हणत असतो. माझी तळमळ तो जाणतो आणि त्याला हि ती च तळमळ आहे याविषयीं मला शंका नाहीं.
"काळी घोंगडी काळी काठी ।
काळा दोरा कंठीं बोली महाराची थेट महाटी ।
गांडीस लंगोटी पाई वाहणा मोठा शाहणा ।
पतित-पावन नाम जयाचे "