shabd-logo

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023

6 पाहिले 6


माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ खेड्यांत राहतात. ३५ कोटि लोकांतील जास्तीत जास्त ४ कोटि लोक शहरांत आहेत. ३१ कोटि खेड्यांत आहेत. परंतु या एकतीस कोटींचे लक्ष त्या शहरांकडे सारखे आहे. पूर्वी असें नव्हतें. खेडीं दीनवाणेपर्णे शहरांकडे पहात नसत. परंतु आज सर्व स्थिति पालटली आहे. आज शेतकऱ्याला दोन देव झाले आहेत. आतांपर्यंत एक च देव होता. त्याच्यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावी. पाऊस पाडणाऱ्या देवाकडे पाही. परंतु आतां भाव ठरवणाऱ्या देवाकडे हि पहावें लागतें. याला च अस्मानी सुलतानी म्हणतात. अस्मानानें वांचविलें पाहिजे व सुलतानानें हि वांचविले पाहिजे. देवानें 'पिकविलें पाहिजे आणि शहरानें भाव दिले पाहिजेत, असे हे दोन देव, एक आकाशांतला व दुसरा अमेरिकेतला, शेतकऱ्याला भजावे लागतात. परंतु असे दोन दोन देव कामाचे नाहींत. वरचा देव ठेवा व गांधी म्हणतात,

[ खानदेशातील दौन्याचे प्रसंगी कासारे येथे दिलेलें प्रवचन. ]

दुसरा देव सोडा. एक देव बस्स आहे. आतां या दुसऱ्या म्हणजे शहरी देवाची भक्ति कशी सोडून द्यायची तें मी सांगतों.

आपल्या खेड्यातील सारी लक्ष्मी येथून उठून शहरांत जाते. माल- काच्या घरून उठते व बाहेर चालती होते. ह्या गांवलक्ष्मीचा पाय खेड्यांत ठरत नाहीं. ती शहरांकडे धांव घेते. जसें डोंगरावर पाणी भरपूर पडते परंतु टिकतें का तेथे ? ते चारी बाजूंनीं धांवत सुटतें. पुन्हां डोंगर कोरडा चा कोरडा. खेड्यांतील लक्ष्मी अशी चार दिशांनीं धांवत सुटते. दिला जर पाय- बंद घालतां आला तर खेडें सुखी होईल.

ही खेड्यांतील लक्ष्मी कोणत्या वाटांनीं धांवत जाते तें बघा. त्या वाटा बंद करा म्हणजे ही अडकेल. हिचा जाण्याचा पहिला मार्ग म्हणजे बाजार, दुसरा लग्न-व्यवहार, तिसरा सावकार, चौथा सरकार आणि पांचवा व्यसनें, या पांची वाटा बुजवावयास आरंभ करूं या.

प्रथम लग्नाची गोष्ट घेऊ. कारण ती माझ्या दृष्टीने अगर्दी च सोपी आहे. तुम्ही लग्नांत कांहीं थोडा-थोडका पैसा खर्च करीत नाहीं. त्या साठीं कर्ज देखील काढतां. मुलगी मोठी होते, सासरी नांदायला जाते. परंतु लग्नाच्या वेळच्या कर्जातून आईबाप मुक्त होत नाहींत. ही वाट कशी बुज- वावयाची ते मी सांगत. तुम्ही म्हणाल, "खर्च कमी करा, जेवण देऊं नका, समारंभ कशाला पाहिजे ?" असें कांहीं तरी सांगाल, तर तसें नाहीं. समारंभ खूप करायचा. थाट कमी करायचा नाहीं. पण कमी खर्चात, माझ्या पद्धतीनें पूर्वीपेक्षा मोठा थाटमाट मी तुम्हांला देतों.

मुलामुलींचें लग्न आईबापांनी ठरवावें. परंतु तेवढेच त्यांचे काम. लग्न लावणे, समारंभ करणे हे सर्व काम गांवचे. आईबापांनी लग्नांत एक पैहि खर्च करावयाची नाहीं. जे करतील त्यांना दंड होईल, असा कायदा च. खेड्यांत करायचा.

समजा माझ्याकडे लग्न आहे. तर गांवांतील प्रत्येकाने दोन-दोन चार- चार आणे, जे ठरवाल तें, माझ्याकडे आणून द्यावयाचे. जणूं मला सो सर्वोनी अहेर केला. सर्व गांवाला त्यांतून जेवण देतां देईल. पैसा न सांठवतां, कर्ज न काढतां लग्न होईल. दरवर्षी खडयांत २०-२५ लग्ने लागत असतील. तर मला दोन आण्यांप्रमाणे २५x२=५० आणे म्हणजे ठोकळ मानानें तीन रुपये द्यावे लागतील. माझ्याकडे दहा वर्षांनीं लग्न करण्याची वेळ आली. मला दरवर्षी ३ रुपये याप्रमाणें दहा वर्षांत तीस रुपये द्यावे लागले. आतां माझ्याकडे लग्नाची वेळ आली. मला खर्च नाहीं. माझ्याकडे लोक अहेर आणतील, सारे जमतील समारंभ मोठा होईल; आणि खर्च काय तर गेल्या दहा वर्षांत जे तीस रुपये मीं दिले तेवढा च ! म्हणजे माझ्या घरचें लग्न ३० रुपयांत झालें. आणि त्यांत सराा गांव, सारी जात सामील. सारे भोजन समारंभाला हजर. मुलांमुलींना किती आनंद होईल ! त्या वधूवरांना सर्वोचे आशीर्वाद मिळतील. सर्वांचे आशीर्वाद मिळणे ह्याहून अधिक भाग्य तें कोणतें? लग्नांत लोक बोलवावयाचे, याचा उद्देश हा च कीं सर्वोचीं सदिच्छा, सर्वोचा आशीर्वाद मिळावा. या मुलांमुलींच्या संसाराबद्दल सर्वोन सहानुभूति व आशा व्यक्त करावी. मुले फक्त आईबापांची नसतात. तीं साऱ्या समा जाची असतात. मुलांनीं बरें केलें तर साऱ्या गांवचे भलें होतें. वाईट केलें तर सान्या गांवचे वाईट होतें.

कोणी आपल्या पैशानें लग्न केलें तर पाप माना. तो गांवकऱ्यांनी स्वतःचा अपमान समजावा. आईबापांची मुळे तशीं सर्व समाजाचीं. आई- बाप मेले तर उकिरड्यावर मुलें फेंकून देतां का ? गांव संभाळ करतो, मदत करतो. गांव लग्न हि लावील. तुम्ही या मार्गाने जाऊन पहा. प्रयोग करून पहा. सावकाराचे कर्ज हटतें कीं नाहीं तें पहा. तुमचा कर्जबाजारीपणा कमी होईल. भांडणे कमी होतील. सहकार्य व आत्मीयता नांदती .

दुसरी वाट म्हणजे बाजाराची. तुम्ही खेडेगावचे लोक कापूस पिकवतां परंतु तो सारा विकून टाकतां आणि कापड बाहेरून विकत घेऊन येतां. पेरणीसाठी सरकी सुद्धां शहरांतून विकत घेतां ! ऊस येथें करता. तो विकून साखर बाहेरून विकत घेऊन येतां गांवांत भुईमूग, तीळ, जवस होतो. परंतु तेल आणावयाचे शहरातील गिरणीचें. आतां धान्य पाठवून भाकरी मुंबईहून मागवायची एवढे च शिल्लक राहिलें आहे ! तुम्हांला बैल सुद्धां बाहेरून विकत आणावे लागतात. असें सारें बाहेरून आणाल तर कसें 'निभणार ?

बाजारांत कां जावें लागतें ? ज्या गोष्टी लागतात, त्या गांवांत च शक्य ताँ तयार करावयाच्या असा निश्चय करा. स्वराज्य म्हणजे स्वदेशाचें राज्य • स्वतःच्या खेड्याचे राज्य. तुम्ही घरीं जा व आपल्या गांवांत काय काय करता येईल ते पहा. स्वतःला काय काय लागतें तें पहा. तुमच्या शेतीला उत्कृष्ट बैल हवेत. ते विकत कोठवर घेणार ? तुम्ही च उत्कृष्ट बैल गांवांत तयार केले पाहिजेत. गाईचें चांगलें पालन करा. एक दोन चांगले वळू त्या गाईत सोडा. बाकीचे खच्ची करा. यार्ने गाईची प्रजा सुधारेल, बैल चांगले 'मिळतील. बैलांचे दोर, नथा वगैरे लागतील. गांवांत च आंबाडी, सण, तांग यांचे ते करून घ्या. तुम्हांला कपडा पाहिजे, तर तो गांवांत च तयार करवा. गांवांत विणकर नसेल तर दोन मुलांना शिकवून आणा. प्रत्येकाने घरी कांतले पाहिजे. वर्षामध्ये थोडासा वेळ सहज मिळेल. भुईमूग गांवांत आहे. तेलाचा घाणा येथे च सुरू करा म्हणजे ताजे तेल मिळेल. ऊस गांवांत होतों त्याचा गूळ करा. साखरेची मुळीं जरूर च नाहीं. गूळ हा उष्ण मानतात. परंतु पाण्याशीं मिळतां च थंड होतो. गुळामध्ये प्रकृतीला पोषक द्रव्ये आहेत. गूळ करा. चिपार्डे जळणाला होतील. गांवांतील चांभाराकडून च जोडे करून घ्या. अशा रीतीनें गांवांत व सारें निर्माण करावयाचें. पूर्वी आपली गांवें अशीं च स्वावलंबी होतीं. खरे स्वराज्य त्यांच्याजवळ होते.

गांवांत धान्य, गांवांत वस्त्र, गांवांत गूळ, गांवांत तेल, गांवांत जोडे, गांवांत दोर, गांवांत बैल, गांवांत घरीं च दळलेले पीठ अशा रीतीने वागूं लागा. म्हणजे तुमचीं खेडीं कशी भरारतील ते पहा. तुम्ही म्हणाल हें महाग पडेल. ही निव्वळ कल्पना आहे. मी उदाहरण देऊन समजावून सांगतों. तुमच्या गांवांत एक रंगारी आहे, एक विणकर आहे, एक तेली आहे, एक चांभार आहे, असे समजा. आज चांभार काय करतो ? तो म्हणतो की तेल्याकडचें 'तेल मी घेणार नाहीं. ते महाग पडते, मी शहरांतलें घेईन. तो तेली काय म्हणतो ? माझ्या गांवच्या चांभाराने केलेला जोडा महाग आहे. मी शहराला घेईन. विणकर म्हणतों, मी खेड्यातील सूत घेणार नाहीं. मिलचें चांगलें असतें. मग शेतकरी म्हणतो, मी विणकराने विणलेले घेणार नाहीं. मिलर्चे च विणलेले विकत घेईन. ते स्वस्त असतें. अशा रीतीनें आज आपण एकमेकांस मारण्याचा धंदा चालविला आहे. परस्परांस सांभाळणे 'हा धर्म, तो सोडून परस्परांस धुळीत मिळवीत आहोत. पण गंमत पहा. तेल्यानें चांभाराकडचा चार आण्यांनी महाग जोडा घेतला. तेल्याच्या खिशातील आज चार आणे गेले. पुढे तो चांभार हि तेल्याकडे चार आण्याने महाग असलेले तेल घेईल. म्हणजे ते गेलेले चार आणे परत येतील. तें महाग पडलें नाहीं. जेथे परस्पर व्यवहार आहेत, तेथे महाग हा शब्द च येत नाहीं. ते गेलेले पैसे अन्य रूपाने परत येतात. त्याने माझें महाग घेतले व मीं त्याचें महाग घेतलें कीं हिशेब सारखा. ह्यांत बिघडलें कोठें ? महारानें खादी काढली, ती तेल्याने घेतली. तेल्यानें तेल काढले, तें महाराने घेतलें. तेल्याला खादी महाग. महाराला तेल महाग. एकूण एकच. तेलांत गेलें तें खादींत परत मिळाले व खादींत गेलें तें तेलांत परत मिळालें. एका हातानें द्यावयाचे व दुसऱ्या हाताने घ्यावयाचे; असा हा खेळीमेळीचा सहकार्याचा प्रकार वड्यांत पूर्वी होता. परंतु तो आज लोपला आहे.

खेड्यांत प्रेम असते, बंधु-भाव असतो. खेड्यांतील लोक एकमेकांच्या गरजा पहाणार नाहीत, तर तें खेर्डे च नाहीं. तें शहरासारखे होईल. शहरांतील लोक कोणी कोणाला विचारीत नाहींत. सारे स्वार्थासाठी तेथे जमलेल असतात. जसा एखादा शेणाचा पुंजका असला की शेंकडों किडे तेथे जमतात; त्या सडूं पहणाऱ्या शेणावर शेकडों किडे लवलव करतात. ते किडे तेथे कां जमा झाले ? त्या किड्याला विचारा, येथें कां रे आलास ? : कोणी बहीण- भाऊ येथे आहेत का ? तो किडा म्हणेल, मी शेण खाण्यासाठी येथे आल आहे आणि शेण खाण्यांत दंग आहे, मला जास्त बोलावयास सवड नाहीं. बर्फी, गूळ यांवर माशा जमतात, त्या का एकमेकांच्या प्रेमामुळे १ त्याप्रमाणे. शहरांत माशांसारखी जीं माणसें घोंगावत असतात तीं का प्रेमानें ? शहरांत स्वार्थ व लोभ आहे. खेर्डे प्रेमामुळे बनते. खेड्यांत आग लागली, तर सारे कामें टाकून धांवत येतील. घरांत कोणी बनून राहील काय ? परंतु मुंबईला काय होईल स्थिति ? 'बंब जाईल, मला आहे काम' असे सगळे म्हणतील. - म्हणून एका कवीनें म्हटलें आहे,

" खेड्यांस देव निर्मी
नगरास निर्मि मनुज'
स्वेड्यांना देव बनवितो. शहरांना माणूस बनवितो.

आपले पूर्वज खेड्यांत राहत. आज जो उठला तो चालला शहरांत. आहे काय तेथें ? तेथे पिवळे दगड असतात आणि धूळ असते. खरी लक्ष्मी खेड्यांत आहे, झाडांना फळे येतात, मळ्यांत गहूं होतो, ऊंस होतो, ही खरी लक्ष्मी. ही खरी लक्ष्मी विकून पांढरे पिवळे गोटे घेऊं नका. तुम्ही शहरांत जाऊन तेथून स्वस्त माल घेऊन येतां, परंतु सारे च असें करूं लागले व खेडीं भयाण दिसूं लागलीं. खेडीं जर सुखी व्हावयास पाहिजे असतील तर हा शहरचा बाजार सोडा. खेड्यांतील वस्तु घ्या. खेड्यांत जी वस्तु नाहीं च होणार ती दुसरीकडून घ्यावयाची. परंतु दुसरीकडून घेतांना सुद्धां आध - दुसऱ्या खेड्यांत तयार होत असेल, तर तेथून घ्यावयाची हे विसरू नका. समजा, येथे बांगड्या होत नाहींत. त्या सोनगीरच्या ध्या. येथे लोटी चांगली होत नाहीं, सोनगीरची घ्या. येथें रंगारी नसेल तर मालपूरहून रंगवून आणा. मालपूर खेड्यांतील रंगारी तुमच्या खेड्यांतून गूळ नेईल व तुम्ही त्याच्या गांवाहून रंगवून आणा. ज्या वस्तु होत नसतील त्यांच्यासाठी इतर खेडी शोधा. शहरांत कांहीं वस्तु आणावयास गेलां च तर हा प्रश्न विचारीत -जा- खेड्यांत तयार झालेली आहे का ? हातांनी बनविलेली आहे का ? आध ह्या वस्तु पसंत करायच्या. यंत्रांनी बनलेला शहरचा तो माल होता होई तो 'निषिद्ध मानावयाचा.
तुमच्या ग्रामपंचायतींनीं ह्रीं कामें हातीं घेतली पाहिजेत. पंचायतीनें गांवच भांडणे सोडवावयाची, हे काम आहे च. परंतु गांवांत काय काय बाहेरून येर्ते, गांवांतून काय काय बाहेर जातें, याची नोंद हि पंचायतीनें केली प्पाहिजे. चौकी ठेवून यादी करावी. नंतर ह्या वस्तु बाहेरून काय म्हणून येतात, ह्या इथे च झाल्या पाहिजेत, अशी खटपट करावी. विणकर नाहीं ? कापण्याहून आणूं दोन मुलें शिकवून. माझ्या गांवांतील च वस्तु खरिदीन माझ्या गांवांत होत नसेल ती गांवांत बनविण्याचा प्रयत्न करीन. असें प्रत्ये- कानें ठरविले पाहिजे. गांवच्या पुढायांनी ह्यांत लक्ष घातले पाहिजे. कसें होईल, काय होईल असें म्हणत बसूं नका. उठा व कामाला लागा की झट सारे होईल. तुमचे तुम्ही मग गांवांतील भाव ठरवाल तेल्याने तेल कसें विकावें, चांभारानें जोडा किती पैशांत शिवावा, विणाई विणकराची काय असावी, तुमचें तुम्ही ठरवाल. एकमेकांनी एकमेकांर्चे खरेदी केले म्हणजे सारे च स्वस्त, स्वस्त व महाग हा शब्द च राहणार नाहीं.

तुमच्या गांवांत काय होणार नाहीं ? सांगा. एक, मीठ होत नसेल, ठीक. मीठ घ्या बाजारांतून. दोन, रॉकेल, वास्तविक रॉकेलाशिवाय चालवितां आले पाहिजे. पण नसेल च चालत तर तें घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे कांहीं मसाल्याचे पदार्थ. मिरची तर होते च येथे. वास्तविक मिरची बंदच करा. मिरचाची शरशिला गरज नाहीं. काड्यांची पेटी घ्यावी लागेल. शिवाय अवजारें घ्यावी लागतील. ती हि गांवांत तयार करण्याच्या उद्योगाला लागलें पाहिजे, पण तूर्त तीं घेतल्याशिवाय सुटका नाहीं. या वस्तु ध्या. रॉकेल एरंडी लावून हळूहळू कमी करा. परंतु याशिवाय बाकीच्या वस्तु गावांत च करा. खादी गांवांत झाली पाहिजे. खादीच्या कपड्याला बटणें तीं सुताचीं खेडयांत च करतां येतील. तीं दुसरी बटणें कशाला ? तीं बट छातीवर नसतील तर तळमळेल कीं काय जीव ? नाही ना ? तर द्या तीं फेकून. ती सांखळी कशाला ? तिच्या शिवाय चालेल ना ? जरूर नाहीं अशा वस्तु गांवांत आणाल तर त्या सांखळ्या साखळदंडाप्रमाणे पायांत बसतील. गळ्याला गळफांस होतील. ह्या असल्या बाहेरच्या सांखळ्या आणून नटूं नका.

भगवान् श्रीकृष्ण कसा नटत असे ! तो का बाहेरच्या सांखळ्या घालीत असे १ वृंदावनांत मीरांचीं जीं पिसें गळलेलीं सांपडत त्यांनीं तो नटे. मोरांची पिसें तो उपटून आणीत नसे. मोरांचीं पिसें तो लावी, तर त्याला काय पिसें लागलें होतें ! तो का वेडा होता १ माझ्या गांवचे हे मोर, त्यांच्या पिसांनी मी नटलों तर हरकत नाहीं. त्यांत त्या मोराची हि पूजा आहे. तो डोक्यावर मोरमुकुट घाली, आणी गळ्यांत काय घाली ? वनमाळा. माझ्या यमुनेच्या तीरावरची फुलें. ती सर्वोना मिळतील. गरिबांस मिळतील, श्रीमं- तांस मिळतील. ती स्वदेशी वनमाळा, खेड्यांतील वनमाळा, गळ्यांत घाली. आणी वाजवी काय ? मुरली. खेड्यांतील बांबूची नळी. तो बांबूचा पावा, तो बांसरी, हें त्याचें वाद्य.

एक गृहस्थ जर्मनींत गेले होते. ते तिकडचा एक प्रसंग सांगत होते : "आम्ही सारे विद्यार्थी एकत्र जमलों होतों. फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, जपानी, रशियन सारे एकत्र बसलो होतों. सर्वांनीं आपापल्या देशांतलि राष्ट्रीय वाद्ये वाजवून दाखविली. फ्रेंचांनीं व्हायोलिन वाजविलें, इंग्लिशांन आपले वाजवले. मला हिंदुस्थानचें वाद्य वाजवून दाखवा असें सांगण्यांत आलें, मी गप्प बसलों, ते मला विचारूं लागलें, 'तुमचें भारतीय अर्से वाद्य कोणतें ? ' मला सांगतां आलें नाहीं." मी त्यांना म्हटले अहो, बांसरी हैं। आपले राष्ट्रीय वाद्य. लाखों खड्यांत ते आहे. साधे परंतु गोड. कृष्ण भग- वानानें तें पवित्र केलेलें. घेतली बांबूची नळी, पाडलीं भोंके की झालें तयार ! असें हें वाद्य श्रीकृष्ण वाजवी. तें गोकुळांतील, स्वदेशी, खडयांतील वाद्य होतें. बरें, श्रीकृष्ण काय खात असे १ बाहेरची साखर आणून का खात असे ? तो आपल्या गोकुळांतील दूध, लोणी खाई. इतरांना खायला शिकवी. गोकुळांतील ही लक्ष्मी मथुरेस गवळणी घेऊन जात. परंतु ही गांवची अन्न- पूर्णा कृष्ण बाहेर जाऊं देत नसे, तो ती लुटून सर्वोना वाटी. सर्व गोकुळां- ती मुले त्याने धष्टपुष्ट केलीं. गोकुळावर ज्यांचे हल्ले आले, त्यांना आपल्या मित्रांना बराबर घेऊन नाहीसे केलें. गोकुळांत राहून करी काय ? गाई चारी. त्याने वणवे गिळले म्हणजे काय केलें ! खेडयांना जाळून टाकणारी भांडण र्ती मिटविली. सर्व मुलें एकत्र जमविली. प्रेम वाढविले. असा हा श्रीकृष्ण गोपाल कृष्ण आहे. तो तुमच्या गांवचा आदर्श आहे. गोपाल कृष्णानें स्वेडयांचे वैभव वाढविलें. गाईची सेवा केली. खेड्यांवर त्याने प्रेम केलें. खेड्यांतील पशुपक्षी, खेड्यांतील नदी, खेड्यांतील गोवर्धन डोंगर, त्यांच्यावर त्यानें प्रेम केलें. खेर्डे म्हणजे त्याचा देव होता. पुढे ते द्वारकेचे राणे झाले, तरी पुन्हां गोकुळांत येत, पुन्हां गाई चारीत, शेणांत हात घालीत, गोठे झाडीत, वनमाला घालीत, बांसरी वाजवीत, मुलांत गोपबालांत खेळत. व्रजकिशोर हें त्यांचे आवडतें नांव. गोपाळ हे त्यांचे आवडतें नांव. गोकुळांत अपार आनंद व सुख त्याने निर्माण केलें. गोकुळींच्या सुखा । अंतपार नाहीं देखा ॥

गोकुळाच्या सुखाला सीमा नव्हती. अशा त्या गोकुळांतील चार शितांचे कण मिळावे म्हणून देव डोकावत. यमुनेच्या पाण्यांत प्रेम-मस्त गोपाळबाळ जेवूण दहीकाला खाऊन हात धुवावयास जात, तर देव मासे होऊन तीं शितें खात. त्यांच्या स्वर्गात ते प्रेम होतें का ? त्या देवांना कांहीं कमी नव्हतें, परंतु प्रेम नव्हतें त्यांच्याजवळ. शहरें म्हणजे तुमचे स्वर्ग ना ? अरे तेथे प्रेम नाहीं, तेथें भोग आहेत, पैसे आहेत. परंतु आनंद नाहीं. तुमचीं खेडीं गोकुळासारखी करा. मग ते शहरांतील नगरशेठ तुमच्या खेड्यांतील मीठ भाकर मिळावी म्हणून धांवत येतील. खेड म्हणजे भरले गोकुळ करायचे आहे. स्वावलंबी, आरोग्यसंपन्न, उद्योगशील, प्रेमळ, अर्धी करावयाची आहेत. उसाचे गुन्हाळ चालले आहे, चरखा चालला आहे, पिंजारी पिंजीत आहेत, तेलाचा घाणा कुर्र करीत आहे, विहिरीवर मोट चालली आहे, चांभार जोडा शिवीत आहे, गुराखी गाय राखीत आहे क पांवा वाजवीत आहे, असें भरलेलें गांव दिसूं द्या. आपल्या चुकांनी आपण खेड्याचा मसणवटा केला, आतां फिरून त्याचें गोकुळ करूं या.

कागद एरंडोलचा च ध्या. दंतमंजन राखुंडीचें च करा. ब्रश बाभ- ळीच्या काडीचे बनवा. परदेशी कागदाच्या माळा आणि पताका नकोत. आपल्या गांवांतील झाडांचे पल्लव, ग्राम-आम्र-पल्लव, त्यांचीं तोरणें करा. गांवां- तील झाडांचा अपमान का करतां १ बाहेरच्या गांवांतील तोरणे लावाल तर गांवांतील झाडे रागावतील. त्यांना हि समारंभात भाग घ्यायचा असतो. त्यांचे पल्लव आणा. आपल्या धार्मिक मंगल कार्यात कागदांचीं का तोरणे सांगितली आहेत ? आंब्याची शुम पार्ने पाहिजेत, आणि घडा पाहिजे. कलश पाहिजे. तो कशाचा असे ? तो टिनपॉटचा चालेल का ? तो पवित्र कलश मातीचा च पाहिजे. तुमच्या गांवच्या कुंभाराने बनविलेला तोच तेथें पाहिजे. पर्वजांनी गांवांतील वस्तूंना च पहा कसे महत्व दिलें होतें. ही दृष्टि घ्या म्हणजे सारें गार्डे बदलेल. निराळी सृष्टि सभोवताली दिसूं लागेल, समृद्धि व आनंद दिसूं लागेल. आपण लग्नाची गोष्ट पाहिली. बाजाराची पाहिली. भातां आर्धी

व्यसनांची गोष्ट घेऊं. आपल्या हातच्या गोष्टी आधीं विचारांत घेऊ. सरकार

व सावकार मार्गाहून पाहूं.

कोणी सारखे फुंक फुंक विड्याच फुंकीत बसतात. म्हणतात विडया घरच्या आहेत. त्या कांहीं बाहेरच्या नाहींत. विष घरचें असेल तर तें खाल का ? घरचें विष खाऊन अगर्दी १०० नंबरी स्वदेशी मरण घ्याल वाटर्ते ? विष घरचे काय किंवा बाहेरचे काय त्याज्य च. त्याचप्रमाणें व्यसनें तेवढीं वाईट. ती सर्व सोडलीं पाहिजेत. तीं मारणारी आहेत. दारूविषयीं म्हणाल तर पूर्वी महाराष्ट्रांत दारू नव्हती. एल्फिन्स्टन साहेब होता पहिला गव्हर्नर महाराष्ट्राचा. त्यानें महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. त्यांत तो म्हणतो " पेशव्यांच्या राज्यांत दारूचें उत्पन्न होत नसे" परंतु आतां दारू पिणारे गांवगांव झाले आहेत. सरकार उलट त्यांची सोय करून देते. पण सोय करून दिली म्हणून आपण दारू प्यायची कीं काय ? हिंदुस्थानांत मुख्य दोन धर्म आहेत. हिंदू व मुसलमान. या दोन्ही धर्मोत दारू पिणें महापाप मानले आहे. मुसलमान धर्म दारू पिणें इराम मानतो. हिंदु धर्म दारू पिणे पंचमहापातकांतील एक पातक मानतो. दारू पिण्यानें आपण साधतों तरी काय ? प्राणाचा, कुटुंबाचा, धनाचा व सर्वोहून प्रिय धर्माचा सर्व वस्तूंचा नाश !

विडी, दारू व तिसरे व्यसन म्हणजे ऊठबस भांडण करणे. कृष्णाने भांडणाचे वणवे गिळले. तंटा करूं नका. तंटा झाला च तर तो गांवांतल्या गांवांत चार सभ्य मिळून सोडवा. कोर्ट-कचे-यांकडे धांव घेऊ नका. कोर्ट- कचेन्या तुमच्या गांवांतल्या गांवांत च पाहिजेत. वस्तु गांवांतील तसा न्याय. हि गांवांत च. तुमच्या गांवांत सारे पिकर्ते, परंतु न्याय पिकत नसेल तर कसे होईल ? गांवांत वस्त्र, तसें गांवांत न्याय. बाहेरची कोर्टें काय कामाचीं ? वस्तूंच्या बाबतीत जसें परावलंबन नको तर्से न्यायाच्या बाबतींत हि नको. प्रेमाने नांदा, थोडे कमी व्यास्त तुमच्याकडे गेले तरी लें गांवांत च आाहे. परंतु तिकडे लांब गेलें तर 'नाहीं मला, नाहीं तुला,' अशी स्थिति होईल. गांवांत च पांचामुखी परमेश्वर आहे. त्याची कास धरा.

भोजनें वगैरे इतर चाली यांचा येथें ऊहापोह करीत नाहीं. जीवन निर्मळ व विचारपूर्वक चालवा. प्रत्येक गोष्ट विवेकानें, विचारानें करीत चला.

आता चौथी गोष्ट सावकार, तुम्ही घरीं च कापूस रेचून बियांपुरती सरकी ठेवलीत, घरीं च कपडा केला, भुईमुग, जवस घरी ठेवून गांवांतील घाण्या- वरून च तेल काढून घेतलें, कोर्ट-कचेऱ्या बंद केल्या आणि भांडणे गांवांत च मिटवली, लन मी सांगितले त्या प्रकारार्ने लावले, म्हणजे सावकाराची मरज बरीच कमी लागेल. परंतु असे करून हि सारे सावकारांच्या पाशांतून मुक्त होतील असें नाहीं. कर्जबाजररीपणा राहील. त्याला आळा बसेल एवढे खरे.

तुमच्या कर्जबाजारीपणाचा संपूर्ण प्रश्न स्वराज्याशिवाय सोडविता येणार नाहीं. स्वराज्यांत सगळ्या सावकारांचे हिशेब तपासण्यांत येतील. ज्या सावकारांना मुद्दलाइतर्के व्याज मिळाले असेल, त्यांचे देणे संपलें असें ठरू शकेल. ज्या सावकारांचे मुद्दल हि घरांत गेलें नसेल - व्याजाच्या रूपाने मुद्दल बरांत गेलें नसेल त्यांच्याशीं तडजोड करूं, अशा कोणत्या तरी मार्गानें तो प्रश्न सोडवावा लागेल. तटस्थ पंच नेमून चौकशी करूम, काय तें करावें लागेल. तोपर्यंत आज सांगितलेल्या उपायांनीं जावयाचे व हळूहळू आपण होऊन सावकारापासून दूर रहावयाची खटपट करावयाची. परंतु कर्ज द्यायचें म्हणून मुलाबाळांची आबाळ करूं नका, मूलाबाळांना, दूध-तूप द्या. नीट खायला द्या. मुळे साऱ्या समाजाची. मी माझ्या सावकाराला सांगेन, 'मुलांना थोडे दूध देऊ का ? माझ्या मुलाबाळांना गरज आहे. मुलें जशीं आईबापांचीं तीं तीं सावकाराची पण आहेत. तीं सान्या देशाची आहेत. तुम्ही मुलांना देत असतांना सावकारालाच देत असतां म्हणूण पोटाला आधी पोटभर द्या. मुलाबाळांस द्या. घरच्या गरजा भागवून मग कर्ज द्यावयास जा. कर्ज द्यावयाचे य आहे. चैन करून नव्हे. खाऊन पिऊन उरलें तर भाणून देऊं भखें सावकाराला सांगा.

अशा रीतीनें चार गोष्टी मी सांगितल्या. खेड्यांतील लक्ष्मी बाहेर जाण्याचे चार मार्ग सांगितले व त्यांना बंद कसे करतां येईल त्याची दिशा हि दाखविली. आतां पांचवी गोष्ट सरकार. हें सरकार कसें बंद करावयाचें ? तुम्ही स्वतःच्या वस्तु बनवूं लागा. आपल्या खेड्यांत बनवूं लागा. म्हणजे सरकार आपोआप ताळ्यावर येईल. सरकार येथें कां राहिलें आहे ? इंग्लंडचा माल सोपेपणानें आम्हां मुर्खोवर लादतां येतो म्हणून. परंतु उद्या शहाणे होऊन गांवें स्वावलंबी करूं तर सरकार आपोआप नरम येईल. वस्तु लागेल ती खेड्यांत च बनवायची. आपल्या खेड्यांत जी बनणार नाहीं ती दुसऱ्या खेड्यांतून घ्यावयाची. शहरांतील कारखान्यांवर बहिष्कार व परदेशी वस्तु तर माहींच नाहीं. परदेशी व देशी कारखान्यांना आपल्या खेड्यांतून तुम्हीं जें खाद्य देऊन राहिला आहांत तें बंद करा. त्याचप्रमाणे एकी करा, भांडू नका. भांडलें तरी गांवांत च त्याचा निकाल करा. कोर्ट-कचेऱ्यांचें तोंड पहावयाचें नाहीं असें ठरवा. गांवांतील च वस्तु, गांवांत च न्याय, असे जर कराल तर एका दगडाने दोन कार्मे होतील. दारिद्याचा त्रास सरेल व सरकार पळेल. तुम्ही असे स्वावलंबी, निर्व्यसनी, उद्यमी व एकोप्यानें वागणारे व्हा. मग तुमचे हक सरकार दिल्याशिवाय राहणार नाहीं. तुमची इतकी ताकत वाढली असून हि सरकार जर हक्क देणार नाहीं तर मग आहे च सत्याग्रह. तो जो सत्याग्रह होईल तो थोड्याथोडक्यांचा सत्याग्रह होणार नाहीं. त्यांत सारी च जनता सामील होईल.

तुम्ही शेतसारा दहा हजार देतां, परंतु कापडासाठी २५ हजार देतां आतां असें समजूं या कीं हें सरकार कांहीं लवकर जात नाही. त्याचा शेत- सारा कमी होत नाहीं स्वराज्य मिळाल्यावर कमी करूं. ती पुढची गोष्ट. परंतु तूर्त कपडा गांवांत च तयार करायचा असे ठरविलें तर काय होईल १ प्रत्येकाला सरासरी ३ शेर रुई लागेल. ३ शेर रुई प्रत्येकाला ह्याप्रमाणे घरांत ५ माणसे धरली तर १५ शेर रुई लागेल. पेरायला लागणान्या सरकीपुरता चांगला कापूस शेतांतून वेचून घरी च रेचा. उत्कृष्ट सरको बेरायला मिळेल. जी रुई होईल तींतून घराला लागणाऱ्या कापडापुरती राखून ठेवावी व बाकी विकून टाकावी. प्रत्येक माणसाला पक्की तीन शेर 
ई म्हणजे माणशी १ रुपयाची. ३२०० माणसांना ४-५ हजाराचा कापूस ठेवावा लागेल. २५ हजाराचा कपडा लागेल. त्यांतून हे ५ हजार रुपये वजा केले म्हणजे बाकी २० हजार रुपये गांवांत राहिले. सरकार शेतसारा दहा हजार नेईल परंतु तुम्ही २० हजार वांचवाल. म्हणून तर गांधी म्हणतात क खादी म्हणजे च स्वराज्य. एका खादीनें च २० हजार रुपये गांवांत राहिले. उद्यां समजा स्वराज्य मिळाले तर काय होईल १ शेतसांरा निम्मा म्हणजे १० हजाराचा ५ हजार होईल. म्हणजे तुमचे ५ हजार रुपये वांचतील पण खादी वापरल्यानें २० हजार रुपये वांचतील. तेव्हां आतां खरें स्वराज्य कशांत आहे हे ओळखा. पूर्वी इतर राज्ये आली तरी हैं खेड्यांतील खरें स्वराज्य कधीं गेलें नव्हतें. म्हणून आपण भिकेस लागलों नाहीं. परंतु या राजवटींत में खादीचें स्वराज्य, खेड्यांतील उद्योगधंद्याचे स्वराज्य, गेलें व म्हणून खेडी भयाण दिसूं लागलीं. इंग्लंडला तुमच्या करापेक्षा, शेतसाऱ्या पेक्षां, या कोट्यवधी रुपयांचा जो व्यापार त्याचा आधार आहे. शेतसान्यां- तून त्याला दहा हजार मिळतील. परंतु तुम्हाला कपडा देऊन तो २० हजार नेईल. साखर, रॉकेल, वगैरे शैकडों अशा च वस्तु आहेत. म्हणून खरें स्वराज्य ओळखा. सरकार पराक्रम करून केव्हां घालवितां येईल तें मग पाहूं. परंतु तोपर्यंत या मी सांगितलेल्या मार्गानें आपापली खेर्डी स्वावलंबी, उद्यमी, प्रेमाने नांदणारी अशीं करा. त्यांत च सारे कांहीं आहे.

Vinoba bhave ची आणखी पुस्तके

1

गीताई

22 June 2023
0
0
0

गीताई विषयीगीताई आणि पू. विनोबा भावे यांच्या गीताई लेखनाविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाला. मनोगतच्या गीताई च्या पुस्तकाच्या आरंभी ही माहिती शोभून दिसेल असे व

2

गीताई

22 June 2023
0
0
0

दुसरा अध्यायसंजय म्हणालाअसा तो करुणा ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणालेकोढूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्या

3

गीताई

22 June 2023
0
0
0

तिसरा अध्यायअर्जुन म्हणालाबुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥श्री

4

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय चोथा[१३]श्री भगवान् म्हणालेयोग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला ।पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥तो चि

5

गीताई

22 June 2023
0
0
0

पाचवा अध्याय[१६]अर्जुन म्हणालाकृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेयोग सन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग स

6

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सहावा [१८]श्री भगवान् म्हणालेफळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प

7

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय सातवा[22]श्री भगवान् म्हणालेप्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित ।जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणून पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥लक्षाव

8

गीताई

22 June 2023
0
0
0

अध्याय आठवा[२४]अर्जुन म्हणालाब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥अधि यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे | प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती

9

गीताई अध्याय नववा

23 June 2023
0
0
0

[२७]श्री भगवान् म्हणालेआता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥लोक

10

गीताई अध्याय दहावा

23 June 2023
0
0
0

[३१]श्री भगवान् म्हणालेफिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षीचे हि मूळ की ॥ २ ॥ओळख

11

गीताई अध्याय अकरावा

23 June 2023
0
0
0

[३३]अर्जुन म्हणालाकरून करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥तुझे ते ईश्वरी

12

गीताई अध्याय बारावा

23 June 2023
0
0
0

[३७]अर्जुन म्हणालाअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले ।श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥

13

गीताई अध्याय तेरावा

23 June 2023
0
0
0

[४०]श्री भगवान् म्हणालेअर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥क्षेत्र - ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ भ

14

गीताई अध्याय चौदावा

23 June 2023
0
0
0

[४३]श्री भगवान् म्हणालेसर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा ।जे जाणून इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे | जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥माझे

15

गीताई पंधरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[४५]श्री भगवान् म्हणालेखाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग पाने गुण- पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती

16

गीताई अध्याय सोळावा

26 June 2023
0
0
0

[४९]श्री भगवान् म्हणालेनिर्भयत्व मनः शुद्धि योग ज्ञानी सुनिश्चय ।यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता ।अ- लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥

17

गीताई सतरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५३]अर्जुन म्हणालाजे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धा पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥श्री भगवान् म्हणालेतिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक

18

गीताई अठरावा अध्याय

26 June 2023
0
0
0

[५५]अर्जुन म्हणालासन्यासाचे कसे तत्व त्यागाचे हि कसे असे |मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥श्री भगवान म्हणालेसोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते सन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग

19

गीताई अधिकरणमाला

26 June 2023
0
0
0

एक ऐतिह्य कथन दोन दैन्य-प्रदर्शन तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि योग तो सात योगी स्थितप्रज्ञ थोर आदर्श आमुचा ॥१॥आठ साधावया बुद्धि कर्म-योग अवश्यक&nbsp

20

पहिला सत्याग्रही

27 June 2023
0
0
0

म. गांधी नंतर म. गांधींचा विचार जिवंत ठेवणारा, म. गांधींच्या विचारानुसार आचरण करणारा म. गांधीचा सच्चा अनुयायी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख करता येईल. १७ ऑक्टोबर १९४० रोजी देशी विदेशी वर्तमानपत्रातू

21

बालपण आणि शिक्षण

27 June 2023
0
0
0

११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आज

22

साबरमती आश्रमात

27 June 2023
0
0
0

७ जून १९१६ रोजी म. गांधी आणि विनोबांची पहिली भेट झाली. विनोबा आश्रमात आल्याची बातमी म. गांधींपर्यंत पोहचली. आंघोळ करून भेटायला येऊ द्या असे सुचवित म. गांधी स्वयंपाक घरात शिरले. साबरमती-कोचरब आश्रमाच

23

एका वर्षाची रजा

27 June 2023
0
0
0

फेब्रुवारी १९१७ मध्ये गांधींकडून एक वर्षाची सुटी घेऊन विनोबा संस्कृत अभ्यासासाठी वाई येथे दाखल झाले. वाई येथे त्यांनी प्रथम पंडित नारायणशास्त्री यांची भेट घेऊन "वेदाभ्यास अस्पृश्यास शिकविण्याची आपली

24

वर्धा आश्रमात

27 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९१८च्या सुरुवातीला बडोद्याहून निरोप आला की विनोबांची आई हिवतापाने आजारी आहे. गांधींना ही बातमी समजताच त्यांनी विनोबाला त्वरीत बडोद्यास जाऊन आईची सेवा करण्यास सांगितले. विनोबा लगेच बडोद्याला ग

25

गीताई- गीता प्रवचने

27 June 2023
0
0
0

१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे.

26

बुनियादी तालीम

28 June 2023
0
0
0

ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिज

27

भूदान

28 June 2023
0
0
0

शिवरामपल्ली येथील सर्वोदय समाजाचे अधिवेशन संपल्यानंतर तेलंगणातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनोबांनी १५ एप्रिल १९४१ रोजी पदयात्रा सुरू केली. शासनाने देऊ केलेले पोलीस संरक्षण नाकारून विनोब

28

बंगाल- ओरिसा पदयात्रा

28 June 2023
0
0
0

बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर

29

चंबळच्या खोऱ्यात

28 June 2023
0
0
0

विनोबा काश्मीरमध्ये असतानाच त्यांना चंबळ खोऱ्यातील प्रसिद्ध डाकू मानसिंहचा मुलगा तहसिलदारसिंह याचे पत्र मिळाले. त्या पत्रात त्याने लिहिले होते की, मला फाशीची शिक्षा झाली आहे. परंतु फाशीला जाण्यापूर्वी

30

ग्रामदान

28 June 2023
1
1
0

२५ डिसेंबर १९६२ पं. नेहरू शांतीनिकेतनमधील पदवीदान सभारंभ आटोपून विनोबांना भेटण्यासाठी नवग्राम येथे आले. भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी नेहरूंनी बरीच कागदपत्रे आणि नकाशे आणले होते. शेवटी विनोबांना न

31

सूक्ष्मतर कर्मयोग

28 June 2023
0
0
0

१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा क

32

अखेरचे पर्व

28 June 2023
1
0
0

११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प

33

जीवन-दृष्टि (माझी तळमळ)

29 June 2023
0
0
0

यज्जातीयो यादृशो यत्स्वभावःपादच्छायां संश्रितो योऽपि कोऽपि । तज्जातीयस् तादृशस् तत्स्वभावःझिलप्यत्येनं सुंदरो वत्सलत्वात् ॥ -श्रीकुरथल्वारहा तमिळ वैष्णव भक्ताचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा

34

जीवन-दृष्टि (जीवनांतील तीन प्रधान गोष्टी)

29 June 2023
0
0
0

उद्योग, भक्ति आणि शिक्षणमाझ्या जीवनात तीन गोष्टींना मी प्रधान पद देतों. त्यापैकी पहिली म्हणजे उद्योग आपल्या देशात आळसाचे वातावरण फार आहे. बेकारीमुळे हि आळस शिरला आहे. शिकलेल्या लोकानीं उद्योग करायचा च

35

जीवन-दृष्टि (ब्रह्मचर्य)

29 June 2023
0
0
0

मनुष्याचे जीवन है व्यतिगत अनुभवाचे बनलेले आहे. त्या अनुभवानें मानव-समाजाचा पुष्कळ विचार झाल आहे. परंतु हिदुधर्मानें त्याचे शास्त्र रचून एक विशिष्ट साधना पेली. ती म्हणजे प्राचर्य, इतर धर्मात हि संयम आह

36

जीवन-दृष्टि (खोल अभ्यास)

29 June 2023
0
0
0

अभ्यासात लानी-६दी महत्वाची नाहीं, सोली महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळ तासचे तास आणि नाना विषयाचा अभ्यास करीत राहणे ह्याला मी लावरुंद अभ्यास म्हणतो. समाधिस्थ होऊन रोज सतत अल्प वेळ एसाद्या निश्चित विषयाचा अ

37

जीवन-दृष्टि (उद्योगांत ज्ञानदृष्टि)

29 June 2023
0
0
0

माझ्या मित्रानो,१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहेऔचित्यविचार२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे

38

जीवन-दृष्टि (साहित्याची दिशाभूल)

29 June 2023
0
0
0

खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -&n

39

जीवन-दृष्टि (तुलसीदासांची बालसेवा)

3 July 2023
0
0
0

जेलमधल्या आमच्या सायं प्रार्थनेत तुलसीरामायण सांगण्याचें काम माझ्याकडे आलें होतें. त्या निमित्ताने रामायणार्थी रोज थोडा परिचय होऊन त्यातल्या काही खुन्या सहज च लक्षात येत. तुलसीदासानी आम जनतेसाठी हा मथ

40

जीवन-दृष्टि (गुत्समद)

3 July 2023
0
0
0

हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या

41

परशुराम (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारी

42

के. जमनालालजींना श्रद्धांजलि (जीवन-दृष्टि)

3 July 2023
0
0
0

माझ्या प्रियतम बंधूंनो आणि भगिनींनो !काल सायंकाळी ४ वाजता महिलाश्रमामध्ये माझें व्याख्यान ठेवले होतें. त्या व्याख्यानासाठीं मी तिथे जाऊन पोचलो, मुली येऊन बसल्या आणि मी माझे बोलणे सुरू करणार इतक्यात मो

43

तीन मुख्य वाद * (जीवन दृष्टी)

3 July 2023
1
0
0

माझ्या अत्यन्त प्रिय मित्रानो, आज मला सागायचे आहे ते सागण्यापूर्वी किंचित प्रस्तावना करावी लागणार आहे. एका मित्राची चिट्टी आली आहे. तीत म्हटले आहे, "कृपया हिन्दीम बोलें”. यातील 'कृपया' हा शब्द मी स्वी

44

जीवन दृष्टी (समाजवादाचं स्व-रूप) भावे

4 July 2023
0
0
0

समाजवादाची मूलभूत कल्पना नवीन नाही. अपरिग्रहाच्या आणि यशाच्या योजनेंत तिचा सपूर्ण समावेश केला आहे. समाज प्रवादात्मक आणि नित्य आहे ह्या पूर्वसिद्ध सामाजिक प्रवादाचे ऋण घेऊन व्यक्ति जन्मास येते. समाजापा

45

जीवन दृष्टी (नित्ययज्ञाची गरज) भावे

4 July 2023
0
0
0

हलच्या काळात राष्ट्रीय जागृतीच्या ज्या काही नवीन कल्पना निवाल्या, त्यातली अत्यंत स्फूर्तिदायक अशी कल्पना मला नित्ययज्ञाची वाटते. गरिबार्थी अनुसंधान रासण्याची, राष्ट्रासाठी काहीं निर्माण करण्याची, आणि

46

जीवन दृष्टी (वैराग्ययुक्त निष्काम बळ)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

47

जीवन दृष्टी (राष्ट्रासाठी त्याग किती व कां ?*)

4 July 2023
0
0
0

माझ्या बाळगोपाळांनो,तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उप

48

जीवन दृष्टी (आजचें दुःख *)

5 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवच्या भावांनो आणि बहिणींनो ! मी आज येथें नाइलाजानें आलों आहें. असे बोलण्याचे प्रसंग जितके टाळतां आले तितके टाळले. परंतु हा टाळतां आला नाहीं. कारण ह्या वर्षी मी इथेच राहतों. आहे. आसपासच्य

49

जीवन दृष्टि (राष्ट्रासाठी त्याग - किती व कां ?*)

5 July 2023
0
0
0

मित्रांनो, या ठिकाणी धुळयांत आल्यावर घरीं आल्यासारखे च मला वाटतें. कारण, कांहीं कळकळीची काम करणारी माणसे, शुद्ध हृदयाची -माणसें, या ठिकाण आहेत. पण है एक कारण झालें. दुसरें हि एक कारण आहे. तीन वर

50

जीवन दृष्टी (श्रमदेवाची उपासना)

5 July 2023
0
0
0

ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपा

51

जीवन दृष्टी (आजच्या आज साम)

5 July 2023
0
0
0

सोनेगांवच्या खादी यात्रेत शिष्टमंडळींसाठी गादी घातली होती. शिष्टमंडळींसाठीं न म्हणतां विशिष्ट मंडळींसाठीं म्हटलें पाहिजे. कारण तिथे आलेली बाकीची मंडळी हि शिष्ट च होती. त्या प्रसंगी मला म्हणावें लागलें

52

जीवन दृष्टि (विधायक कार्यक्रम) भावे

7 July 2023
0
0
0

हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या

53

जीवन दृष्टी (भारतीय जन-दर्शन) भावे

7 July 2023
0
0
0

ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला

54

जीवन दृष्टी (ग्रामसेवकांना)

7 July 2023
0
0
0

मीं आज इथे येण्याचें स्वीकारलें, तें मुख्यतः मगनवाडीतील विद्या- यच्या दर्शनाच्या लोभाने. प्रमाणपत्र द्यायला मी आलोच परीक्षा आणि नाहीं. कारण, त्यावर माझी श्रद्धा नाहीं. ज्या विषयांतप्रमाण

55

जीवन दृष्टी (खेडेगांवची जागृति)

7 July 2023
0
0
0

आपणां सर्वांना येथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. माझा नेहमीचा असा अनुभव आहे आणि जो येथील भाषणे व मतदान पाहून येथे हि आला आहे की खेड्यांतील लोक हे शहराच्या लोकांपेक्षां जास्त • बुद्धिमान् आहेत. शहरचे

56

जीवन दृष्टी (गांवलक्ष्मीची जोपासना)

7 July 2023
0
0
0

माझ्या खेडेगांवांतील प्रेमळ बंधूंनो,आपला हा देश फार मोठा आहे. ह्या देशांत सात लाख खेडीं आहेत. आपल्या देशांत शहरें थोर्डी आहेत आणि खेडीं फार आहेत. ठोकळ मानाने दहा माणसांतील एक मनुष्य शहरांत राहतो व नऊ

57

जीवन दृष्टी (खेडेगांवचे आरोग्य)

7 July 2023
0
0
0

परवां पवनारचा एक मुलगा रस्त्यांत भेटला, म्हणाला, "मला खाडक झाली आहेत काय करावे ?” तेव्हां त्याला थोडक्यांत मंत्र सांगितला, "रोज सकाळी गाईचे ताजे ताक पीत जा, म्हणजे तुझा रोण जाईल. खेडेगांवच्या माझ्या ए

58

जीवन दृष्टी (खादीचें समग्र-दर्शन)

7 July 2023
0
0
0

जेलमध्ये थोडाफार तटस्थ चिंतनाला अवकाश मिळतो. तेव्हा आपल्या चळवळीसंबंधीं त्या च प्रमाणे हिंदुस्थानच्या आणि एकूण जगाच्या परिस्थितीसंबंधी विचार चांगला झाला. चर्चा हि झाली. एकंदर परिस्थिति कठिण झालेली दिस

---

एक पुस्तक वाचा